एक्स्प्लोर

Mission Impossible Review : 61 वर्षीय टॉम क्रूझसाठी अवश्य पाहावा असा 'मिशन इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट वन'

Mission Impossible Review : 61 वर्षीय टॉम क्रूझसाठी अवश्य पाहावा असा 'मिशन इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट वन'

Mission Impossible Review : एखादा तीन तासांचा चित्रपट पाहिल्यानंतरही अजून पाहात बसावं वाटणं यातच त्या चित्रपटाचे यश असते. आणि टॉम क्रूझचा नवा चित्रपट 'मिशन इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट वन' (Mission Impossible) पाहाताना असेच काहीसे वाटते. आणि मला वाटते हेच खरे टॉम क्रूझ (Tom Cruise) आणि दिग्दर्शक ख्रिस्टोफर मॅक्वेलचे (Christopher Mcquarrie) यश आहे. 

गेल्या वर्षी हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूझने 'टॉप गन मेव्हरिक'मधून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केल्यानंतर आता टॉम क्रूझ एजंट हंटच्या रुपात जबरदस्त अॅक्शन घेऊन प्रेक्षकांसमोर आला आहे. टॉम क्रूझच्या  'मिशन इम्पॉसिबल' चित्रपटांच्या सीरीजमध्ये सातवा भाग 'मिशन इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट वन' उद्यापासून भारतात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात टॉम क्रूझ त्याच्या लोकप्रिय इमेजला जागला असून प्रेक्षकांना अॅक्शनचा मोठा डोस या चित्रपटातून त्याने दिला आहे. केवळ टॉम क्रूझसाठीच मिशन इम्पॉसिबल चित्रपट पाहिले जातात आणि हा चित्रपटही अगदी टॉम क्रूझसाठीच पाहिला पाहिजे. वयाच्या एकसष्ठीतही टॉम क्रूझ ज्या अॅक्शन करतो त्याला तोड नाही. चित्रपटाचा ट्रेलर पाहताना चित्रपट कसा असेल याची कल्पना आलीच होती. चित्रपटातीतील स्टंटचे बिहाईंड द सीन फूटेज पाहिलेले असल्याने चित्रपटात ती दृश्ये कशी दिसत असतील याची उत्सुकता होती आणि चित्रपट पाहिल्यानंतर टॉम क्रूझसह त्याच्या संपूर्ण टीमला शाबासकी दिल्याशिवाय राहवत नाही.

चित्रपटाची सुरुवात होते रशियन पानबुडी सेवस्तोपोलवर सुरु असलेल्या प्रायोगिक गुप्त क्षमतेच्या परीक्षणाने. यावेळी या पाणबुडीला अन्य एक पाणबुडी दिसते. सेवस्तोपोलचा कॅप्टन त्या पाणबुडीला नष्ट करण्याचे आदेश देतो. परंतु ती पाणबुडी काही वेळात अचानक गायब होते आणि ती दिसलेली पाणबुडी नष्ट करण्यासाठी सोडलेले क्षेपणास्त्र सेवस्तोपोलवरच येऊन आदळते. त्यामुळे सेवस्तोपोल नष्ट होते आणि त्यावरील सर्व मारले जातात. मात्र या पाणबुडीवर असलेले अत्यंत संहारक शस्त्र तसेच समुद्राच्या तळाशी असते. हे शस्त्र मिळाले तर संपूर्ण जग नष्ट करता येऊ शकते त्यामुळे या शस्त्राच्या मागे काही जण लागतात. शस्त्र सुरु करण्यासाठी असलेल्या दोन चाव्यांचा संच मिळवण्याचा प्रयत्न म्हणजे हा चित्रपट.  

चावी शोधण्याचं काम एथन हंट आणि त्याच्या आयएमएफच्या टीमवर सोपवले जाते. हे शस्त्र चुकीच्या माणसाच्या हाती सापडले तर संपूर्ण जगाचा विध्वंस होऊ शकतो. गॅब्रियल नावाची एक रहस्यमय आणि शक्तीशाली व्यक्ती या चावीच्या मागे असते.  त्याच्या हाती चावी लागू नये आणि ती आपल्याला मिळावी म्हणून हंट जे प्रयत्न करतो ते नेहमीप्रमाणेच लाजवाब.

'मिशन इम्पॉसिबल'च्या प्रत्येक चित्रपटात अॅक्शनचा एक वेगळाच तडका असतो आणि तो अगोदरच्या चित्रपटापेक्षा उच्च दर्जाचा असतो आणि ते या चित्रपटातही टॉम क्रूझ आणि  ख्रिस्टोफर  मॅक्वेरीने सिद्ध केले आहे. 

'मिशन: इम्पॉसिबल' सीरीजमध्ये दिग्दर्शक  ख्रिस्टोफर मॅक्वेरी एकमेव असा दिग्दर्शक आहे ज्याने मिशन इम्पॉसिबल सीरीजमधील तीन चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.  'मिशन इम्पॉसिबल- रोग नेशन' आणि 'मिशन इम्पॉसिबल- फॉलआउट'  आणि आता  'मिशन इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट वन' चेही त्याने दिग्दर्शन केले आहे. अॅक्शनसोबतच ख्रिस्टोफरने भावनात्मक दृश्यांचीही मध्ये मध्ये चांगली पेरणी केली आहे. मध्ये मध्ये काही ठिकाणी संवादावर जास्त भर दिल्याने थोडा फार कंटाळवाणा वाटतो पण अॅक्शन सुरु झाल्यानंतर पडद्यावरून नजर हटत नाही. सुरुवातीची वाळवंटातील अॅक्शन असो, व्हेनिसमधील अॅक्शन असो, फियाट गाडीत बसून एथनचा जीव वाचवण्याचा प्रयत्न असो वा क्लायमॅक्समधील रेल्वेचा सीन असो अॅक्शनची कमाल डोळ्याचे पारणे फेडते. एथनची बाईकवरून उडी आणि ट्रेनची दृश्ये कमालीची झाली आहेत.

'मिशन: इम्पॉसिबल' चित्रपटाचे लेखन  ख्रिस्टोफर मॅक्वेरी आणि एरिक जेन्डरसन यांनी लिहिलेली आहे. 61 व्या वर्षी टॉम क्रूझने ज्या प्रकारे अॅक्शन केली आहे ती कमालीची आहे. सुरक्षेची सर्व उपकरणे वापरूनही तरुण अभिनेते अशी अॅक्शन करण्यास लगेच तयार होतील असे वाटत नाही. अॅक्शनसोबतच भावनात्मक दृश्यांमध्येही टॉम क्रूझ प्रभावित करतो. चेहऱ्यावर त्याचे वय जाणवत असले तरी अॅक्शन करताना त्याचे वय दिसत नाही.

ग्रेसच्या भूमिकेत हेले अॅटवेलने चांगले काम केले आहे. चोर असणारी ग्रेस एक चावी मिळवते आणि ती गॅब्रियलला विकण्याचा प्रयत्न करते, परंतु नंतर सत्य परिस्थिती कळल्यावर ती एथनच्या टीममध्ये सामिल होते. 

'मिशन इम्पॉसिबल- रॉग नेशन' आणि 'मिशन इम्पॉसिबल- फॉलआउट' नंतर इल्सा फॉस्टच्या रुपात या चित्रपटात रिबेका फर्ग्युसन परत आलीय, रिबेकाची अॅक्शनदृश्येही कमालीची आहेत. एसाई मोरालेसने गॅब्रियलची भूमिका उत्कृष्टरित्या साकारलीय.

एथनने चावी तर मिळवली आता तो त्या शस्त्राचा आणि ते शस्त्र प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचा नाश कसा करतो ते पुढील भागात पाहायला मिळणार आहे.  'मिशन इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट टू' पुढील वर्षी प्रदर्शित होईल असे सांगण्यात येत आहे. त्या चित्रपटाबाबतही प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. 

Mission Impossible : ‘मिशन इम्पॉसिबल’मधून अभिनेता टॉम क्रुझ बाहेर पडणार? चित्रपटाचा दिग्दर्शक म्हणतो...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tanaji Sawant Security: बँकॉकचं विमान समुद्रातून माघारी फिरवणाऱ्या तानाजी सावंतांचा प्रभाव संपला, फडणवीसांच्या आदेशामुळे 48 पैकी फक्त एक सुरक्षारक्षक उरला
बँकॉकचं विमान हवेतून माघारी फिरवणाऱ्या तानाजी सावंतांचा प्रभाव संपला, 48 पैकी फक्त 1 बॉडीगार्ड उरला
कोल्हापुरातील शहाजी विधी महाविद्यालयात
कोल्हापुरातील शहाजी विधी महाविद्यालयात "कायद्याचा दवाखाना"; अभिनव संकल्पना, कसे असणार कामकाज?
कुस्ती स्पर्धा म्हणजे बारामती ॲग्रोचा कार्यक्रम नाही; संग्राम जगतापांचा रोहित पवारांवर जोरदार पलटवार
कुस्ती स्पर्धा म्हणजे बारामती ॲग्रोचा कार्यक्रम नाही; संग्राम जगतापांचा रोहित पवारांवर जोरदार पलटवार
SIP : शेअर बाजारात धक्के इकडे SIP खाती खटाखट बंद, जानेवारीत एसआयपी खात्यात विक्रमी घट, आकडेवारी समोर
शेअर बाजारातील घसरणीमुळं धक्के सुरुच, SIP खाती खटाखट बंद, जानेवारी महिन्यातील आकडे समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Meet Mahadev Munde : सुप्रिया सुळेंची दिवंगत महादेव मुंडेच्या घरी सांत्वनपर भेटSupreme Court on Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादियाने पासपोर्ट जमा करवा, सुप्रीम कोर्टचे निर्देशAnandache Paan:ऐतिहासिक रहस्य कादंबरी 'प्रतिपश्चंद्र' उलगडताना लेखक Dr.Prakash Koyade यांच्याशी गप्पाBharat Gogawale : 'पालकमंत्री पदाबाबत मी आणि दादा भुसे समदुखी,म्हणूनच भेटायला आलो'

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tanaji Sawant Security: बँकॉकचं विमान समुद्रातून माघारी फिरवणाऱ्या तानाजी सावंतांचा प्रभाव संपला, फडणवीसांच्या आदेशामुळे 48 पैकी फक्त एक सुरक्षारक्षक उरला
बँकॉकचं विमान हवेतून माघारी फिरवणाऱ्या तानाजी सावंतांचा प्रभाव संपला, 48 पैकी फक्त 1 बॉडीगार्ड उरला
कोल्हापुरातील शहाजी विधी महाविद्यालयात
कोल्हापुरातील शहाजी विधी महाविद्यालयात "कायद्याचा दवाखाना"; अभिनव संकल्पना, कसे असणार कामकाज?
कुस्ती स्पर्धा म्हणजे बारामती ॲग्रोचा कार्यक्रम नाही; संग्राम जगतापांचा रोहित पवारांवर जोरदार पलटवार
कुस्ती स्पर्धा म्हणजे बारामती ॲग्रोचा कार्यक्रम नाही; संग्राम जगतापांचा रोहित पवारांवर जोरदार पलटवार
SIP : शेअर बाजारात धक्के इकडे SIP खाती खटाखट बंद, जानेवारीत एसआयपी खात्यात विक्रमी घट, आकडेवारी समोर
शेअर बाजारातील घसरणीमुळं धक्के सुरुच, SIP खाती खटाखट बंद, जानेवारी महिन्यातील आकडे समोर
राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील 6 मोठे निर्णय; ANTF मध्ये 346 पदासांठी भरती, 6 वा वित्त आयोगही स्थापन होणार
राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील 6 मोठे निर्णय; ANTF मध्ये 346 पदासांठी भरती, 6 वा वित्त आयोगही स्थापन होणार
Bharat Gogawale : राजन साळवींनंतर वैभव नाईकही ठाकरेंची साथ सोडणार? भरत गोगावलेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; ऑपरेशन टायगरच्या चर्चा
राजन साळवींनंतर वैभव नाईकही ठाकरेंची साथ सोडणार? भरत गोगावलेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; ऑपरेशन टायगरच्या चर्चा
PM Kisan Scheme : पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये जमा, 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये 'या' दिवशी येणार, किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार?
पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये जमा, 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये 'या' दिवशी येणार
भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी आईएनएस गुलदार!
भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी आईएनएस गुलदार!
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.