एक्स्प्लोर

Kuch Khatta Ho Jaay Review : अजिबात चव नसलेला 'कुछ खट्टा हो जाए', वाचा रिव्ह्यू

Kuch Khatta Ho Jaay Review : गुरु रंधावा याने जरी ऑटो ट्यूनवर जरी गायलं असतं आणि स्पीकर खराब जरी असते तरीही या चित्रपटामधून अधिक मनोरंजन झाले नसते. 

Kuch Khatta Ho Jaay Review : 'बन जा तू मेरी रानी, ​​तैनू महल दवा दांगा' हे गुरू रंधावाचं गाणं आहे.  ज्याचा अर्थ आहे की तू माझी गर्लफ्रेंड झालीस तर मी तुला एक महाल देईन.  पण जर तुम्ही हा चित्रपट तुमच्या गर्लफ्रेंडला दाखवला तर तुमचं ब्रेकअप निश्चित आहे. त्यामुळे नंतर असं म्हणू नका की तुम्हाला इशारा दिला नाही. हा चित्रपट इतका वाईट आहे की गुरू रंधावाने ऑटो ट्यूनवर गायले असते आणि स्पीकर खराब झाले असते तरीही मनोजरंजन होऊ शकले नसते. हा चित्रपट या वर्षातील सर्वात वाईट चित्रपटांच्या यादीत पहिल्या क्रमांकाचा प्रबळ दावेदार बनला आहे.गुरु एक अप्रतिम गायक असून तो क्यूट देखील आहे, म्हणूनच हा चित्रपट मी झेलतेयं, असं माझ्यासोबत चित्रपट पाहणाऱ्या दोन मुली वारंवार सांगत होत्या. पण प्रत्येकाकडे हा  चित्रपट सहन करण्याची ताकद असेलच असं नाही. 

कथा - कथा सांगून काही फरक पडणार नसला तरी कथा काहीशी क्लिष्ट आहे हे. गुरु रंधावा म्हणजेच हीरला लग्न करायचे नाही पण आजोबा अनुपम खेर यांना नातू किंवा नात हवी आहे.  सई मांजरेकर आएएस बनायचे आहे पण त्याच्या छोट्या बहिणीला लग्न करायचे आहे. पण मोठ्या बहिणीचे लग्न झाल्याशिवाय तिचे लग्न कसं होणार. अशा स्थितीत गुरू आणि सई मांजरेकरने एक करार केला आणि लग्न केले. मग सई मांजरेकर गरोदर असल्याचं नाटक करते आणि नंतर तुम्हाला कळलं असेल काय होतं. सई मांजरेकर आणि रंधाचं भांडं फुटतं.  आजोबांना हृदयविकाराचा झटका येतो आणि मग तेच नाटक आपण चार लाख पाचशे पंच्याऐंशी चित्रपटांमध्ये पाहिलंय.चित्रपटाची कथा तीन जणांनी मिळून लिहिली आहे आणि असं वाटतं. तसेच या तिघांनी एकमेकांवर काम टाकलंय,नाहीतर तिघेजण एवढा वाईट चित्रपट लिहू शकले नसते.

कसा चित्रपट आहे - खूप वाईट. खरंतर इतकं पुरेसं आहे पण अजून ऐका. या चित्रपटातील गाणं आहे ईशारे तेरे. मी तुम्हाला सरळ सांगतोय की हा चित्रपट पाहू नका. चित्रपटात असे काहीही नाही जे चांगले आहे. एक उत्तम कॉमेडी करण्याचा प्रयत्न केला आहे जो अगदीच निरुपयोगी वाटतो. चित्रपट सुरुवातीपासूनच खूप हलका वाटतो. गुरु ज्या स्तरावरचा गायक आहे त्या स्तरावरील हा चित्रपट अजिबात नाही. चित्रपटाच्या एका सीनमध्ये गुरु सई मांजरेकरसोबतच्या लग्नाचा करार जाळून टाकतो. त्यावेळी असं वाटतं की, चित्रपट पाहून या चित्रपटाची रिळ देखील जाळली तर बरं होईल. अधिक चांगला चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला असता तर प्रेक्षक वाचले असते असे वाटते. प्रेक्षकांना हा छळ सहन करावा लागला नसता. 

अभिनय - गुरु रंधवाच्या अभिनयात ताकद नाही.  तो पंजाबी गायक आहे आणि त्याला पंजाबी टच आहे.पण डायलॉग डिलिव्हरी खूपच खराब आहे. त्याच्या क्यूटनेसमुळे मुलींना तो आवडतो. पण या चित्रपटानंतर त्याची फॅन फॉलोइंग देखील कमी होऊ शकते. सई मांजरेकर या चित्रपटात चांगली दिसते पण ती एकटी हा वाईट चित्रपट घेऊन जाऊ शकत नाही. अनुपम खेर यांनी हा चित्रपट का केला हे समजण्यापलीकडचे आहे. चित्रपटाची स्क्रिप्ट खराब असल्याने कलाकारांकडून विशेष काम घेतले गेले नाही.

दिग्दर्शन - अशोक जींनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे आणि कदाचित ते या चित्रपटातील सर्वात मोठे खलनायक आहेत. या चित्रपटामध्ये त्यांनी असं काहीच टाकलं नाही ज्यामुळे हा चित्रपट झेलता येईल.  गुरूसारख्या मोठ्या गायकाला चांगल्या पद्धतीने लाँच करण्याची गरज होती. चित्रपटात पुढे काय होईल हे एक लहान मूलही सांगू शकते. एकूणच हा चित्रपट झेलता न येण्यासारखा आहे.

स्टार - 5 पैकी 0 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Raju Shetti on Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Health Update | जखमेमुळे पॅरालिसिसचा धोका होता, सैफ अली खानवर सर्जरी करणारे डॉक्टर EXCLUSIVEABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7PM 16 January 2025ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 16 January 2025Saif Ali Khan Attacked Criminal CCTV : सैफ अली खानवर चाकू हल्ला करणारा आराेपी सीसीटीव्हीत कैद

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Raju Shetti on Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Amit Shah Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
Embed widget