Raj Thackeray ED Inquiry LIVE | साडेआठ तासांच्या चौकशीनंतर राज ठाकरे ईडी कार्यालयाबाहेर
LIVE

Background
मुंबई : कोहिनूर मिलप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज सकाळी 10.30 वाजता ईडीकडून चौकशी होणार आहे. दरम्यान कोहिनूरप्रकरणी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींची पुत्र उन्मेष जोशी आणि राजन शिरोडकरांची देखील गेल्या तीन दिवसांपासून चौकशी सुरु आहे.
राज ठाकरे यांना नोटीस मिळाल्यापासून मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उपस्थित होऊ नये आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना नोटीस पाठवल्या आहेत. राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानाबाहेर आणि दक्षिण मुंबईत मोठा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहेत.
राज ठाकरे यांनीही कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं आहे. तसेच कुणीही ईडी कार्यालयाबाहेर जमा होऊ नये अशी विनंती त्यांनी कार्यकर्त्यांना केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
