Child Health: मुलांनी कोणत्या वयात किती वेळ मोबाईल स्क्रीन पाहावी? तज्ज्ञांनी दिलेला सल्ला फॉलो करा, फायदे होतील
Child Health: मुलांच्या टीव्ही, मोबाईल पाहण्याच्या सवयीमुळे जवळपास प्रत्येक पालक त्रस्त असतो. मुलांनी कोणत्या वयात, किती वेळ स्क्रीन पाहावी? तज्ज्ञांकडून सर्वकाही जाणून घ्या
Child Health: आजकालच्या बदलत्या काळात मुलांचे आई-वडिल असे दोघंही काम करतात. ज्यामुळे पालकांचा अमूल्य वेळ मुलांना कमी प्रमाणात मिळत असल्याने मुलांचा कल आपोआपच मोबाईलकडे वळतो, मुलांचा फोन आणि स्क्रीन दीर्घकाळ पाहण्याच्या समस्येबद्दल बहुतेक पालक चिंतेत असतात. आजकाल मुले खेळ खेळण्याऐवजी घरातील बहुतेक वेळ फोनवर किंवा टीव्ही पाहण्यात घालवतात. स्क्रीनवर जास्त वेळ डोळे चिकटवून ठेवणे कोणासाठीही चांगले नसले तरी लहान मुलांसाठी योग्य स्क्रीन वेळ सेट करणे कठीण आहे. वेगवेगळ्या वयोगटातील मुलांच्या बाबतीत हे वेगळे असू शकते. मुलांच्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी कोणते उपाय योग्य असतील ते जाणून घेऊया तज्ज्ञांकडून.
तज्ज्ञ काय म्हणतात?
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, नेत्रतज्ज्ञ डॉ. अर्णव सरोया सांगतात की, मुलांचे डोळे नाजूक असतात, पालकांनी त्यांची काळजी घेणे गरजेचे असते. डॉक्टर म्हणतात की -18 ते 24 महिने वयोगटातील मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवणे चांगले. एक वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलांना दिवसातून 1 तास टीव्ही किंवा फोन पाहण्याचा सल्ला दिला जातो. यामध्येही डॉक्टरांचे म्हणणे आहे की मुलांची टीव्ही पाहण्याची वेळ त्यांच्या झोपण्याच्या वेळेच्या आसपास असू नये, यामुळे त्यांच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो. 4 ते 6 वर्षे व त्याहून अधिक वयोगटातील मुलांनी क्रियाकलापांसह दिवसातून 1 ते 3 तास टीव्ही पाहावा. यासोबतच त्यांच्या वेळेच्या व्यवस्थापनाकडेही लक्ष द्यावे लागेल, मुलांनी सतत 3 तास कधीही टीव्ही पाहू नये.
जास्त स्क्रीन पाहण्याचे तोटे
- जी मुले स्क्रीन पाहण्यात जास्त वेळ घालवतात, त्यांना लठ्ठपणाचा त्रास होतो.
- जास्त टीव्ही पाहणाऱ्या मुलांमध्ये चिडचिड आणि राग वाढतो.
- याशिवाय मुलांना झोपेसंबंधी समस्या येतात आणि डोळ्यांची दृष्टीही प्रभावित होते.
- मुलांचा स्क्रीन टाइम नियंत्रित करण्यासाठी या टिप्स फॉलो करा
- टीव्ही किंवा फोन पाहताना, मध्ये काही वेळ गॅप घ्या. दर 20 मिनिटांनी ब्रेक घेणे चांगले.
- फोन आणि टीव्ही पाहताना अंतराची काळजी घ्या,
- स्क्रीन जवळून पाहिल्याने डोळ्यांच्या दृष्टीवर परिणाम होतो.
- पालकांनी आपल्या मुलांना पडद्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा
- मैदानी खेळांमध्ये रस दाखवावा.
- डोळे नियमित तपासा.
- घरातील प्रत्येक खोलीत टीव्ही किंवा लॅपटॉप ठेवणे टाळा.
- पालकांनी फोन, लॅपटॉप किंवा टीव्हीवर पालक नियंत्रण वापरावे.
हेही वाचा>>>
Child Health : पालकांनो.. सुट्टीत मुलांना टीव्ही, मोबाईलपासून दूर ठेवायचंय? तर फक्त हे काम करा, जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )