Cancer: मद्यपान करणाऱ्यांना तब्बल 5 प्रकारच्या कॅन्सरचा धोका? अमेरिकेच्या डॉक्टरांचा इशारा, सांगितली महत्त्वाची गोष्ट, जाणून धक्का बसेल..
Cancer: आजच्या काळात कॅन्सरचा धोका झपाट्याने वाढत आहे, त्यातच जर तुम्ही मद्यपान करत असाल तर धोका आणखीनच वाढतो. याबाबत आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे काय आहे? जाणून घ्या..

Cancer: सध्याची बदलती जीवनशैली, कामाचा ताण, वारंवार जंकफूडचे सेवन यासारख्या अनेक गोष्टींमुळे अनेकांना विविध शारिरीक आणि मानसिक आजारांनी ग्रासलंय. प्रामुख्याने मधुमेह, हृदयविकार, लठ्ठपणा आणि कर्करोगासारखे गंभीर आजार झपाट्याने पसरत आहेत. कर्करोगाचे एकच नाही तर अनेक प्रकार आहेत, ज्याची कारणेही वेगवेगळी आहेत. याबाबत अमेरिकन सर्जन जनरल विवेक मूर्ती यांनी एका अहवालात म्हटलंय की, दारू पिणाऱ्यांना कर्करोगाचा धोका अधिक असतो. याबाबत डॉक्टरांनी महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे, जी जाणून तुम्हालाही धक्का बसेल..
दारूच्या बाटल्यांवर कॅन्सर ॲडव्हायझरी असायला हवी? डॉक्टर सांगतात...
तज्ज्ञ सांगतात, मद्यपान केल्याने अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढतो, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या म्हणण्यानुसार, सर्व नवीन कर्करोगाच्या प्रकरणांपैकी सुमारे 5.5 टक्के आणि सर्व कर्करोगाच्या मृत्यूंपैकी 5.8 टक्के मद्यपानामुळे होतात. डॉक्टर विवेक मूर्ती म्हणतात की, दारूच्या बाटल्यांवर कॅन्सर ॲडव्हायझरी असायला हवी, कारण त्या कॅन्सरचे मुख्य कारण आहेत. डॉ. मूर्ती यांच्या मते, अल्कोहोलमुळे दरवर्षी 100,000 कर्करोग आणि 20,000 मृत्यू होतात. अहवालात असे म्हटले आहे की, अल्कोहोल सेवन हे ब्रेस्ट, कोलोरेक्टल, यकृत आणि तोंडाच्या कर्करोगासह किमान सात प्रकारच्या कर्करोगाशी संबंधित आहे. जाणून घेऊया मद्यपान केल्याने कर्करोगाचा धोका कसा वाढू शकतो?
एसीटॅल्डिहाइड
दारुमध्ये अल्कोहोल इथेनॉलमध्ये मुबलक प्रमाणात असते आणि जेव्हा तुमच्या शरीरात जाते, तेव्हा ते एसीटाल्डिहाइड बनते, जो एक कर्करोग वाढविणारा पदार्थ आहे. डॉक्टरांच्या मते, यामुळे तुमच्या कंपाऊंड डीएनए आणि पेशींना नुकसान पोहोचवते, ज्यामुळे कर्करोगाच्या पेशी वाढण्याची संधी मिळते.
हार्मोनल प्रभाव
अल्कोहोलमुळे इस्ट्रोजेनसारख्या हार्मोन्सच्या पातळीवर परिणाम होतो, ज्यामुळे शरीरातील पेशी वाढतात आणि जितक्या जास्त पेशींचे नुकसान होते, तितका कर्करोगाचा धोका जास्त असतो.
पौष्टिक कमतरता
अल्कोहोल पिण्यामुळे शरीराला कर्करोगापासून संरक्षण करणारे पोषकद्रव्ये शोषून घेणे कठीण होते. ही जीवनसत्त्वे म्हणजेच A, B1, B6, C, D, E, K, फोलेट, लोह आणि सेलेनियम यांचा समावेश आहे.
वजन वाढणे
मद्यपान केल्याने तुमच्या शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढते, ज्यामुळे वजन वाढते. डॉक्टरांचे म्हणणे आहे की जास्त वजनामुळे 12 पेक्षा जास्त प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढतो.
हेही वाचा>>>
Women Health: महिलांनो.. चुकूनही नका करू दुर्लक्ष! धोका वाढतोय, कॅन्सरची 'ही' 10 लक्षणं, अनेकांना माहित नसावी
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
