Women Health: महिलांनो.. चुकूनही नका करू दुर्लक्ष! धोका वाढतोय, कॅन्सरची 'ही' 10 लक्षणं, अनेकांना माहित नसावी
Women Health: आजकाल महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका वाढताना दिसत आहे. हा धोका टाळण्यासाठी लक्षणं जाणून घेणे सर्वात महत्वाचे आहेत, जेणेकरून वेळेवर उपचार केले जाऊ शकतात.
Women Health: वाढत्या वयानुसार महिलांच्या शारिरीक आणि मानसिक स्थितीत बदल होत जातात. आजकाल अनेक महिला एकावेळी अनेक काम करतात. आता महिलाही चूल-मूलपर्यंत मर्यादित न राहता करिअर करत आहे. सोबत मुलांचं संगोपन आणि इतर जबाबदाऱ्याही पार पाडत आहेत. अशात काही महिला अशा असतात, ज्या त्यांचं दुखणं अंगावरच काढतात. त्याची वाच्यता कोणाकडेही करत नाही, परिणामी विविध आजारांना सामोरे जावे लागते. आजच्या काळात, कर्करोगाचा धोका वाढतोय आणि त्याच्याशी लढण्यासाठी सुरुवातीची चिन्हे सर्वात महत्वाची आहेत. जरी कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी एक गर्भाशयाचा कर्करोग आहे, ज्याची लक्षणे ओळखणे कठीण आहे. कारण काहीवेळा त्याची लक्षणे स्पष्टपणे दिसत नाहीत. संभाव्य लक्षणे विशेषतः जेवताना किंवा काही वेळानंतर दिसून येतात, जे तुम्हाला ओळखणे गरजेचे आहे.
गर्भाशयाचा कर्करोग म्हणजे काय?
गर्भाशयाचा कर्करोग बहुतेक महिलांमध्ये दिसून येतो. याला ओवरियन किंवा गर्भाशयाचा कर्करोग असेही म्हणतात. जेव्हा अंडाशय किंवा फॅलोपियन ट्यूबमधील असामान्य पेशी वाढतात आणि कर्करोगाच्या ट्यूमर बनतात तेव्हा हे घडते. या कर्करोगाच्या पेशी शरीरात वेगाने वाढतात आणि शरीराला अनेक प्रकारे हानी पोहोचवतात. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते, केवळ 20 टक्के ओवरियन कर्करोग प्रारंभिक अवस्थेत आढळतात. आकडेवारी दर्शवते की, जेव्हा गर्भाशयाचा कर्करोग लवकर आढळतो, तेव्हा 94 टक्के रुग्ण उपचारानंतर पाच वर्षांहून अधिक काळ जगतात. त्याची लक्षणं काय असू शकतात? जाणून घेऊया...
गर्भाशयाच्या कर्करोगाची लक्षणं
- पोटात सूज किंवा पोट फुलणं
- ओटीपोटात किंवा योनीमध्ये वेदना
- भूक न लागणे किंवा खाल्ल्यानंतर लगेच पोट भरणे
- वारंवार लघवी होणे
- अपचन
- बद्धकोष्ठता किंवा अतिसार
- पाठदुखी
- थकवा
- अचानक वजन कमी होणे
- रजोनिवृत्तीनंतर योनीतून रक्तस्त्राव
गर्भाशयाच्या कर्करोगाचा उपचार
गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान सामान्यतः रक्त तपासणी आणि स्कॅनद्वारे केले जाते. गर्भाशयाच्या कर्करोगासाठी प्राथमिक उपचार म्हणजे शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी, डॉक्टरांच्या संयोजनात दिली जाते. ओवेरियन कर्करोगासाठी उपचार म्हणजे निदान, स्टेजिंग आणि ट्यूमर डिबल्किंग किंवा केमोथेरपी नंतर सायटोरेडक्शनवर शस्त्रक्रिया असू शकते.
हेही वाचा>>>
Women Health: मासिक पाळी चुकली? किती उशीरानं पाळी येणं सामान्य? गर्भधारणा व्यतिरिक्त, ही 3 कारणं, तुमच्या प्रश्नांची उत्तरं इथे आहेत
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )