Health Tips: गरम खाण्यामुळे जीभ भाजली? 'हे' घरगुती उपाय केल्यास मिळेल 5 मिनिटांत आराम
Burnt Tongue: बऱ्याचदा आपण गरम चहा किंवा गरम कॉफी पितो, गरम पदार्थ खातो आणि आपली जीभ भाजते किंवा चरचरते. अशा वेळी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.

Burnt Tongue: अनेक वेळा घाईत आपण गरम पदार्थ (Hot Food) खातो किंवा गरम पेय पितो आणि आपली जीभ (Tongue) भाजते. गरम चहा (Tea) प्यायल्याने जीभ भाजल्याचं तर अनेक जणांनी अनुभवलं असेल. जीभ भाजली की आपल्याला खाताना, पिताना किंवा बोलताना त्रास होतो. जीभ सतत चुरचुरत राहिल्याने कधी कधी चिडचिडसुद्धा होते. तर, काही घरगुती उपाय करुन तुम्ही हा त्रास काही मिनिटांत थांबवू शकता.
जीभ भाजण्याच्या एका कारणामुळेच जास्त गरम अन्न खाणं हानिकारक आहे. जीभ भाजली की सामान्यत: आपण लगेच थंड पाणी पितो, पण तरीही तुमची जीभ चुरचुरत असेल तर तुम्ही आणखी काही घरगुती उपाय करू शकता, अशाच काही घरगुती उपायांबद्दल सविस्तर जाणून घेऊयात...
थंड पाणी पिणे
जीभ भाजल्यानंतर सर्वात आधी करण्यासारखी उपाय म्हणजे थंड पाणी पिणं अथवा फ्रिजमध्ये असलेलं एखादं थंड पेय पिणं. थंड पाणी अथवा थंड पेय प्यायल्याने तुम्हाला भाजलेल्या जिभेपासून काहीसा आराम मिळेल. थंड पेय प्यायल्याने जीभेची सतत जळजळ जाणवणार नाही.
दही किंवा दूध पिणे
दही खाल्ल्याने किंवा दूध प्यायल्याने देखील भाजलेल्या जिभेपासून लवकर आराम मिळतो. दही आणि दुधात असलेले प्रोबायोटिक्स जिभेला आराम देण्यास फायदेशीर ठरतात.
तूप
जीभ भाजल्यानंतर जिभेवर थोडं तूप लावल्याने जिभेची जळजळ कमी होते. तुपात असलेले फॅट्स जिभेची त्वचा मऊ करतात आणि जिभेची जळजळ कमी करतात. याशिवाय तुपात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे जिभेच्या भाजलेल्या भागाला अजून वाढण्यापासून रोखतात आणि जीभ लवकर बरी करतात.
लिंबाचा रस
जीभ भाजते तेव्हा त्यावर लिंबाचा रस लावल्याने फायदा होतो. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स सारखे गुणधर्म असतात, जे जिभेची भाजलेली त्वचा बरी करण्यास मदत करतात.
साखर किंवा मधाचा वापर
मधामध्ये रोगाणुविरोधी गुणधर्म अधिक प्रमाणात असतात. जीभ पोळल्यानंतर लगेच मध लावल्याने जिभेला पटकन थंडावा मिळतो आणि जिभेची जळजळ होत नाही. याशिवाय साखर आणि मध एकत्र करून लावल्याने देखील जीभेला त्वरीत आराम मिळतो.
मिठाच्या पाण्याने गुळण्या
मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने जिभेवरील सूज कमी होते आणि जळजळणाऱ्या जिभेमुळे होत असणारा त्रास देखील कमी होतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Health Tips: चांगल्या आरोग्यासाठी ड्रायफ्रुट्स खाताय? तर 'या' गोष्टींकडेही लक्ष द्या
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

