Job Majha : नोकरीच्या शोधात आहात? या ठिकाणी करा अर्ज
Job Majha : कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ, हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (HCL) आणि भारतीय हवामानशास्त्र विभाग या ठिकाणी विविध पदांसाठी भरती सुरू आहे.
Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ, हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (HCL) आणि भारतीय हवामानशास्त्र विभाग या ठिकाणी विविध पदांसाठी भरती सुरू आहे. त्यासाठी काय पात्रता आहे, अर्ज कुठे आणि कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,
कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ
विविध पदांच्या 349 जागांसाठी भरती निघाली आहे.
पोस्ट - नॉन रिसर्च मॅनेजमेंट पोजिशन (Non-RMPs) (यात प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर, हेड ऑफ डिव्हिजन, हेड ऑफ रिजनल स्टेशन/सेंटर, सिनियर सायंटिस्ट-कम-हेड,KVK या पोस्ट आहेत.)
शैक्षणिक पात्रता - डॉक्टरल पदवी, 3 वर्षांचा अनुभव
एकूण जागा - 349
वयोमर्यादा - प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर, हेड ऑफ डिविजन, हेड ऑफ रिजनल स्टेशन/सेंटर या पदासाठी 60 वर्षांपर्यंत, सिनियर सायंटिस्ट-कम-हेड,KVK या पदासाठी 47 वर्षांपर्यंत
संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर, हेड ऑफ डिविजन, हेड ऑफ रिजनल स्टेशन/सेंटर या पदासाठी ३१ ऑक्टोबर, सिनियर सायंटिस्ट-कम-हेड,KVK या पदासाठी 11 नोव्हेंबर 2022
तपशील - www.asrb.org.in (या वेबसाईटवर गेल्यावर डाव्या बाजूला असलेल्या vacancy वर क्लिक करा. Vacancy Notification Advt. No. 02/2022 for Non-RMP positions of ICAR या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल).
हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (HCL)
पोस्ट - पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (GET) (यात मायनिंग, सर्व्हे, जियोलॉजी, कॉन्सेंट्रेटर, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, सिस्टम हे ट्रेड आहेत.)
शैक्षणिक पात्रता - संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी (B.E./B.Tech/ MCA)
एकूण जागा - 84
वयोमर्यादा - 28 वर्षांपर्यंत
अर्ज कऱण्याची शेवटची तारीख - 31 ऑक्टोबर 2022
तपशील - www.hindustancopper.com (या वेबसाईटवर गेल्यावर career वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. view notices वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, भारतीय हवामानशास्त्र विभाग (भारत सरकार- पृथ्वी विज्ञान मंत्रालय)
पोस्ट - सायंटिफिक असिस्टंट (वैज्ञानिक सहाय्यक) ग्रुप-बी
शैक्षणिक पात्रता - विज्ञान पदवीधर किंवा इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग
एकूण जागा - 990
वयोमर्यादा - 30 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 18 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट - www.ssc-cr.org