Job Majha : राष्ट्रीय आरोग्य अभियान, HPCL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! आजच करा अर्ज, जाणून घ्या
Job Majha : 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड
पोस्ट - वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW
शैक्षणिक पात्रता - वैद्यकीय अधिकारी पदासाठी MBBS, स्टाफ नर्स पदासाठी 12 वी पास, GNM कोर्स, MPW साठी 12 वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण, पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
एकूण जागा - 93
ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
नोकरीचं ठिकाण - रायगड
मुलाखतीतून निवड होणार आहे.
मुलाखतीची तारीख - 10, 12 आणि 17 ऑगस्ट 2022
मुलाखतीचा पत्ता - चौथा मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय. शिवतीर्थ, रायगड, जिल्हा परिषद अलिबाग.
-----------------------------------------------------------------
एचपीसीएल एलएनजी लिमिटेड
पोस्ट - शिफ्ट इन्चार्ज ऑपरेशन्स, शिफ्ट इंजिनिअर, शिपिंग ऑफिसर, मेंटेनन्स इन्चार्ज-मेकॅनिकल, इंजिनिअर- मटेरिअल हँडलिंग, मेंटेनन्स इंजिनिअर - इलेक्ट्रिकल, इंजिनिअर- CPP, मेंटेनन्स इन्चार्ज- इन्स्ट्रूमेंटेशन, मेंटेनन्स इंजिनिअर- इन्स्ट्रूमेंटेशन, सेफ्टी ऑफिसर
शैक्षणिक पात्रता - इंजिनिअरिंग पदवी (विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.
एकूण जागा - 12
नोकरीचं ठिकाण - LNG टर्मिनल छारा, जिल्हा गीर-सोमनाथ, गुजरात
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 ऑगस्ट 2022
तपशील - www.hplng.in (या वेबसाईटवर गेल्यावर Careers वर क्लिक करा. Detailed Advertisement for Recruitment (2022/01) या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
--------------------------------------------------------
जिल्हा परिषद, वाशीम
पोस्ट - डेटा एन्ट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता - 12 वी उत्तीर्ण, 1 वर्षाच्या अनुभवासह MS-CIT, इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. आणि मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.
एकूण जागा - 5
ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
वयोमर्यादा - 18 ते 43 वर्ष
अर्ज पाठवण्याचा पत्ता - प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद वाशिम
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 13 ऑगस्ट 2022
तपशील - www.zpwashim.in