Colgate-Palmolive Jobs 2022 : इकॉनॉमिक्स-फायनान्सची समज आहे? मग वाट कसली पाहताय? लगेच अर्ज करा
Colgate-Palmolive Jobs 2022 : जर तुमच्याकडे अर्थशास्त्र, गणित किंवा सांख्यिकी या विषयात बॅचलर पदवी असेल, तर तुम्ही कोलगेट कंपनीमध्ये विश्लेषक पदासाठी पात्र आहात.
![Colgate-Palmolive Jobs 2022 : इकॉनॉमिक्स-फायनान्सची समज आहे? मग वाट कसली पाहताय? लगेच अर्ज करा Colgate Palmolive Jobs 2022 colgate job analyst job colgate palmolive economics job maths job finance job Majha Colgate-Palmolive Jobs 2022 : इकॉनॉमिक्स-फायनान्सची समज आहे? मग वाट कसली पाहताय? लगेच अर्ज करा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/09/bc5832862976ce60ca6ce14ba05ea7a61660056794355531_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Colgate-Palmolive Jobs 2022 : पर्सनल केअर ब्रँड (Personal Care Brand) कोलगेट-पामोलिव्हमध्ये (Colgate-Palmolive) एनालिस्ट (विश्लेषक) पदांसाठी रिक्त जागा आहेत. ही जागा मुंबई कार्यालयासाठी काढण्यात आली आहे. निवडलेल्या उमेदवाराला वर्क फ्रॉम होम काम करण्याची संधी देखील मिळू शकते.
जॉब रोल
निवडलेल्या उमेदवारांना Analytics विभागात काम करण्याची संधी मिळेल. जिथे त्यांना मार्केटिंग मिक्स मॉडेलवर काम करावं लागेल. तसेच, इनसाइट्स आणि अॅनालिटिक्स मार्केटिंग टीम, सेल्स टीम, फायनान्स टीम आणि डिव्हिजनच्या वरिष्ठ व्यवस्थापनासह विविध प्रोजेक्ट्सवर काम करावं लागेल. तसेच नीलसन (Nielsen), मीडिया एजन्सी यांसारख्या थर्ड पार्टी एनालिटिक्स कंपन्यांसोबत काम करावं लागेल.
पात्रता
अर्थशास्त्र/गणित/स्टॅटिस्टिक्समध्ये बॅचरल डिग्री आणि मार्केटिंग/फायनान्स/स्टॅटिस्टिक्समधील पदव्युत्तर (मास्टर्स) पदवी असलेले उमेदवार या पदासाठी पात्र आहेत.
उमेदवारांकडे डिग्रीसोबतच एडव्हान्स एनालिटिक्समध्ये किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
मार्केटिंग मिक्स, प्रोमो, किमतीतील संबंध आणि सोप्या भाषेत ते व्यक्त करण्याची क्षमता समजून घेतल्यास पदासाठी निवड होण्याची शक्यता वाढू शकते
ट्रेड प्रोमो, एसपीआय (SPI), ईडीएलपी (EDLP), मीडिया (ऑफलाइन, ऑनलाइन), डिजिटल यांसारख्या क्लायंटच्या विभागनिहाय विश्लेषणासाठी उमेदवारांची चाचणी घेतली जाईल.
असा करा अर्ज
कोलगेट-पामोलिव्हच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊनच त्यानंतरच या पोस्टसाठी अर्ज करा. पोस्ट किंवा ईमेलद्वारे पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://bit.ly/3zN4rFv या लिंकवर क्लिक करा आणि अर्ज करा.
अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)