(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IRCON इंटरनॅशनल लिमिटेड अनेक अपरेंटिस पदांसाठी भरती; झटपट अर्ज करा
IRCON Recruitment 2022 : या भरती मोहिमेद्वारे शिकाऊ उमेदवाराची 31 पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदवी आणि पदविका केलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
IRCON International Limited Apprentice Recruitment 2022 : IRCON इंटरनॅशनल लिमिटेडनं शिकाऊ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती मोहिमेद्वारे 31 पदं भरण्यात येणार आहेत. ज्यासाठी उमेदवार IRCON ची अधिकृत साइट ircon.org वर जाऊन अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवार 17 ऑगस्ट 2022 पर्यंत या भरतीसाठी अर्ज करू शकतात. 29 जुलैपासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली.
रिक्त जागांचा तपशील
IRCON इंटरनॅशनल लिमिटेडनं जारी केलेल्या भरती प्रक्रियेद्वारे, पदवीधर शिकाऊ उमेदवारांची 19 पदं आणि तंत्रज्ञ (डिप्लोमा) अप्रेंटिसची 12 पदं भरायची आहेत.
शैक्षणिक पात्रता
या भरती मोहिमेअंतर्गत पदवीधर शिकाऊ पदांसाठी अर्ज करणारा उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात पदवीधर असणं आवश्यक आहे. तर डिप्लोमा अप्रेंटिस या पदांसाठी उमेदवारानं संबंधित विषयात डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा.
वयोमर्यादा
IRCON इंटरनॅशनल लिमिटेडनं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 18 ते 30 वर्ष दरम्यान असावं.
निवड कशी होईल?
या पदांवर गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल. जे शैक्षणिक पात्रतेच्या आधारे तयार केले जाईल.
असा करा अर्ज
- अर्ज करण्यासाठी, उमेदवार प्रथम अधिकृत वेबसाइट ircon.org ला भेट द्या.
- त्यानंतर होमपेजवर दिलेल्या करिअर सेक्शनवर क्लिक करा.
- आता संबंधित पोस्ट निवडावी लागेल आणि अर्जावर क्लिक करावं लागेल.
- त्यानंतर आवश्यक तपशील आणि कागदपत्रं अपलोड करा.
- शेवटी फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट काढा.
भरती प्रक्रियेतील महत्त्वाच्या तारखा
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 29 जुलै 2022
अर्ज प्रक्रियेची शेवटची तारीख : 17 ऑगस्ट 2022
अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.