एक्स्प्लोर

Ghar Banduk Briyani : फँड्री आणि सैराटच्या अभूतपूर्व यशानंतर नागराज मंजुळे यांचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, परश्या पुन्हा दिसणार

Ghar Banduk Briyani Movie : दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 'घर बंदूक बिरयानी' सिनेमा घेऊन येणार आहेत.

Ghar Banduk Briyani Movie : 'फँड्री', 'सैराट' आणि 'नाळ'च्या अभूतपूर्व यशानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओज 'घर बंदूक बिरयानी' सिनेमाची निर्मिती करणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. नागराज मंजुळेंचा अभिनयदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सैराट फेम आकाश ठोसरदेखील चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. आकाश ठोसर आणि नागराजच्या जोडीवर प्रेक्षकांनी प्रेम केले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा नागराज आणि आकाशची जोडी धुमाकूळ घालणार आहे. त्यांना साथ देताना सयाजी शिंदेदेखील चित्रपटात दिसून येणार आहेत. नागराज मंजुळे, आकाश ठोसर, सयाजी शिंदे 'घर बंदूक बिर्याणी' सिनेमात मुख्य भूमिकेत असणार आहेत.

झी स्टुडिओजने लाइट्स, कॅमेरा, अॅक्शन म्हणण्याची वेळ आली आहे, असं म्हणत 'घर बंदूक बिरयानी' सिनेमाचा टीझर ट्विट केला आहे. तर आकाश ठोसरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 'घर बंदूक बिरयानी चांगभलं' म्हणत टीझर शेअर केला आहे. या सिनेमाचे संवाद आणि पटकथा नागराज मंजुळे आणि हेमंत अवताडे यांनी लिहिले आहेत. तर हेमंत अवताडे यांनीच या चित्रपटाचे कृत आहेत. या चित्रपटाला संगीत ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी दिले आहे. झी स्टुडिओजने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नागराज मंजुळे आणि भूषण मंजुळे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर हा सिनेमा 2022 सालात प्रदर्शित करण्यात येणार आहे. 

सलग तीन हीट चित्रपट देण्याचा नागराजचा विक्रम
नागराज मंजुळेंचे फँड्री, सैराट आणि नाळ असे तीन सिनेमे सुपरहिट झाले होते. तिन्ही सिनेमाचे कथानक, बांधणी वेगळ्या पद्धतीची होती. त्यामुळे येणारा 'घर बंदूक बिरयानी' सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 'घर बंदूक बिरयानी' सिनेमाचा टीझर दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर प्रदर्शित करण्यात आला होता. नागराज आणि आकाशची जोडी काय धुमाकूळ घालणार याची प्रेक्षक प्रतिक्षा करत आहेत. सिनेमाच्या टीझरवर सोशल मीडियावर चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. नागराजचे चाहते त्याच्या सिनेमासाठी उत्सुक आहेत. 

आगामी मराठी सिनेमे
जयंती, झिम्मा, गोदावरी, डार्लिंग, फ्री हिट दणका, दे धक्का 2 हे आगामी मराठी सिनेमे लवकरच प्रदर्शित होणार आहेत. जयंती सिनेमा 26 नोव्हेंरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. येत्या 19 नोव्हेंबरला 'झिम्मा' सिनेमा प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन पाहता येणार आहे.  गोदावरी सिनेमा येत्या 3 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. 'डार्लिंग' सिनेमा 10 डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. फ्री हिट दणका चित्रपट येत्या 17 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. 'दे धक्का 2' चित्रपट 1 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

गोदावरी सिनेमाच्या माध्यमातून अभिनेता जितेंद्र जोशी करणार निर्मिती क्षेत्रात पदार्पण
गोदावरी सिनेमा येत्या 3 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. जितेंद्र जोशी, नीणा कुलकर्णी, संजय मोने, गौरी नलावडे, विक्रम गोखले, प्रियदर्शन जाधव, सखी गोकले या कलाकारांच्या यात मुख्य भूमिका आहेत. गोदावरी चित्रपटगृहाचे आंतरराष्ट्रीय समीक्षणदेखील करण्यात आले आहे. गोदावरी सिनेमाच्या माध्यमातून अभिनेता जितेंद्र जोशी निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
बाप रे... विठुरायाच्या पंढरीत तब्बल 147 किलो गांजा जप्त; अमली पदार्थाविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई
बाप रे... विठुरायाच्या पंढरीत तब्बल 147 किलो गांजा जप्त; अमली पदार्थाविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई
वडिलांना औरंगजेबाची उपमा, सुनिल तटकरेंचा लेक संतापला; शिवसेना आमदार थोरवेंचा व्हिडिओ दाखवला
वडिलांना औरंगजेबाची उपमा, सुनिल तटकरेंचा लेक संतापला; शिवसेना आमदार थोरवेंचा व्हिडिओ दाखवला
शॉकिंग! 'या' मठाचा मीच पुजारी अन् मालक म्हणत 64 वर्षीय शिवाचार्य स्वामींना लोखंडी गजाने जबर मारहाण
शॉकिंग! 'या' मठाचा मीच पुजारी अन् मालक म्हणत 64 वर्षीय शिवाचार्य स्वामींना लोखंडी गजाने जबर मारहाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anil Parab Speech : राज्यपालांचं भाषण कबुतराच्या भोXXX ठेवतो, अनिल परब यांचं UNCUT भाषणJob Majha : केंद्रीय औद्योगिक दलात नोकरीची संधी, अटी काय?Maharashtra Superfast | राज्यातील बातम्यांचा आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06PM 06 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
बाप रे... विठुरायाच्या पंढरीत तब्बल 147 किलो गांजा जप्त; अमली पदार्थाविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई
बाप रे... विठुरायाच्या पंढरीत तब्बल 147 किलो गांजा जप्त; अमली पदार्थाविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई
वडिलांना औरंगजेबाची उपमा, सुनिल तटकरेंचा लेक संतापला; शिवसेना आमदार थोरवेंचा व्हिडिओ दाखवला
वडिलांना औरंगजेबाची उपमा, सुनिल तटकरेंचा लेक संतापला; शिवसेना आमदार थोरवेंचा व्हिडिओ दाखवला
शॉकिंग! 'या' मठाचा मीच पुजारी अन् मालक म्हणत 64 वर्षीय शिवाचार्य स्वामींना लोखंडी गजाने जबर मारहाण
शॉकिंग! 'या' मठाचा मीच पुजारी अन् मालक म्हणत 64 वर्षीय शिवाचार्य स्वामींना लोखंडी गजाने जबर मारहाण
Video : तुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या? भय्याजी जोशींचं समर्थन करत सदावर्तेंचा ठाकरेंना बोचरा सवाल
Video : तुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या? भय्याजी जोशींचं समर्थन करत सदावर्तेंचा ठाकरेंना बोचरा सवाल
30 वर्षांपूर्वीच गाव सोडलं, पण भूमिपुत्रासाठी एकवटले बार्शीकर; देशमुखांच्या न्यायासाठी कडकडीत बंद
30 वर्षांपूर्वीच गाव सोडलं, पण भूमिपुत्रासाठी एकवटले बार्शीकर; देशमुखांच्या न्यायासाठी कडकडीत बंद
Nashik Weather Update : मार्चच्या सुरुवातीलाच नाशिककरांना उन्हाची झळ, अंगाची अक्षरशः लाहीलाही; बदलत्या वातावरणामुळे नागरिक हैराण
मार्चच्या सुरुवातीलाच नाशिककरांना उन्हाची झळ, अंगाची अक्षरशः लाहीलाही; बदलत्या वातावरणामुळे नागरिक हैराण
Chine Budget : चीनच्या सुरक्षा बजेटमध्ये 7.2 टक्क्यांची वाढ, भारतासाठी धोका का आहे? चार मोठी कारणे  
चीनच्या सुरक्षा बजेटमध्ये 7.2 टक्क्यांची वाढ, भारतासाठी धोका का आहे? चार मोठी कारणे  
Embed widget