(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Telly Masala : 'अशा प्रकाराला वेळीच ठेचलं पाहिजे'अभिनेता प्रसाद ओकचा संताप ते 'द ग्रेट इंडियन कपिल शो' घेणार प्रेक्षकांचा निरोप; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Prasad Oak : ''अशा प्रकाराला वेळीच ठेचलं पाहिजे...''अभिनेता प्रसाद ओकने व्यक्त केला संताप
Prasad Oak : सध्याच्या काळात अनेकजण सोशल मीडियाचा वापर करतात. रीलच्या माध्यमातून अनेकजण अभिनय करतात.इन्फ्लुएन्सर्सचे व्हिडीओ कंटेट, अॅक्टिंगमुळे अनेकांच्या पसंतीस उतरतात. त्यामुळे सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर्स सध्याच्या काळात सेलिब्रिटी झाले आहेत. यामुळे आता सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर्स आता चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकतात. सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर्सला अशाप्रकारने काम देण्यास अनेक कलाकारांनी विरोध केला आहे. अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओकने (Prasad Oak) यावर तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. अशा ट्रेंडला ठेचून काढले पाहिजे असे वक्तव्य प्रसाद ओकने केले आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
The Great Indian Kapil Show : अरेच्चा! सुरू होताच संपला,'द ग्रेट इंडियन कपिल शो' घेणार प्रेक्षकांचा निरोप; दुसरा सीझन कधी?
The Great Indian Kapil Show : मोठा गाजावाजा करत नेटफ्लिक्सवर सुरू झालेला 'द ग्रेट इंडियन कपिल शो' (The Great Indian Kapil Show) आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. काही एपिसोडनंतर या शोचा पहिला सीझन संपला आहे. या कॉमेडी शोचा शेवटचा एपिसोड संपल्यानंतर व्रॅपअप पार्टीचे फोटो समोर आले आहेत. पहिल्या सीझननंतर आता कपिल शर्माच्या (Kapil Sharma) या कॉमेडी शोचा दुसरा सीझन कधी येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
Dharmendra Marriage : धर्मेंद्र तिसऱ्यांदा अडकले विवाह बंधनात? वरमालासह पत्नीचा फोटो आला समोर
Dharmendra Hema Malini Marriage : मागील काही वर्षांपासून हेमा मालिनी (Hema Malini) राजकारणात चांगल्याच सक्रिय आहेत. सध्या त्या मथुरा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर दुसऱ्यांदा खासदार होण्यासाठी लोकांकडे मते मागत आहेत. याच दरम्यान आता धर्मेंद्र (Dharmendra) यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. बॉलिवूडचे 'हिमॅन' असलेले धर्मेंद्र यांनी तिसऱ्यांदा विवाह केला की काय असा प्रश्न नेटिझन्सना पडला. ड्रिमगर्ल हेमा मालिनी यांच्यासोबत धर्मेंद्र यांना दुसरा विवाह केला होता. आज त्यांनी तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधली का असा प्रश्न नेटिझन्सला पडला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
BJP Chitra Wagh Shiv Sena UBT Election Advt : माझी माफी मागा अन्यथा...; चित्रा वाघ यांनी अॅडल्ट स्टार असल्याचा आरोप केलेल्या अभिनेत्याने दिला इशारा
Ullu Actor Raj Nayani on Chitra Wagh : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने (Shiv Sena UBT) आपल्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर केला असल्याचा आरोप केल्याप्रकरणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) अडचणीत येण्याची शक्यता आहे. चित्रा वाघ यांनी आरोप केलेल्या अभिनेत्याने चित्रा वाघ यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. वाघ यांनी माफी न मागितल्यास आपण कोर्टात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा अभिनेते प्याराली उर्फ राज नयानी (Raj Nayani) यांनी दिला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
TMKOC Gurucharan Singh Missing Case: TMKOC मधील 'सोढी' बेपत्ता प्रकरणी मोठी अपडेट, स्वत: तयार केला प्लान? पोलिसांचे पथक मुंबईत दाखल
TMKOC Actor Gurucharan Singh : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) सोढी ही व्यक्तीरेखा साकारणारे अभिनेते गुरुचरण सिंह (Gurucharan Singh) बेपत्ता होऊन 10 दिवस झाले. दिल्ली पोलिसांनी गुरुचरण सिंह यांचा शोध सुरू केला आहे. गुरुचरण सिंग मागील 10 दिवसांपासून कुठे आहेत, हा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून त्याचे कुटुंबीय आणि चाहत्यांच्या मनात आहे. पोलिसांकडून हा शोध सुरू असताना दुसरीकडे आता ही घटना हे षड्यंत्र आहे की घातपात आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.