The Great Indian Kapil Show : अरेच्चा! सुरू होताच संपला,'द ग्रेट इंडियन कपिल शो' घेणार प्रेक्षकांचा निरोप; दुसरा सीझन कधी?
The Great Indian Kapil Show : 'द ग्रेट इंडियन कपिल शो' चा (The Great Indian Kapil Show) पहिला सीझन प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
The Great Indian Kapil Show : मोठा गाजावाजा करत नेटफ्लिक्सवर सुरू झालेला 'द ग्रेट इंडियन कपिल शो' (The Great Indian Kapil Show) आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. काही एपिसोडनंतर या शोचा पहिला सीझन संपला आहे. या कॉमेडी शोचा शेवटचा एपिसोड संपल्यानंतर व्रॅपअप पार्टीचे फोटो समोर आले आहेत. पहिल्या सीझननंतर आता कपिल शर्माच्या (Kapil Sharma) या कॉमेडी शोचा दुसरा सीझन कधी येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
फक्त पाच एपिसोड ऑन एअर
नेटफ्लिक्सवर 'द ग्रेट इंडियन कपिल शो'ची सुरुवात झाली. पहिल्याच एपिसोडला रणबीर कपूर, नीतू कपूर आणि रिद्धिमा कपूर यांनी हजेरी लावली होती. त्यानंतरच्या एपिसोडमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, श्रेयस अय्यर यांनी हजेरी लावली. दिलजीत दोसांझ, परिणीत चोप्रा आणि दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी चमकीला चित्रपटाच्या प्रमोशन निमित्ताने हजेरी लावली होती. त्याशिवाय अभिनेता विकी कौशल आणि त्याचा भाऊ सनी कौशल, आमिर खान यांनी हजेरी लावली. तर, येत्या शनिवारी सनी देओल आणि बॉबी देओल 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये हजेरी लावणार आहेत. हा सहावा एपिसोड असणार आहे.
View this post on Instagram
लवकरच येणार दुसरा सीझन
अभिनेता किकू शारदा याने 'न्यूज 18' ला सांगितले की, 1 मे रोजी शोच्या शेवटच्या चित्रीकरण पार पडले. आतापर्यंत पाचच एपिसोड ऑनएअर गेले आहेत. मात्र, उर्वरित आठ एपिसोड लवकरच रिलीज होणार आहेत. त्यानंतर कपिल शर्मा छोटा ब्रेक घेईल आणि दुसऱ्या सीझनसह परतेल.
आणखी 8 एपिसोड ऑन एअर येणार
किकू शारदाने सांगितले की,'आम्ही 13 एपिसोडचे शूटिंग केले असून दुसरा सीझन लवकरच येणार आहे. आम्ही नुकताच पहिला सीझन पूर्ण केला. आधीपासूनच याचे असेच प्लानिंग होते आणि दुसरा सीझनही प्रेक्षकांच्या भेटीस येईल. हा कार्यक्रम बराच काळ टीव्हीवर टेलिकास्ट होत असे. पण, काहीतरी वेगळं करावे म्हणून डिजीटल प्लॅटफॉर्मवर आलो असल्याचे त्याने सांगितले.