एक्स्प्लोर

TMKOC Gurucharan Singh Missing Case: TMKOC मधील 'सोढी' बेपत्ता प्रकरणी मोठी अपडेट, स्वत: तयार केला प्लान? पोलिसांचे पथक मुंबईत दाखल

TMKOC Gurucharan Singh Missing Case : गुरुचरण सिंग मागील 10 दिवसांपासून कुठे आहेत, हा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून त्याचे कुटुंबीय आणि चाहत्यांच्या मनात आहे.

TMKOC Actor Gurucharan Singh :  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) सोढी ही व्यक्तीरेखा साकारणारे अभिनेते गुरुचरण सिंह (Gurucharan Singh) बेपत्ता होऊन 10 दिवस झाले. दिल्ली पोलिसांनी गुरुचरण सिंह यांचा शोध सुरू केला आहे.  गुरुचरण सिंग मागील 10 दिवसांपासून कुठे आहेत, हा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून त्याचे कुटुंबीय आणि चाहत्यांच्या मनात आहे. पोलिसांकडून हा शोध सुरू असताना दुसरीकडे आता ही घटना हे षड्यंत्र आहे की घातपात आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

गुरुचरण सिंह हे 22 एप्रिलपासून दिल्ली विमानतळ परिसरातून बेपत्ता झाले आहेत. अभिनेता गुरुचरण सिंहने आपला मोबाईल फोन हा पालम परिसरात सोडला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. न्यूज 18 ला दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फूटेजनुसार, गुरुचरण सिंह हे एका ई-रिक्षातून दुसऱ्या रिक्षात बसताना दिसले आहेत. सर्व काही पूर्वनियोजित प्लान आखून त्यांनी दिल्ली सोडली असल्याचा संशय पोलिसांना असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

मुंबईत चौकशी सुरू?

गुरुचरण सिंह यांचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलिसांनी विविध तपास पथके नियुक्त केली आहेत. त्यातील एक पथक मुंबईत दाखल झाले असून त्यांनी गुरुचरण सिंह यांच्याबाबत कलाकारांकडे  चौकशी केल्याचे वृत्त आहे. गुरुचरण सिंह यांच्याबाबत अधिक माहिती घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

गुरुचरण सिंह  शेवटचे कधी दिसले होते?

22 एप्रिल रोजी गुरुचरण सिंह हे अखेरचे दिसले होते. चार दिवसांनंतर त्यांच्या वडिलांनी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांमध्ये दाखल असलेल्या तक्रारीनुसार, 22 एप्रिल रोजी गुरुचरण सिंह हे  सकाळी 8:30 वाजता मुंबईला जाण्यासाठी निघाले. पण, मुंबईला पोहोचला नाही, घरीही परतला नाही आणि त्याचा फोनही लागत नाही. गुरुचरण सिंह हे मानसिकदृष्ट्या स्थिर असल्याची  माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. 

'तारक मेहता का...'मध्ये महत्त्वाची भूमिका

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये गुरुचरण सिंह यांनी रोशन सिंग सोढीची भूमिका साकारली होती. या व्यक्तिरेखेद्वारे त्यांनी नेहमीच लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणले. ते नेहमीच पार्टी मोडमध्ये असणारे पात्र होते. पण पत्नीवरचे प्रेम व्यक्त करण्यास तो कधीच मागे हटत नाही. शो मधील सर्वात लोकप्रिय पात्रांपैकी एक होता. गुरुचरण सिंह यांनी 2020 मध्ये हा शो सोडला.  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बिग बॉसच्या घरात प्रेमाचे रंग, तासनतास एकत्र; बाहेर पडताच करण सोनावणे स्पष्टच म्हणाला....
बिग बॉसच्या घरात प्रेमाचे रंग, तासनतास एकत्र; बाहेर पडताच करण सोनावणे स्पष्टच म्हणाला....
'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त...' घराबाहेर पडताच करण सोनावणेची 'ती' पोस्ट चर्चेत; पुन्हा बिग बॉसमध्ये जाणार?
'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त...' घराबाहेर पडताच करण सोनावणेची 'ती' पोस्ट चर्चेत; पुन्हा बिग बॉसमध्ये जाणार?
'ए पुष्पा I Love You रे..' सागर कारंडे करतोय राखी सावंतसोबत फ्लर्टिंग; दोघांमध्ये नेमकं चाललंय काय?
'ए पुष्पा I Love You रे..' सागर कारंडे करतोय राखी सावंतसोबत फ्लर्टिंग; दोघांमध्ये नेमकं चाललंय काय?
बिग बॉसच्या घरातून आठवडाभरातच राखी सावंतला हाकललं; कन्फेशन रुममध्ये बोलावलं अन् खेचून बाहेर काढलं, कारण काय?
बिग बॉसच्या घरातून आठवडाभरातच राखी सावंतला हाकललं; कन्फेशन रुममध्ये बोलावलं अन् खेचून बाहेर काढलं, कारण काय?

व्हिडीओ

Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2026 | मंगळवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2026 | मंगळवार
Vaibhav suryavanshi: तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
भारत-अमेरिका व्यापारी करार अंतिम टप्प्यात; भारतीय टीम पुढील आठवड्यात US दौऱ्यावर 
भारत-अमेरिका व्यापारी करार अंतिम टप्प्यात; भारतीय टीम पुढील आठवड्यात US दौऱ्यावर 
2026 चे वर्ष दोन्ही देशांसाठी ट्रर्निंग पाँईंट; मोदींचं फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसमोर भाषण, सावरकरांच्या उडीची आठवण
2026 चे वर्ष दोन्ही देशांसाठी ट्रर्निंग पाँईंट; मोदींचं फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसमोर भाषण, सावरकरांच्या उडीची आठवण
सुनिल तटकरेंची रवींद्र चव्हाणांसोबत ZP पे चर्चा; राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन, CBI चौकशीची मागणी
सुनिल तटकरेंची रवींद्र चव्हाणांसोबत ZP पे चर्चा; राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन, CBI चौकशीची मागणी
Rohit Pawar and Ajit Pawar: राष्ट्रवादीतील स्वत:चं महत्त्व टिकवण्यासाठी काही नेते शरद पवारांना विरोध करतायत, आमदारांनाही धमकावलं? रोहित पवारांचा खळबळनजक दावा
राष्ट्रवादीतील स्वत:चं महत्त्व टिकवण्यासाठी काही नेत्यांचा शरद पवारांना विरोध, आमदारांना धमकावलं? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
बुलेटवरुन मुलींना कट मारण्याचा स्टंट; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन तरुणांचा मृत्यू, नागपूरमधील घटना
बुलेटवरुन मुलींना कट मारण्याचा स्टंट; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन तरुणांचा मृत्यू, नागपूरमधील घटना
हर्षवर्धन सपकाळांकडून शिवप्रेमींची दिलगिरी; भाजपचा खोडसाळपणा म्हणत वक्तव्याचा अर्थही समजावला
हर्षवर्धन सपकाळांकडून शिवप्रेमींची दिलगिरी; भाजपचा खोडसाळपणा म्हणत वक्तव्याचा अर्थही समजावला
Embed widget