एक्स्प्लोर

डोंबिवलीत रंगाचा बेरंग, रंगाचा फुगा लागल्यानं वाद, तरुणावर धारधार शस्त्रानं जीवघेणा हल्ला 

होळी खेळताना रंगाचा फुगा  तरुणाला लागल्याने त्या तरुणाने फुगा मारणाऱ्या 17 वर्षीय तरुणावर धारदार वस्तुने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे.

Dombivli Crime News : देशभरात होळीसह धुळवडची सण उत्साहात सुरु असतानाच डोंबिवलीत (Dombivli ) रंगाचा बेरंग करणारी घटना समोर आली आहे. होळी खेळताना रंगाचा फुगा  तरुणाला लागल्याने त्या तरुणाने फुगा मारणाऱ्या 17 वर्षीय तरुणावर धारदार वस्तुने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रस्त्यावरील सागाव येथील यशवंत काम्प्लेक्स परिसरात घडली आहे. याप्रकरणी 17 वर्षीय हर्ष कांबळे याच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी हल्ला करणाऱ्या तरुणाविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. प्रणय जाधव असे हल्लेखोर तरुणाचं नाव आहे.

नेमकी कशी घडली घटना?

हर्ष कांबळे हा गुरुवारी रात्री साडे आठच्या सुमारास डोंबिवली पूर्वेडील सागाव येथील यशवंत काम्प्लेक्स परिसरात मित्रांसोबत होळीनिमित्त रंगाचे फुगे एकमेकांवर फेकून होळीचा आनंद साजरा करत असतानाच यशवंत काम्प्लेक्समधील प्रणय हा तरुण या मौजमजेत सहभागी न होता तो लांबून बघत होता. तर दुसरीकडे  रंगाचे फुगे मित्र एकमेकांवर फेकत होते. त्यावेळी एक फुगा अल्पवयीन तक्रारदार तरुणाकडून चुकून बाजुला उभ्या असलेल्या प्रणयच्या अंगावर जाऊन पडला. त्यावेळी बाजुला उभा असलेला यशवंत काम्प्लेक्स मधील तरुण साई विधी सोसायटीतील तरुणाच्या अंगावर जाब विचारण्यासाठी आला. त्याने तू आपल्या अंगावर रंगाचा फुगा का फेकला, असे प्रश्न करत अल्पवयीन हर्षला शिवीगाळ करत ठोशाबुक्क्याने मारहाण केली. तसेच त्याचा टी शर्ट पकडून त्याला शंकेश्वर शाळेजवळील अंधार असलेल्या कोपऱ्यात जबरदस्तीने नेले. तेथे त्याच्या हाताच्या दंडावर धारदार वस्तुने मारुन  गंभीर जखमी केले.  दरम्यान या घटनेमुळं परिसरात काही वेळ  तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

आज देशभरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा

आज देशभरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सामान्यांपासून ते खास लोकांपर्यंत, आज सर्वजण होळीच्या रंगात रंगलेले दिसत आहेत. होळीच्या या निमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान मोदी यांनीही देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय देशभरातील विविध सेलिब्रिटी होळीच्या शुभेच्छा देत आहेत. यावेळी होळीसोबतच रमजानच्या जुम्माच्या नमाजचा दिवसही आहे. यामुळे देशातील विविध ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. मात्र, होळीच्या सणाच्या या उत्सवात डोंबिवलीमध्ये तरुणावर धारदार वस्तुने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

सावधान! होळी, रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांकडून कडक नियमावली जाहीर, 12 मार्च ते 18 मार्चदरम्यान नियम लागू 

महत्त्वाच्या बातम्या

Pradeep Purnekar : 'मिनाक्षी शिंदेला पाठीशी का घातलं जातंय? तिला फरफटत पोलीस स्टेशनला आणल्याशिवाय हटणार नाही'; विजेता पूर्णेकर संतापल्या, एकनाथ शिंदेवरही भडकल्या
'मिनाक्षी शिंदेला पाठीशी का घातलं जातंय? तिला फरफटत पोलीस स्टेशनला आणल्याशिवाय हटणार नाही'; विजेता पूर्णेकर संतापल्या, एकनाथ शिंदेवरही भडकल्या
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी; चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, आजही तीच भूमिका
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी; चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, आजही तीच भूमिका
Pradeep Purnekar : राज्याच्या गृहमंत्र्याला पोलीस जर 100 दिवस कोठडीत ठेवू शकतात तर मग मिनाक्षी शिंदेला अटक का करत नाहीत? प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीचा सवाल
राज्याच्या गृहमंत्र्याला पोलीस जर 100 दिवस कोठडीत ठेवू शकतात तर मग मिनाक्षी शिंदेला अटक का करत नाहीत? प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीचा सवाल
मला अस्वस्थ वाटतंय, गाडीत झोपतो, पोलीस स्टेशनला निघालेल्या सीनियर पीआयला हृदविकाराचा धक्का, गाडीतच मृत्यू!
मला अस्वस्थ वाटतंय, गाडीत झोपतो, पोलीस स्टेशनला निघालेल्या सीनियर पीआयला हृदविकाराचा धक्का, गाडीतच मृत्यू!

व्हिडीओ

Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pradeep Purnekar : 'मिनाक्षी शिंदेला पाठीशी का घातलं जातंय? तिला फरफटत पोलीस स्टेशनला आणल्याशिवाय हटणार नाही'; विजेता पूर्णेकर संतापल्या, एकनाथ शिंदेवरही भडकल्या
'मिनाक्षी शिंदेला पाठीशी का घातलं जातंय? तिला फरफटत पोलीस स्टेशनला आणल्याशिवाय हटणार नाही'; विजेता पूर्णेकर संतापल्या, एकनाथ शिंदेवरही भडकल्या
Gold Price: सोन्याच्या दरात घसरण सुरुच मात्र 2027 मध्ये सोनं 2 लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा मोठा अंदाज
सोन्याच्या दरात घसरण सुरुच मात्र 2027 मध्ये सोनं 2 लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा मोठा अंदाज
Pune Teacher Election Result : लोकशाहीतील मतदानाच्या परीक्षेत तब्बल 1675  गुरुजींची मतं बाद, पुणे शिक्षकमधील धक्कादायक आकडेवारी समोर
पुणे शिक्षकच्या निवडणुकीत 1675  गुरुजींची मतं बाद, मतमोजणीवेळी धक्कादायक आकडेवारी समोर
Indian Railway Travel Insurance : अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी; चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, आजही तीच भूमिका
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी; चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, आजही तीच भूमिका
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत

Embed widget