Telly Masala : शाहरुख खानचा डंकी ओटीटीवर रिलीज ते स्कायडायविंग करत 13,000 हजार फूटावरुन केलं 'योद्धा' सिनेमाचं पोस्टर लॉन्च; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Dunki OTT release: अखेर प्रतीक्षा संपली! शाहरुख खानचा डंकी ओटीटीवर रिलीज, कसा आणि कुठे पाहाल सिनेमा?
बॉलीवूडचा किंग खान अर्थातच शाहरुखच्या (Shah Rukh Khan) 'डंकी' (Dunki) या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर तुफान कमाई केली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांनी देखील भरभरुन प्रेम दिलं होतं. सिनेमागृहात रिलीज झाल्यानंतर, प्रेक्षक या सिनेमाची ओटीटी माध्यमावर आतुरतेने वाट पाहत होते. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने शाहरुखने चाहत्यांना सरप्राईज देणार असल्याचं म्हटलं होतं आणि अखेर किंग खानने चाहत्यांना खूश केले आहे. शाहरुखचा डंकी हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झालाय.
बातमी सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा
Yodha Poster Launch : स्कायडायविंग करत 13,000 हजार फूटावरुन केलं 'योद्धा' सिनेमाचं पोस्टर लॉन्च, सिद्धार्थ मल्होत्राने व्हिडिओ शेअर करत म्हटलं...
बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) मुख्य भूमिकेत असलेला 'योद्धा' (Yodha) हा चित्रपट येत्या 15 मार्च रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. तसेच 19 फेब्रुवारी रोजी योद्धा चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात येईल. त्याआधी म्हणजेच 15 फेब्रुवारी रोजी योद्धा चित्रपटाचे पोस्टर लॉन्च करण्यात आले. जवळपास 13,000 हजार फूट उंचावरुन हे पोस्टर लॉन्च करण्यात आले आहे.
बातमी सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा
Zee Marathi Serial : 'पुन्हा कर्तव्य आहे' , 'झी मराठी'वर सुरु होणार नवी गोष्ट, 'ही' नवी जोडी झळकणार मुख्य भूमिकेत
: 'झी मराठी' (Zee Marathi) वाहिनीवर 'पुन्हा कर्तव्य आहे' (Puna Kartvya Ahe) ही नवी मालिका लवकरच सुरु होणार आहे. या मालिकेत अभिनेता अक्षय म्हात्रे (Akshay Mhatre) आणि अक्षया हिंदळकर(Akshaya Hindalkar) ही नवी कोरी जोडी झळकणार आहे. दरम्यान ही मालिका झी टीव्हीवरील एका हिंदी मालिकेचा रिमेक असून पुन्हा लग्न करण्याच्या संकल्पनेवर आधारित या मालिकेची गोष्ट आहे. नुकताच वाहिनीकडून या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.
बातमी सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा
Shah Rukh Khan : 'तू बॉलिवूड सोड, पिझ्झा बनव'; किंग खानच्या 'त्या' काळात पत्नी गौरीनं दिलेला सल्ला, शाहरुखनं शेअर केला किस्सा
बॉलीवूडचा (Bollywood) किंग खान अर्थातच शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने नुकतच दुबईत आयोजित करण्यात आलेल्या 'वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट'ला हजेरी लावली होती. यावेळी शाहरुखने त्याच्या फ्लॉप चित्रपटांनंतर 4 वर्षांचा घेतलेला ब्रेक यावर भाष्य केलं आहे. तसेच मी त्यावेळी करिअर संपवण्याचा निर्णय घेतला होता, असा खुलासा देखील शाहरुखने केला. त्या 4 वर्षांमध्ये शाहरुख पिझ्झा बनवला होता. त्यावेळी त्याची पत्नी गौरी खान (Gauri Khan) हीने त्याला सिनेमे सोडून पिझ्झा बनवण्याचा मजेशीर सल्ला दिला होता, असा किस्सा शाहरुखने शेअर केला.
बातमी सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा
Namdeo Dhasal Biopic : पुरोगामी महाराष्ट्राला आरसा दाखणारा 'पँथर' परत येतोय; नामदेव ढसाळांचा झंझावत मोठ्या पडद्यावर
पुरोगामी महाराष्ट्राला आपल्या कविता, आक्रमक भाषणातून आरसा दाखवणारे महाकवी नामदेव ढसाळ (Namdeo Dhasal) यांचा अन्याय, शोषणाविरोधातील संघर्ष आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. नामदेव ढसाळ यांच्या बंडखोर कवितांनी अवघे साहित्य विश्व ढवळून निघाले होते. तर, दलित पँथरने (Dalit Panthers) राज्यातील अनुसूचित जातींवरील अत्याचाराला वाचा फोडली. पँथर आणि नामदेव ढसाळ यांच्या कवितांनी झंझावात निर्माण केला होता. आता, हाच झंझावत मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. नामदेव ढसाळ यांच्या जयंती दिनी 'ढसाळ' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली.