Yodha Poster Launch : स्कायडायविंग करत 13,000 हजार फूटावरुन केलं 'योद्धा' सिनेमाचं पोस्टर लॉन्च, सिद्धार्थ मल्होत्राने व्हिडिओ शेअर करत म्हटलं...
Yodha Poster Launch : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा योद्धा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच याचे पोस्टर एका वेगळ्या पद्धतीने लॉन्च करण्यात आले आहे.
Yodha Poster Launch : बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) मुख्य भूमिकेत असलेला 'योद्धा' (Yodha) हा चित्रपट येत्या 15 मार्च रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. तसेच 19 फेब्रुवारी रोजी योद्धा चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात येईल. त्याआधी म्हणजेच 15 फेब्रुवारी रोजी योद्धा चित्रपटाचे पोस्टर लॉन्च करण्यात आले. जवळपास 13,000 हजार फूट उंचावरुन हे पोस्टर लॉन्च करण्यात आले आहे.
मागील अनेक दिवसांपासून सिद्धार्थ मल्होत्राच्या योद्धा या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. तसेच या चित्रपटाची उत्सुकता देखील लागून राहिली आहे. हीच प्रेक्षकांची उत्सुकता आता लवकरच संपणार असल्याची माहिती पुढे येत आहे. योद्धा हा चित्रपट 8 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण त्यावेळी या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती.
सिनेसृष्टीत पहिलाच प्रयोग
चित्रपटांच्या संदर्भात सिनेसृष्टीत अनेक नवनवीन प्रयोग केले जातात. बऱ्याचदा चित्रपटांचे प्रमोशन देखील वेगळ्या पद्धतीने केले जाते. पण पहिल्यांचा एका चित्रपटाचे पोस्टर अत्यंत अनोख्या पद्धतीने लॉन्च करण्यात आले आहे. स्कायडायविंग करत योद्धा चित्रपटाचे पोस्टर 13,000 हजार फूट उंचावरुन लॉन्च करण्यात आले आहे. यासंदर्भात सिद्धार्थ मल्होत्रा याने सोशल मीडियावर या पोस्टर लॉन्चचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच बॉलीवूड किंबहुना भारतीय सिनेसृष्टीतला हा पहिलाच प्रयोग असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर प्रतिक्रिया
सिद्धार्थ मल्होत्रा याने शेअर केलेल्या या व्हिडिओवर सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच अनेकांनी हा व्हिडिओ शेअर करत चित्रपटाबाबत उत्सुकता असल्याचं म्हटलं आहे. तसेच या चित्रपटाच्या प्रोमोची देखील प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.
सिद्धार्थ मल्होत्रासोबत योद्धामध्ये झळकरणार 'हे' कलाकार
'योद्धा' या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रासह दिशा पटानी (Disha Patani) आणि राशी खन्ना (Raashii Khanna) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. करण जोहर, शशांक खेतान, अपूर्व मेहता यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसेच पुष्कर ओझा आणि सागर आंब्रे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अॅक्शन आणि रोमांचचा या चित्रपटात धमाका असल्याचं यापूर्वी सिद्धार्थने सांगितलं होतं. त्याच पद्धतीने आता योद्धाचं पोस्टर लॉन्च करण्यात आलं आहे.