एक्स्प्लोर

Zee Marathi Serial : 'पुन्हा कर्तव्य आहे' , 'झी मराठी'वर सुरु होणार नवी गोष्ट, 'ही' नवी जोडी झळकणार मुख्य भूमिकेत

Zee Marathi Serial : झी मराठी वाहिनीवर सध्या नव्या मालिका सुरु होत असून पुन्हा कर्तव्य आहे ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Punha Kartvya Ahe : 'झी मराठी' (Zee Marathi) वाहिनीवर 'पुन्हा कर्तव्य आहे' (Puna Kartvya Ahe) ही नवी मालिका लवकरच सुरु होणार आहे. या मालिकेत अभिनेता अक्षय म्हात्रे (Akshay Mhatre) आणि अक्षया हिंदळकर(Akshaya Hindalkar) ही नवी कोरी जोडी झळकणार आहे. दरम्यान ही मालिका झी टीव्हीवरील एका हिंदी मालिकेचा रिमेक असून पुन्हा लग्न करण्याच्या संकल्पनेवर आधारित या मालिकेची गोष्ट आहे. नुकताच वाहिनीकडून या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. 

आयुष्यातला जोडीदार गेल्यानंतर एकट्याने मुलांची जबाबदारी सांभाळणं आणि त्या मुलांना आई किंवा वडिल नसण्याची कमतरता भासणं असा सर्वसाधारणपणे या गोष्टीचा आशय आहे. झी टीव्हीवर 'पुनर्विवाह - जिंदगी मिलेगी दोबारा' ही हिंदी मालिका होती. याच हिंदी मालिकेचा हा रिमेक असणार आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

'ही' नवी जोडी झळकणार मालिकेत

या मालिकेत अभिनेता अक्षय म्हात्रे आणि अक्षया हिंदळकर ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता अक्षय म्हात्रे हा हिंदी मालिका विश्वात काम करत होता. त्यानंतर आता तो मराठी मालिकेत झळकणार आहे. तसेच अभिनेत्री अक्षया हिंदळकर ही देखील मराठी मालिकांमध्ये झळकली होती. या दोघांसह या मालिकेमध्ये वंदना सरदेसाई, पंकज चेंबूरकर, सुदेश म्हाशीलकर आणि रेयांश जुवाटकर हे कलाकार असणार आहेत. 

झी मराठीवर नव्या मालिकांची सुरुवात 

सध्या झी मराठीवर अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. शिवा, पारु या दोन नव्या मालिका झी मराठी वाहिनीवर 12 फेब्रुवारीपासून सुरु झाल्या आहेत. तसेच येत्या काळामध्ये अभिनेता राकेश बापट हा नवरी मिळे हिटलरला ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामुळे झी मराठीवर अनेक नव्या मालिका सुरु होणार असून जुन्या मालिका बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे ही मालिका सुरु  झाल्यानंतर कोणत्या जुन्या मालिकेला ब्रेक लागणार आणि कोणत्या वेळेत ही मालिका सुरु होणार हे येत्या काही काळातच स्पष्ट होणार आहे.  

ही बातमी वाचा : 

Shiva Zee Marathi Serial : बंद करा आता, काहीही दाखवता; शिवा मालिकेच्या पहिल्याच एपिसोडच्या 'त्या' दृष्यावर नेटकरी चवताळले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण  कॅमेऱ्यात कैद
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी सोडवणार पेपर
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी सोडवणार पेपर
RBI Rule : नववर्षातील पहिला धक्का, 1 जानेवारीपासून तीन प्रकारची बँक खाती बंद होणार, आरबीआयचा मोठा निर्णय, कारण समोर
नववर्षातील पहिला धक्का, 1 जानेवारीपासून तीन प्रकारची बँक खाती बंद होणार, आरबीआयचा मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 31 December 2024Sandeep Kshirsagar Full PC : दोषी नाही तर फरार का झालात? संदीप क्षीरसागरांचा कराडला सवालDhananjay Deshmukh : कराडच्या शरणागतीनंतर मस्साजोगमध्ये भीतीचं वातावरण? देशमुख काय म्हणाले?Walmik Karad Surrendered : गुन्हा दाखल झाला तेव्हा कराड उजैनला होते, माजी नगरसेवकाचा दावा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण  कॅमेऱ्यात कैद
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी सोडवणार पेपर
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी सोडवणार पेपर
RBI Rule : नववर्षातील पहिला धक्का, 1 जानेवारीपासून तीन प्रकारची बँक खाती बंद होणार, आरबीआयचा मोठा निर्णय, कारण समोर
नववर्षातील पहिला धक्का, 1 जानेवारीपासून तीन प्रकारची बँक खाती बंद होणार, आरबीआयचा मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
'उत्सव रंगभूमीचा, सोहळा शिवराज्याभिषेकाचा' ब्रीदवाक्यासह 'अहिल्यानगर महाकरंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा जानेवारीत रंगणार
जानेवारीत रंगणार 'अहिल्यानगर महाकरंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, रंगकर्मींकडून जय्यत तयारी सुरु
Gold : कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
Vaibhav Suryavanshi: 6,6,6,6  अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा विजय हजारे ट्रॉफीत धमाका 
6,6,6,6 अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची विजय हजारे ट्रॉफीत धमाकेदार फलंदाजी
वाल्मिक कराड CID समोर शरण, मिलिंद नार्वेकरांकडून फडणवीस अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन; दमानियांकडून फिरकी, म्हणाल्या...
वाल्मिक कराड शरण येताच मिलिंद नार्वेकरांचं ट्विट, मुख्यमंत्री अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन करत म्हणाले...
Embed widget