Mayur Vakani: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेत्यानं तयार केला नरेंद्र मोदींचा पुतळा; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव
मयूरनं नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा पुतळा तयार केला आहे. या पुतळ्याचा फोटो मयूरनं सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Mayur Vakani: अभिनेता मयूर वकानीनं (Mayur Vakani) 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेमध्ये सुंदर ही भूमिका साकारली. मयूरला या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. मयूर सध्या त्याच्या एका सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आहे. मयूरनं नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा पुतळा तयार केला आहे. या पुतळ्याचा फोटो मयूरनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. मयूरच्या या पोस्टला नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.
मयूरनं शेअर केला फोटो
मयूरनं त्यानं तयार केलेल्या नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला मयूरनं कॅप्शन दिलं, ''सेल्फी विथ पीएम', मी आणि माझ्या टीमने तयार केलेल्या पुतळ्याला फायनल टच देताना' मूयरनं शेअर केलेल्या फोटोमध्ये मयूर हा त्याच्या टीमसोबत पुतळ्याला फायनल टच देताना दिसत आहे. मयूरच्या या पोस्टला नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'खूप छान काम केलं सुंदर भाई'
मयूर वकानी हा अभिनेत्री दिशा वकानी यांचा भाऊ आहे. दिशा यांनी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेमध्ये दया ही भूमिका साकारली. तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील दिशा आणि मयूर यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
View this post on Instagram
28 जुलै 2008 रोजी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. ‘देवदास’, ‘मंगल पांडे', ‘जोधा अकबर’, ‘लव्ह स्टोरी 2050’ या चित्रपटांमध्ये दिशाने काम केले आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Disha Vakani: दयाबेनला कॅन्सरची लागण? सुंदर अन् जेठालालनं दिली प्रतिक्रिया