Marathi Serials : आवाज मराठीचा! 'स्टार प्रवाह परिवारा'चा आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीला धोबीपछाड, रचला नवा विक्रम
Marathi Serials TVR : स्टार प्रवाहच्या (Star Pravah) 'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag), साधी माणसं (Sadhi Mansa) आणि 'घरोघरी मातीच्या चुली' (Gharoghari Matichya Chuli) या मालिकांनी टीव्हीआरमध्ये (TVR) बाजी मारली आहे.
Marathi Serials TVR Rating : मराठी मालिकाविश्वात (Marathi Serials) विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका प्रसारित होत आहेत. झी मराठी (Zee Marathi), कलर्स मराठी (Colours Marathi), सोनी मराठी (Sony Marathi) अशा विविध चॅनल्सवर या मालिकांचं प्रसारण होत आहे. नुकतचं टीव्हीआर (TVR)रेटिंग समोर आलं आहे. टीव्हीआर रेटिंगमध्ये स्टार प्रवाहच्या (Star Pravah) 'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag), साधी माणसं (Sadhi Mansa) आणि 'घरोघरी मातीच्या चुली' (Gharoghari Matichya Chuli) या मालिकांनी बाजी मारली आहे. टीव्हीआर रेटिंगमध्ये IPL च्या ओपनिंग रेसेमनीलादेखील (IPL 2024 Opening Ceremony) स्टार प्रवाह परिवार पुरस्कारने (Star Pravah Parivar Puraskar 2024) मागे टाकलं आहे. महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या टेलिव्हिजन इतिहासात सर्वोच्च Viewership मिळवणारी स्टार प्रवाह एकमेव वाहिनी ठरली आहे.
टीव्हीआर रेटिंगमध्ये कोण ठरलं अव्वल? (Marathi Serials TVR Rating)
छोट्या पडद्यावरील 'ठरलं तर मग' ही मालिका गेल्या काही दिवसांपासून टीआरपीच्या (TRP) शर्यतीत बाजी मारतआहे. आता टीव्हीआर रेटिंगमध्येही ही मालिका अव्वल ठरली आहे. महाराष्ट्राच्या या नंबर वन मालिकेला 8.9 टीव्हीआर रेटिंग मिळाले आहे. 'साधी माणसं' (Sadhi Mansa) या मालिकेला 5.8 टीव्हीआर रेटिंग मिळाले आहे. संध्याकाळी 7 वाजताचा पहिल्या दिवशीचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा शो लाँन्च ठरला आहे. तसेच स्टार प्रवाहच्या'घरोघरी मातीच्या चुली' (Gharoghari Matichya Chuli) या महाराष्ट्राच्या महाविक्रमी मालिकेला 6.8 टीव्हीआर मिळाले आहे. महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासातील पहिल्या दिवशी सर्वोच्च TVR मिळवणारी ही एकमेव मालिका ठरली आहे. टीव्हीआर रेटिंगमध्ये बाजी मारलेल्या 'ठरलं तर मग' आणि 'घरोघरी मातीच्या चुली' या दोन्ही मालिकांची निर्मिती सुचित्रा आदेश बांदेकर (Suchitra Aadesh Bandekar) यांच्या सोहम प्रोडक्शनने (Soham Production) केली आहे.
'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2024'ने मारली बाजी! (Star Parivaar Puraskar 2024)
स्टार प्रवाह ही महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी आहे. या वाहिनीच्या 'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2024'ला (Star Parivaar Puraskar 2024) 6.1 टीव्हीआर मिळाले आहे. जवळपास 1.5 कोटी लोकांनी हा भव्यदिव्य पुरस्कार सोहळा पाहिल्याचं समोर आलं आलं आहे. स्टार स्पोर्ट्सवरील आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीला (IPL 2024 Opening Ceremony) 4.3 टीव्हीआर मिळाला आहे. झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्याला 1.6 टीव्हीआर मिळाले आहे. त्याचदिवशी सोनी मॅक्सवर सुरू असणाऱ्या 'अॅनिमल' (Animal) या चित्रपटाला 1.5 टीव्हीआर मिळाला आहे. स्टार गोल्डवर सुरू असलेल्या 'टायगर 3' (Tiger 3) या चित्रपटाला 1.0 टीव्हीआर मिळाला आहे. तसेच झी टीव्हीवरील झी सिने अवॉर्ड्सला 0.9 टीव्हीआर मिळाला आहे.
"टीमवर्कमुळे मालिकेला यश मिळालं, प्रेक्षकांचे आभार" : जुई गडकरी
जुई गडकरी एबीपी माझाशी बोलताना म्हणाली,"खूप आनंद झाला आहे. एवढी वर्षे ज्याची वाट पाहत होते ते आता घडायला सुरुवात झाली आहे. खरंतर सर्वांचीच मेहनत आहे. देवाची माझ्यावर कृपा आहे. दोन वर्षे मी मनोरंजनसृष्टीतून तब्येतीच्या कारणाने गॅप घेतला होता. दरम्यान अनेक मालिकांसाठी विचारणा होत होत्या. 'ठरलं तर मग' या मालिकेसाठी माझं कास्टिंग फक्त 10 मिनिटांत झालं आहे. देवानेच हे सर्व घडवून आणलं आहे. एका चांगल्या कलाकृतीसाठी आणि भूमिकेसाठी एवढी वर्षे वाट पाहणं ही एका अभिनेत्रीसाठी मोठी गोष्ट आहे. कमबॅकनंतर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. त्यांचे मी आभार मानते. येत्या काही दिवसांत मालिका आणखी रंजक होत जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी एकही भाग न चुकवला मालिका पाहावी".
संबंधित बातम्या