April 2024 Marathi Movie Release : एप्रिल महिन्यात मराठी चित्रपटांची 'रणधुमाळी'; संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटीलसह 'हे' चित्रपट रिलीज होणार
Marathi Movie Release on April 2024 : एप्रिल महिन्यात मराठी चित्रपटांची रणधुमाळी असणार आहे. 'संघर्षसोद्धा मनोज जरांगे पाटील' (Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil) या चित्रपटासह आणखी काही मराठी चित्रपट या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
Marathi Movie Release on April 2024 : एप्रिल (April) महिन्यात बॉलिवूडसह (Bollywood) अनेक मराठी चित्रपटदेखील (Marathi Movie) प्रदर्शित होणार आहेत. एकंदरीत एप्रिल महिन्यात मराठी चित्रपटांची रणधुमाळी असणार आहे. 'संघर्षसोद्धा मनोज जरांगे पाटील' (Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil) या चित्रपटासह आणखी काही मराठी चित्रपट या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या सिनेमांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. एकीकडे 'बडे मिया छोटे मिया' (Bade Miyan Chote Miyan), 'मैदान' (Maidan), 'JNU' या सिनेमांची बॉक्स ऑफिसवर रेलचेल असणार आहे. तर दुसरीकडे याच दरम्यान 'मायलेक' (Mylek), 'लेक असावी तर अशी' (Lek Asavi Tar Ashi), 'जुनं फर्निचर' (Juna Furniture)आणि 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' (Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil) हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटांबद्दल जाणून घ्या (Marathi Movie Release April 2024)
मायलेक (Mylek)
कधी रिलीज होणार? 19 एप्रिल 2024
आई आणि मुलीच्या नात्यावर भाष्य करणारा 'मायलेक' हा चित्रपट 19 एप्रिल 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत, संजय मोने मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आई-मुलीच्या नात्यातील अनोखी गंमत या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
लेक असावी तर अशी (Lek Asavi Tar Ashi)
कधी रिलीज होणार? 26 एप्रिल 2024
'माहेरची साडी'नंतर विजय कोंडके यांचा 'लेक असावी तर अशी' हा चित्रपट 26 एप्रिल 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा कौटुंबिक सिनेमा आता प्रेक्षकांच्या रंजनासाठी सज्ज आहे. अनेक वर्षांनंतर विजय कोंडके एका नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
जुनं फर्निचर (Juna Furniture)
कधी रिलीज होणार? 26 एप्रिल 2024
कलाकारांची मांदियाळा असलेला 'जुनं फर्निचर' हा चित्रपट 26 एप्रिल 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महेश मांजरेकरांच्या या चित्रपटात समीर धर्माधिकरी, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब, शरद पोंक्षे यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत.
'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' (Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil)
कधी रिलीज होणार? 26 एप्रिल 2024
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपटाचा वेध "संघर्षयोद्धा - मनोज जरांगे पाटील" या चित्रपटातून घेतला जाणार आहे. घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. 26 एप्रिल 2024 रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या