एक्स्प्लोर

Home Minister : 20 वर्षांनंतर 'होम मिनिस्टर' घेणार निरोप, 'आज्ञा असावी' म्हणत आदेश भाऊजी भावूक

Home Minister : होम मिनिस्टर मालिकेला 20 वर्ष पूर्ण झाली असून ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Home Minister TV Serial : छोट्या पडद्यावरील मालिकांचं प्रेक्षकांचं मनात खास स्थान निर्माण होतं. काही कार्यक्रम असे असतात प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनतात. हे कार्यक्रम असे गाजतात की, स्वत:ची वेगळी ओळख बनवून आणि मनात घर करून राहतात. असाच एक कार्यक्रम म्हणजे ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम. ‘होम मिनिस्टर’ ही टीव्ही मालिका मागील 20 वर्षांपासून प्रेक्षकांचं भरपूर प्रेम जिंकतं त्यांचं मनोरंजन करत आहे. आता हा लाडका कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

होम मिनिस्टर मालिका निरोप घेणार 

‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम आणि आदेश भाऊजी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात घरदेखील केलं आणि अनेक कुटुंबाना आनंद आणि आधारही दिला. घरातील प्रत्येक माऊली आदेश बांदेकरांना आपल्या कुटुंबाचा एक भाग मानू लागली. 'दार उघड बये दार उघड' म्हणत 13 सप्टेंबर 2004 रोजी सुरु झालेला सहा भागांचा हा प्रवास 13 सप्टेंबर 2024 ला 20 वर्ष पूर्ण करत आहे. 'होम मिनिस्टर' कार्यक्रमाने केवळ मनोरंजनच केलं नाही तर अनेकांच्या मनाला स्पर्श केला आहे, अनेक कुटुंबाना सुखद अनुभव या कार्यक्रमाने दिला. अनेक कुटुंबांमधली सुख दुःख वाटून घेतली. 

20 वर्षांनंतर 'होम मिनिस्टर'चा निरोप

‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम मराठी टेलिव्हिजनवर एक मैलाचा दगड ठरत आहे . या कार्यक्रमाने आतापर्यंत जवळपास 15 लाख किलोमीटरचा प्रवास केलाय, 6500 पेक्षा जास्त भाग प्रक्षेपित झाले असून आदेश भाऊजींनी जवळपास सहा लाख कुटुबांसोबत थेटभेट देत त्या कुटुंबातले सुख दुःख वाटून घेतले. विशेष म्हणजे कोविड काळातही हा कार्यक्रम सुरु होता जेव्हा सगळं जग लॉकडाऊनमध्ये होत तेव्हा देखील आदेश भाऊजी होम मिनिस्टर घरच्या घरीच्या माध्यमातून ऑनलाईन वहिनींशी संवाद साधत होते. हा त्या वहिनींसाठी आणि त्या कुटुंबासाठी त्या कठीण काळात मनोरंजनाचा एक आधार होता.

होम मिनिस्टरची आतापर्यंत जवळपास 20 पर्व झाली, त्यातली काही गाजलेली पर्व म्हणजेच भारत दौरा, महाराष्ट्र दौरा, स्वप्न गृहलक्ष्मीचे, होणार सून मी ह्या घरची, नववधू नं 1, जाऊबाई जोरात, काहे दिया परदेस, अग्गबाई सुनबाई, पैठणी माहेरच्या अंगणी, होम मिनिस्टर घरच्या घरी, कोविड योद्धा विशेष आणि नुकतंच पार पडलेलं ‘महामिनिस्टरचं’ पर्व ज्यात विजेत्या वहिनींना मिळाली 11 लाखांची सोन्याची जर असलेली पैठणी आणि ती पैठणी विणली गेली होती अपंग मुलामुलींकडून. 

होम मिनिस्टरला निरोप देताना आदेश भाऊजी भावूक

या कार्यक्रमाने इतका मोठा टप्पा गाठल्याबद्दल भावुक होत आदेश बांदेकर म्हणाले , "20 वर्ष आनंदाची होती, झी मराठीच्या माध्यमातून 20 वर्षात साधारण 6500 भाग, अंदाजे 6 लाख 2250 कुटुबांसोबत थेट संवाद साधता आला, विविध कार्यक्रमांमधून 60 लाख प्रेक्षकांना आनंद देता आला. या प्रवासात अनेक कुटुंबाना आणि माऊलींना भेटत असताना त्यांचा चेहेऱ्यावरील समाधान ऊर्जा देत होत आणि अजूनही अनेक कुटुंब ‘होम मिनिस्टरची’ वाट बघत आहेत. 20 वर्षाच्या या प्रवासानंतर आता वेळ आली आहे विश्रांतीची तेव्हा आज्ञा असावी.”

13 सप्टेंबरला सांगता एपिसोड

या कार्यक्रमाबद्दल झी मराठी वाहिनीच्या चीफ चॅनल ऑफिसर व्ही.आर. हेमा म्हणाल्या , ". होम मिनिस्टर हा असा एक शो होता ज्याने झी मराठीला प्रेक्षकांच्या हृदयात आणि घरांमध्ये नेण्यास मदत केली. हा एक असा शो आहे ज्याने घरच्या गृहिणीला मान  सन्मान मिळवून दिला आणि ओळख मिळवून दिली.  20 वर्षांचा होम मिनिस्टरचा वारसा महाराष्ट्रातील प्रेक्षकांशी नाळ जोडण्यात एक महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. ‘होम मिनिस्टर’ चा हा प्रवास पुढील अनेक वर्षे प्रेक्षकांच्या स्मरणात राहील. आम्ही 'होम मिनिस्टर' ला निरोप देताना, या कार्यक्रमाची संपूर्ण टीम, सहभागी स्पर्धकांचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या अविश्वसनीय प्रवासात आम्हाला साथ देणारे आदेश बांदेकर यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते.

‘होम मिनिस्टरच्या 20 व्या वर्षपूर्ती निमित्त गणपती विशेष कार्यक्रम 'उत्सव बाप्पाचा, खेळ होम मिनिस्टरचा' 15 सप्टेंबर संध्या. 6.30 वा. फक्त झी मराठीवर पाहायला विसरु नका.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dharavi Fire Cylinder Blast : धारावीत सिलेंडरच्या वाहनाला आग, सिलेंडरच्या स्फोटांनी धारावी हादरली!Zero hour | Kunal Kamraच्या विनोदानंतर वादंग, विधिमंडळात पडसाद,शिवसेनेचा कामराच्या वक्तव्यावर आक्षेपPrashant Koratkar Arrest  : प्रशांत कोरटकरला अटक, कुणाल कामराच्या गाण्यानं राजकीय घमासानMNS Gudi Padwa Melava Teaser  : मनसेचा गुढीपाडवा मेळाव्याचा टीझर प्रदर्शित

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
OTT Web Series: OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Embed widget