एक्स्प्लोर

राज्य शासनाची चित्रपट धोरण समिती, धर्मवीरच्या प्रविण तरडे अन् मंगेश देसाईंना संधी

सांस्कृतिक कार्य विभागाने राज्यातील चित्रपट व मनोरंजन क्षेत्रातील बदलत्या पद्धतींच्या अनुषंगाने "चित्रपट धोरण समिती" गठीत करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

मुंबई : राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्य विभागाने राज्यातील चित्रपट व मनोरंजन क्षेत्रातील बदलत्या पद्धतींच्या अनुषंगाने "चित्रपट धोरण समिती" गठीत करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील चित्रपटसृष्टीला नवी दिशा मिळणार आहे. या समितीमार्फत राज्यातील चित्रपट निर्मिती केंद्रांना प्रोत्साहन देणे आणि तांत्रिक व कौशल्यविकासाच्या क्षेत्रात नवनवीन संधी उपलब्ध करण्याबाबत धोरण आखण्यात येणार आहे. या समितीच्या अध्यक्षपद ज्येष्ठ निर्माती श्रीमती स्मिता ठाकरे यांच्याकडे आहे. तर निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, आणि तांत्रिक तज्ञांच्या समावेशाने ही समिती बळकट करण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षात चित्रीकरण, प्रसारण, आस्वादन आणि तंत्रज्ञान प्रक्रियेच्या पध्दतीमध्ये कालानुरुप बदल झाले आहेत.  या सर्व बाबी लक्षात घेवून चित्रपट आणि करमणूक माध्यमाची व्याप्ती मोठी असल्यामुळे सर्वसमावेशक धोरण तयार करणे आवश्यक असल्याने या समितीमार्फत आश्वासक धोरण तयार करण्यात येणार आहे. यासाठी समितीची बैठक वेळोवेळी घेण्यात येईल, आणि तज्ञांच्या सल्ल्याने चित्रपट क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी उपाययोजना सुचविण्यात येतील. समितीचा अहवाल लवकरच शासनाकडे सादर केला जाईल.

 सदस्याचे नाव          पद

1.   श्रीमती स्मिता ठाकरे    अध्यक्ष (ज्येष्ठ निर्माती)

2.    श्री. प्रविण तरडे        सदस्य (निर्माता, दिग्दर्शक व कलाकार)

3.  श्री. मंगेश देसाई           सदस्य (निर्माता व कलाकार)

4. श्री. दिगंबर नाईक           सदस्य (कलाकार)

5. श्री. नितेश नांदगावकर    सदस्य (कला दिग्दर्शक)

6. श्री. प्रभाकर मोरे              सदस्य (कलाकार)

7. श्रीमती सविता मालपेकर    सदस्य (कलाकार)

8. श्रीमती गार्गी फुले            सदस्य (कलाकार)

9. श्रीमती आसावरी जोशी    सदस्य (कलाकार)

10. श्री. श्रीपाद जोशी           सदस्य

11. श्रीमती प्रिया बेर्डे       सदस्य (कलाकार)

12. श्रीमती निशिगंधा वाड  सदस्य (कलाकार)

13. श्रीमती मेघा धाडे     सदस्य (कलाकार)

14. श्री. नितिन वैद्य सदस्य (निर्माता, दिग्दर्शक, चित्रपट आस्वादक)

15. श्रीमती प्रिया कृष्णस्वामी सदस्य (लेखिका, दिग्दर्शका)

16. श्री. विशाल भारव्दाज  सदस्य (लेखक, निर्माता, दिग्दर्शक व संगीतकार)

17. श्री. रमेश तौरानी  सदस्य (टिप्स इंडस्ट्रीज लिमिटेड)

18. श्री. उज्वल निरगुडकर  सदस्य (ऑस्कर अकॅडमी सदस्य)

19. श्री. अशोक राणे सदस्य (आंतरराष्ट्रीय चित्रपट समीक्षक)

20. संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय - सदस्य

21. मुख्य कार्यकारी अधिकारी, (सांस्कृतिक समन्वय आणि विशेष प्रकल्प, दादासाहेब फाळके चित्रनगरी) - सदस्य

22. सह व्यवस्थापकीय संचालक, दादासाहेब फाळके चित्रनगरी - सदस्य सचिव

समितीची मुख्य उद्दिष्टे काय?

1) कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत छायाचित्रण, संकलन, ध्वनी, प्रॉडक्शन डिझाईन, रंगभूषा, वेशभूषा, डबिंग, डीआय, व्हीएफएक्स, अॅनिमेशन आदी विभागातील शॉर्ट टर्म कोर्स, फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया यासारख्या संस्थेच्या मदतीने सुरु करण्याबाबत सुचना करणे.

2) चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून सर्जनशील अर्थव्यवस्थेचा (Creative Economy) प्रकार आहे. या दृष्टीकोनातून विविध कार्यशाळांचे आयोजनाबाबत सुचना करणे.

3) अनेक शहरात असलेली नाट्यगृहे आठवड्यातून एकाच प्रयोगासाठी वापरली जातात. तिथे सिंगल थिएटरच्या धर्तीवर थिएटर उपलब्ध करुन देणे. सिने-नाट्यगृह उभारण्याबाबत सल्ला देणे.

4) आंतरराष्ट्रीय सह निर्माती (international co-production) हा चित्रपट निर्मिती अधिक सुलभ करण्याचा आणि जागतिक पातळीवर ओळख निर्माण करुन देण्याविषयी जागृतीपर मार्गदर्शन करणे.

5) विविध चित्रपट महोत्सवातून मराठी चित्रपटसृष्टीला जास्तीत जास्त फायदा कसा होईल, याविषयी मार्गदर्शन करणे.

6) महाराष्ट्र व चित्रनगरी, मुंबई हे भारतातील सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्मिती केंद्र (Destination) बनविण्याबाबत सल्ला देणे.

7) राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना राज्यात प्रोत्साहित करण्याबाबत सल्ला देणे / उपाययोजना सुचविणे.

8) राज्यात चित्रपट प्रेरित पर्यटनास (Film Induced Tourism) चालना देण्यासाठी पर्याय सुचविणे. 

9) चित्रपट व मनोरंजन क्षेत्रातील युवकांना रोजगार व कौशल्य विकासाच्या संधी निर्माण करण्याबाबत उपाय सुचविणे.

10) चित्रपट जगतातील नवनवीन तांत्रिक घडमोडी OTT Platform, Web Series and films, Animation, VFX इ. अंतर्गत उपाययोजना सुचविणे.

11) दृकश्राव्य माध्यमाशी निगडीत ऐनवेळीच्या उपस्थित विषयांबाबत उपाययोजना सुचविणे

12) नागरी / ग्रामीण स्थळांच्या बाह्य चित्रिकरणासाठी सुलभपणे परवानगी प्राप्त होतील याबाबत उपाय योजना सुचविणे.

13) चित्रिकरणानंतर प्रदर्शनास सहाय्यभूत ठरणाऱ्या अनुषंगीक बाबी यांचा धोरणात समावेश करणे.

महत्वाच्या बातम्या:

Sudhir Mungantiwar : छात्रसंघाची निवडणूक लढवली, नंतर मागे पाहिलंच नाही; वादळ आणि संघर्षांना पुरून उरणारे नेते सुधीर मुनगंटीवार 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget