Entertainment News Live Updates 12 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE

Background
Ali Baba Dastaan E Kabul : 'अली बाबा : दास्तान - ए काबुल' मालिकेत शिझान खानची जागा घेणार अभिषेक निगम
Ali Baba Sheezan Khan Replacement : अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) आत्महत्येनंतर 'अली बाबा : दास्तान - ए काबुल' (Ali Baba Dastaan E Kabul) ही मालिका चर्चेत आली. आता या मालिकेसंदर्भात एक महत्तावाची अपडेट समोर आली आहे. या मालिकेत तुनिषा शर्मा आणि शिझान खान (Sheezan Khan) मुख्य भूमिकेत होते. पण आता तुनिषाच्या आत्महत्येमुळे शिझान खान सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. तुनिषाच्या निधनानंतर या मालिकेचं शूटिंग बंद होतं. पण आता मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झाली असून अभिनेता अभिषेक निगम (Abhishek Nigam) तुनिषाची जागा घेणार आहे.
View this post on Instagram
Marathi Serial : मराठी मालिकांचे रंगणार मकर संक्रांत विशेष भाग; रविवार होणार खास
Marathi Serial : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे प्रयोग होत आहे. आता मकर संक्रांतनिमित्त (Makar Sankranti) या मालिकांचे विशेष भाग रंगणार आहेत. यात 'होम मिनिस्टर' (Home Minister), 'अप्पी आमची कलेक्टर' (Appi Aamchi Collector), 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) या मालिकांचा समावेश आहे.
View this post on Instagram
Ghar Bandook Biryani: 'आशेच्या भांगेची नशा भारी...'; नागराज मंजुळेनं शेअर केलं 'घर, बंदूक, बिरयानी' चं पोस्टर
Ghar Banduk Biryani: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) हा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. लवकरच त्याचा 'घर, बंदूक, बिरयानी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. त्या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. नुकतंच नागराजनं या चित्रपटाचं नवं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं. या पोस्टरला त्यानं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचं लक्ष वेधलं आहे
View this post on Instagram
Ved : रितेश-जिनिलियाने चाहत्यांना याड लावलं
Riteish Deshmukh Genelia Deshmukh Ved Movie Budget : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुखचा (Genelia Deshmukh) बहुचर्चित 'वेड' (Ved) हा सिनेमा चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. दिवसेंदिवस हा सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे.
View this post on Instagram
Shehzada Trailer OUT : अॅक्शन, ड्रामा अन् कॉमेडी; कार्तिक आर्यन आणि क्रिती सेननच्या ‘शहजादा’ चा ट्रेलर पाहिलात?
Shehzada Trailer OUT : अभिनेता कार्तिक आर्यनच्या (Kartik Aaryan) ‘शहजादा’ (Shehzada) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये कार्तिकचा स्वॅग आणि क्रिती सेननचा (kriti sanon) ग्लॅमरस अंदाज दिसत आहे. टी-सीरिजच्या युट्यूब चॅनलवरुन शहजादा या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
