एक्स्प्लोर

Tunisha Sharma : शो मस्ट गो ऑन... तुनिषाच्या निधनानंतर 'अली बाबा : दास्तान - ए काबुल' मालिकेच्या शूटिंगला सुरुवात; जाणून घ्या सेटवरचं वातावरण कसं आहे?

Tunisha Sharma : तुनिषा शर्माच्या निधनानंतर आता 'अली बाबा : दास्तान - ए काबुल' या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.

Ali Baba Dastaan E Kabul : तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) आत्महत्येनंतर 'अली बाबा : दास्तान - ए काबुल' (Ali Baba Dastaan E Kabul) या मालिकेचं शूटिंग थांबलं होतं. तुनिषाने या मालिकेच्या सेटवर आत्महत्या केल्याने सेटवर भीतीदायक वातावरण निर्माण झालं होतं. पण शूटिंग थांबल्याने निर्मात्यांना मात्र मोठा फटका बसला होता. पण आता शो मस्ट गो ऑन म्हणत या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. 

तुनिषाने 24 डिसेंबर 2022 रोजी 'अली बाबा : दास्तान - ए काबुल' या मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली होती. तिच्या निधनाने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला होता. पण 'अली बाबा : दास्तान - ए - काबुल' या मालिकेचं शूटिंग मात्र थांबलं होतं. पण मालिकेच्या काही भागांचं बॅकअप असल्याने प्रेक्षकांना मात्र मालिका पाहताना काहीही फरक जाणवला नाही. 

तुनिषा शर्माला शिझानने आत्महत्येस भाग पाडल्याने शिझान खान (Sheezan Khan) सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तुनिषा आणि शिझान दोघेही 'अली बाबा : दास्तान - ए - काबुल' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. त्यामुळे आता ही मालिका बंद होणार असल्याची चर्चा सुरू होती. पण आता या मालिकेचं शूटिंग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. 

सेटवरचं वातावरण कसं आहे?

तुनिषा शर्माच्या मालिकेतील एका सहकलाकाराने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून 'अली बाबा : दास्तान - ए - काबुल' या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. मालिकेतील कलाकारांना शूटिंगसाठी पुन्हा एकदा सेटवर बोलवण्यात येत आहे. शूटिंगला सुरुवात झाली असली तरी तुनिषाची आठवण येत असल्याने सेटवर नकारात्मक वातावरण आहे". 

'अली बाबा : दास्तान - ए काबुल' मालिकेतील अभिनेत्री सपना ठाकूर पुढे म्हणाली,"तुनिषाच्या निधनाने मालिकेतील सर्वच कलाकारांना प्रचंड दु:ख झालं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आम्हा सर्वांसोबत तुनिषा आनंदात शूटिंग करत होती. मालिकेत मुख्य भूमिकेत असणारे दोन्ही कलाकार सध्या सेटवर नाहीत. कदाचीत आता मालिकेच्या कथानकात बदल होऊ शकतो, असं म्हटलं जात आहे". 

तुनिषाच्या शर्माच्या आत्महत्येने 'अली बाबा : दास्तान - ए काबुल' या मालिकेसंबंधित सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. या धक्क्यातून सावरण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करत आहे. शूटिंग करताना प्रत्येकाला भीती वाटत आहे. तुनिषाच्या आत्महत्येनंतर मालिकेचा सेट बदलण्यात आला आहे. त्यामुळे आता मालिका बंद होणार नसून मालिकेच्या कथानकात बदल होईल. 

संबंधित बातम्या

Tunisha Sharma Sheezan Khan : तुनिषा-शिझाननंतर 'अली बाबा-दास्तान ए काबुल' घेणार प्रेक्षकांचा निरोप? मालिकेच्या सेटवर भीतीदायक वातावरण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
लोकसभेच्या धामधुमीत राजेश टोपेंना मोठा धक्का, कट्टर समर्थकांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
लोकसभेच्या धामधुमीत राजेश टोपेंना मोठा धक्का, कट्टर समर्थकांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
शाहू महाराज की उदयनराजे भोसले, कोणत्या राजांची संपत्ती अधिक?
शाहू महाराज की उदयनराजे भोसले, कोणत्या राजांची संपत्ती अधिक?
Lok Sabha Election 2024 Phase 1 Voting : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

SuperFast Maharashtra : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 19 एप्रिल 2024 एबीपी माझाPrakash Ambedkar PC : मोदींनी पत्नीला गॅरंटी दिली का? प्रकाश आंबेडकरांचा थेट सवाल ABP MajhaWari Loksabhechi Amravati EP 6 : वारी लोकसभेची अमरावतीत...Navneet Rana पु्न्हा खासदार होणार?ABP Majha Headlines : 07 PM : 19 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
लोकसभेच्या धामधुमीत राजेश टोपेंना मोठा धक्का, कट्टर समर्थकांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
लोकसभेच्या धामधुमीत राजेश टोपेंना मोठा धक्का, कट्टर समर्थकांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
शाहू महाराज की उदयनराजे भोसले, कोणत्या राजांची संपत्ती अधिक?
शाहू महाराज की उदयनराजे भोसले, कोणत्या राजांची संपत्ती अधिक?
Lok Sabha Election 2024 Phase 1 Voting : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
Hrithik Roshan and Jr NTR War 2 Movie :  हृतिक- ज्यू. एनटीआरच्या चित्रपटाला हॉलिवूडचा तडका; 'कॅप्टन अमेरिका'चा स्टंट डायरेक्टर 'यशराज'च्या चित्रपटात
हृतिक- ज्यू. एनटीआरच्या चित्रपटाला हॉलिवूडचा तडका; 'कॅप्टन अमेरिका'चा स्टंट डायरेक्टर 'यशराज'च्या चित्रपटात
Nashik Loksabha : भुजबळांची नाशिक लोकसभेतून माघार, पण हेमंत गोडसेंना आता पक्षातूनच आव्हान, शिवसेनेत तयार झाले दोन गट
भुजबळांची नाशिक लोकसभेतून माघार, पण हेमंत गोडसेंना आता पक्षातूनच आव्हान, शिवसेनेत तयार झाले दोन गट
Preity Zinta : 'बॅकग्राऊंड नसणाऱ्यांनी बॉलीवूडमध्ये येऊ नये', प्रिती झिंटा असं का म्हणाली?
'बॅकग्राऊंड नसणाऱ्यांनी बॉलीवूडमध्ये येऊ नये', प्रिती झिंटा असं का म्हणाली?
BrahMos Missiles to Philippines : प्रथमच ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्यात; पहिली खेप फिलिपाइन्सकडे सुपूर्द, दक्षिण चीन समुद्रात तैनात करण्यात येणार
BrahMos Missiles : ब्रह्मोस क्षेपणास्त्राची प्रथमच निर्यात; पहिली खेप फिलीपिन्सला सुपूर्द
Embed widget