एक्स्प्लोर

New Year 2024 : 'फायटर' ते 'सिंघम अगेन'; 'या' वर्षात बॉक्स ऑफिस गाजवणार 'हे' पाच सिनेमे

Bollywood Movie : 2024 मध्ये अनेक बॉलिवूड सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. या सिनेमांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

Upcoming Movies 2024 : नव्या वर्षाची (New Year 2024) चाहते आतुरतेने वाट पाहत होते. 2023 हे वर्ष बॉलिवूडसाठी खूप खास होतं. या वर्षात शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) या सिनेमापासून 'रॉकी और रानी की प्रेम' कहानी, 'गदर 2', 'जवान', 'टायगर 3', 'अॅनिमल', 'सॅम बहादुर', 'डंकी' आणि 'सालार'पर्यंत अनेक सिनेमे प्रदर्शित झाले. शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि सनी देओलसारख्या (Sunny Deol) कलाकारांनी या वर्षात जबरदस्त कमबॅक केलं आहे. आता 2024 ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 2024 हे वर्ष बॉलिवूडसाठी खूप खास असणार आहे.

फायटर (Fighter)

नव्या वर्षाच्या सुरुवातीला हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचा 'फायटर' हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 25 जानेवारी 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या सिनेमाचा ट्रेलर आणि गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. या अॅक्शनचा तडका असणाऱ्या सिनेमात अनिल कपूर आणि करण सिंह ग्रोवर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. फायटर हा या वर्षातला ब्लॉकबस्टर सिनेमा ठरू शकतो. 

बडे मिया छोटे मिया (Bade Miyan Chote Miyan)

'बडे मिया छोटे मिया' या बहुचर्चित सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या अॅक्शन थ्रिलर सिनेमात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत आहेत. एप्रिल 2024 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

सिंघम अगेन (Singham Again) 

रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. या सिनेमाचे पोस्टर आऊट झाले आहे. 200 कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेला हा सिनेमा 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या सिनेमात अजय देवगन, करीना कपूर खान, टायगर श्रॉफ आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत आहेत. तर रणवीर सिंह आणि अक्षय कुमारची झलकही या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

पुष्पा 2 (Pushpa 2)

अल्लू अर्जुन स्टार 'पुष्पा 2' हा सिनेमा 15 ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित होईल. या सिनेमाची प्रेक्षक खूप आतुरतेने वाट पाहत आहेत. निर्माते सध्या या सिनेमाच्या सीक्वेलवर काम करत आहेत. 500 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. या सिनेमात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

चंदू चँपियन (Chandu Champion)

कबीर खान दिग्दर्शित 'चंदू चँपियन' हा सिनेमा जुलै 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. कार्तिकसह या सिनेमात श्रद्धा कपूर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 

कल्की 2989 एडी (Kalki 2989 AD)

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या 'कल्की 2989' या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. या सिनेमात प्रभाससह दीपिका पादुकोण स्क्रीन शेअर करताना दिसेल. या सिनेमात अमिताभ बच्चनदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या अॅक्शन, थ्रिलर सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

संबंधित बातम्या

New Year 2024 : 'डियर जिंदगी' ते 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'; नव्या वर्षाच्या सुरुवातीला 'हे' सिनेमे नक्की पाहा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : Maharashtra News : ABP Majha : 11 PmABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 09 March 2025Special Report | Santosh Deshmukh | 90 दिवस! वडील गमावले, वैभवीने प्रश्न विचारले..Special Report| Raj Thackeray | कुंभ आणि गंगा, 'राज'कीय पंंगा; वादांचा मेळा, प्रतिक्रियांची डुबकी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
Khokya Satish Bhosle:
"माफीच्या लायकीचा नाही..."; हरिण, काळवीट मारणाऱ्या खोक्या उर्फ सतीश भोसलेला बिष्णोई गँगकडून धमकी
तब्बल 9 वर्षांनी पतंजली फूड अँड हर्बल पार्क लोकार्पण, मी मुख्यमंत्री होण्याची वाट हे पार्क पाहत होतं, देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया 
मुख्यमंत्री होण्याची वाट पतंजली फूड अँड हर्बल पार्क पाहत होतं; देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया 
Embed widget