New Year 2024 : 'डियर जिंदगी' ते 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'; नव्या वर्षाच्या सुरुवातीला 'हे' सिनेमे नक्की पाहा
New Year Movies : नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत करायचा विचार करत असाल तर 'डियर जिंदगी', 'ये जवानी है दिवानी' हे सिनेमे प्रेक्षकांनी नक्कीच पाहायला हवेत.
New Year Movies 2024 : नववर्षाची सुरुवात (New Year 2024) झाली आहे. नववर्षात अनेक सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. अॅक्शन, थ्रिलर, रोमान्स अशा विविध धाटणीच्या या सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. आज वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी हवी असेल तर अनेक चांगले सिनेमे त्यांना पाहता येणार आहेत. कुटुंबीय आणि जवळच्या मित्र-मंडळींसोबत प्रेक्षक हा सिनेमा पाहू शकतात.
डियर जिंदगी (Dear Zindagi)
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा 'डियर जिंदगी' हा सिनेमा प्रेक्षकांना खूप काही शिकवणारा आहे. आयुष्याला कंटाळलेल्या कियाराची भेट डॉक्टर जहांगीरसोबत होते. या सिनेमातील शाहरुखचे संवाद नवी सुरुवात करण्यासाठी प्रेक्षकांना सकारात्मकता देणारे आहेत.
ये जवानी है दिवानी (Yeh Jawaani Hai Deewani)
मैत्री, प्रेम, भांडण, रोमान्स, ट्रिप, अशा अनेक गोष्टींची जत्रा असलेला 'ये जवानी है दिवानी' (Yeh Jawaani Hai Deewani) हा मनोरंजनात्मक सिनेमा आहे. सर्व इमोशन्सचा हा परिपूर्ण पॅकेज आहे. या सिनेमात दीपिका पादुकोण, रणबीर कपूर, कल्की मुख्य भूमिकेत आहेत. मनाली ट्रिपमधील मित्रांची मजा पाहताना प्रेक्षकांना नक्कीच मजा येईल.
जिंदगी ना मिलेगी दोबारा (Zindagi Na Milegi Dobara)
जोया अख्तरचा 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' (Zindagi Na Milegi Dobara) हा सिनेमा नववर्षाची सकारात्मक सुरुवात करण्यासाठी फायदेशीर आहे. स्पेनमध्ये या सिनेमाचं शूटिंग झालं आहे. या सिनेमातील सर्वत्र पात्र प्रेक्षकांना भावतात. या सिनेमात ऋतिक रोशन, कतरिना कैफ, अभय देओल, फराह अख्तर आणि कल्की या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.
जब वी मेट (Jab We Met)
शाहिद कपूर आणि करीना कपूर यांचा 'जब वी मेट' (Jab we Met) हा सिनेमा नववर्षाची चांगली सुरुवात करण्यासाठी उत्तम आहे. या सिनेमात करीना कपूरने साकारलेली गीतची भूमिका चांगलीच गाजली आहे. वर्तमानात कसं जगायचं हे सांगणारा हा सिनेमा आहे.
2023 प्रमाणे 2024 मध्येही प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच अनेक धमाकेदार वेबसीरिज आणि सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. ओटीटीवरदेखील घरबसल्या प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. यात 'कल्कि 2898 एडी', 'मेरी क्रिसमस','मैं अटल हूँ', 'फायटर' असे अनेक बिग बजेट सिनेमे प्रदर्शित होणार आहेत.
संबंधित बातम्या