VIDEO : 'मेरे बस में नहीं मेरा मन...' गाता-गाता उदित नारायण यांनी लाईव्ह शोमध्ये तरुणींना केलं किस, ओठावर KISS करताच भडकले लोक
Udit Narayan Kissing Viral Video : गायक उदित नारायण यांनी महिला चाहत्यांना किस केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Udit Narayan Kissing Viral Video : प्रसिद्ध बॉलिवूड गायक उदित नारायण यांचा सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये उदित नारायण लाईव्ह शोमध्ये महिला चाहत्यांना किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी चांगलेच संतापले आहे. लाईव्ह शोमध्ये गाणं गातानाचा उदित नारायण यांनी महिला चाहत्यांना किस केलं. इतकंच नाही, तर एका महिलेला किस केलं, याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
उदित नारायण यांनी लाईव्ह शोमध्ये केलं किस
सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे, या व्हिडीओमध्ये उदित नारायण लाईव्ह शोमध्ये टीप टीप बरसा पाणी गाण्यावर परफॉर्मन्स करताना दिसत आहे. यावेळी गाणं गाता-गाता उदित नारायण जमलेल्या महिला चाहत्यांना गालावर किस करतात, इतकंच नाही, तर एका महिलेला जबरदस्ती ओठावर किस करतात, असं व्हिडीओमध्ये दिसत आहे. 69 वर्षीय उदित नारायण यांचा हा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.
View this post on Instagram
व्हायरल व्हिडीओमध्ये उदित नारायण टिप-टिप बरसा पाणी गाणं गाताना आणि महिलांना किस करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये उदित नारायण यांच्या परफॉर्मन्सवेळी चाहते त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी स्टेज जवळ येताना दिसत आहे. यावेळी उदित नारायण खाली वाकून फोटो फॅन्ससोबत फोटो काढतात. दरम्यान, फोटो काढताना ते महिलांच्या गालावर किस करतात. त्यानंतर आणखी एक महिला फोटो काढताना तिच्या ओठांवर किस करताना स्पष्ट दिसत आहे.
पाहा व्हिडीओ : लाईव्ह शोमध्ये महिलेला केलं किस
असली जिंदगी तो ये जी रहे हैं हम लोग तो इनके लिए पोस्ट करने को आए हैं!pic.twitter.com/UeO86zfH1j
— ShivRaj Yadav (@shivaydv_) February 1, 2025
उदित नारायण यांच्या या व्हायरल व्हिडीओवरुन आता नेटकरी संतापले आहेत. सोशल मीडियावर उदित नारायण यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत व्हिडीओवर कमेंट करत आहेत. याशिवाय, हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर आणि रिशेअर केला जात आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पाहता-पाहता व्हायरल झाला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
VIDEO : 'मेरे बस में नहीं मेरा मन...' गाता-गाता उदित नारायण यांनी लाईव्ह शोमध्ये तरुणींना केलं किस, ओठावर KISS करताच भडकले लोक
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
