Abu Azmi: औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या अबू आझमींचं आयुष्य संकटात, म्हणाले, 'माझ्या जीवाचं बरंवाईट झालं तर....'
सपाचे आमदार अबू आझमी यांना औरंगजेबाची स्तुती करणारे वक्तव्य चांगलेच भोवले असून विधानसभेत झालेल्या गोंधळानंतर एकमताने अबू आझमींना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले

Abu Azmi: 'औरंगजेब उत्तम प्रशासक असल्याच्या वादग्रस्त प्रतिक्रियेनंतर सपा आमदार अबू आजमी यांचे निलंबन करण्यात आले . विधानसभेत आज अबू आझमींच्या निलंबनावरून सभागृह दणाणले .दरम्यान, या घटनेनंतर मला अनेक धमक्यांचे फोन येत आहेत .माझ्या जीवाला काही झाल्यास सरकारला जबाबदार धरावे असं अबू आझमी (Abu Azmi ) म्हणाले आहेत . मी आजवर महापुरुषांचा अपमान केला नाही .देशाचा एक राजा ज्याच्या विषयी इतिहासात लिहून ठेवले तेच मी बोललो, असेही ते म्हणाले .
सपाचे आमदार अबू आझमी यांना औरंगजेबाची स्तुती करणारे वक्तव्य चांगलेच भोवले असून विधानसभेत झालेल्या गोंधळानंतर एकमताने अबू आझमींना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले .निलंबनावर अबू आझमींनी निषेध व्यक्त केला असून या विरोधात कायदेशीर दाद मागणार असल्याचेही ते म्हणालेत .दरम्यान ,अबू आझमी यांनी या घटनेनंतर आपल्याला धमकीचे फोन कॉल येत असल्याची माहिती दिली .माझ्या जीवाला काही झाल्यास सरकारला जबाबदार धरावे असेही ते म्हणाले आहेत .
या घटनेनंतर मला जीवे मारण्याचे फोन :अबू आझमी
'या घटनेनंतर मला अनेक धमक्यांचे फोन येत आहेत .मला जीवे मारण्याचे फोन विविध नंबर वरून येत आहेत .मी पोलीस प्रोटेक्शनसाठी अर्ज करणार आहे .माझ्या जीवाला काही झाल्यास त्या सरकारला जबाबदार धरावे .वेगवेगळ्या नंबर वरून लोक फोन करून शिव्या घालत आहेत .मी वादग्रस्त काहीही बोललेलो नाही .जे इतिहासात आहे तेच बोललो .मात्र माझ्या बोलण्यामुळे अधिवेशन बंद करणार असाल तर मी माझे शब्द मागे घेतले आहेत .मी इतिहासात जे लिहिला आहे त्याचाच दाखला दिला .असे अबू आझमी म्हणाले . दरम्यान , ठाकरे गटाकडून अबू आझमींच्या वक्तव्यावर टोकदार टीका केली जात आहे .यावर भाजपच्या बी टीमचा नेता असा उल्लेख करण्यात आला होता .त्यावरही अबू अझमींनी प्रत्युत्तर दिले .ते म्हणाले ' मी काहीही बी टीम नाही .ठाकरे गटच उद्या एटीएम सोबत जाईल .तीस वर्ष ते आधीही एकत्र होते .मग शिंदेंचे वही होगा जो मंजुरे खुदा होगा .मी विधानसभा अध्यक्षांची भेट घेऊन विचारेन की कुठल्या कायद्यानुसार कारवाई केली .कायदेशीर प्रक्रियेद्वारे ही दाद मागेन . माझ्यावर दाखल गुन्ह्यांबाबतही कायदेशीर लढा देऊ' असं अझमी म्हणालेत .
हेही वाचा:
























