Aaditya Thackeray : पण, शिवाजी महाराजांचा अपमान केला त्या कोरटकर आणि सोलापूरकरची पाठराखण सरकारला करायची होती; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
अबू आझमी यांच्यावर कारवाई कालपासूनच करायला पाहिजे, असे मते आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले, पण अशीच कारवाई सोलापूरकर कोरटकरवर करायला हवी होती, अशी मागणी त्यांनी केली.

Aaditya Thackeray : समाजवादी पक्षाचे नेते अबू असीम आझमी यांचे औरंगजेब प्रेम समोर आल्यानंतर त्यांना महाराष्ट्र विधानसभेतून निलंबित करण्यात आले आहे. त्यांना चालू अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अबू आझमी यांना विधानसभेतून निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, आझमी यांना विधिमंडळातून काढून टाकावे, केवळ एका अधिवेशनासाठी निलंबित करू नये. छत्रपती शिवाजी पूजनीय असून त्यांचा अपमान करणाऱ्यांना आपण सहजासहजी सोडू शकत नाही. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आमदारांना एकाहून अधिक सत्रांसाठी निलंबित करता येत नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. आझमी यांना आमदार म्हणून निलंबित केले जाऊ शकते की नाही, याचा आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन करु.
आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
दरम्यान, अबू आझमी यांच्यावर कारवाई कालपासूनच करायला पाहिजे, असे मते आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले, पण अशीच कारवाई सोलापूरकर कोरटकरवर करायला हवी होती, अशी मागणी त्यांनी केली. त्यांनी सांगितले की, आम्ही स्थगन प्रस्ताव मांडणार होतो. ज्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला त्या कोरटकर आणि सोलापूरकरची पाठराखण सरकारला करायची होती. त्यासाठी आज भाजपने गोंधळ घातला आणि त्यांची बी टीम असलेल्या अबू आझमीला बोलायला लावलं आणि आता कारवाई केली.
वाद वाढताच अबू आझमी यांनी माफी मागितली
दरम्यान, औरंगजेबावरील वक्तव्यानंतर राजकारण तापले असताना अबू आझमी यांनी स्पष्टीकरण देत शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांविरोधात बोलण्याचा विचारही करू शकत नाही, असे म्हटले आहे. अबू आझमी म्हणाले की, माझ्या शब्दांचा विपर्यास करण्यात आला आहे. औरंगजेबाबद्दल इतिहासकार आणि लेखक काय म्हणाले आहेत ते मी सांगितले आहे. मी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज किंवा इतर कोणत्याही महापुरुषाबद्दल अपमानास्पद टिप्पणी केलेली नाही.
तर मी बिनशर्त माफी मागतो आणि माझे विधान मागे घेतो
ते म्हणाले मी एवढा मोठा नाही. माझ्या या वक्तव्यामुळे कोणी दुखावले गेले असेल तर मी बिनशर्त माफी मागतो आणि माझे विधान मागे घेतो. औरंगजेबच्या या वक्तव्यावरून महाराष्ट्रातील ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगजेबाचा बचाव करताना आझमी यांनी 17व्या शतकातील मुघल सम्राट औरंगजेबला मी क्रूर, अत्याचारी किंवा असहिष्णु शासक मानत नाही, असे विधान केले होते. आजकाल चित्रपटांच्या माध्यमातून मुघल सम्राटाची विकृत प्रतिमा निर्माण केली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या

























