भिंतीवर केलेलं ब्लास्टिंग चुकीचं, तुळजाभवानी मंदिरातील संवर्धनाच्या कामावर संभाजीराजेंचा आक्षेप, शिखराच्या कामालाही विरोध
तुळजाभवानी मंदिरात (Tuljabhavani Temple) सुरु असलेल्या संवर्धनाच्या कामावर संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी आक्षेप घेतला आहे.

Sambhaji Raje Chhatrapati : तुळजाभवानी मंदिरात (Tuljabhavani Temple) सुरु असलेल्या संवर्धनाच्या कामावर संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी आक्षेप घेतला आहे. चुकीच्या पद्धतीने तुळजाभवानी मंदिराचे संवर्धनाचं काम होत असल्याची माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. मंदिर संवर्धन करत असताना भिंतीवर केलेले ब्लास्टिंग चुकीचे असल्याचे म्हणत संभाजीराजेंनी कामावर नाराजी व्यक्त केली आहे.
तुळजाभवानी देवीच्या शिखराच्या पुनर्बांधणीच्या कामालाही संभाजीराजे छत्रपती यांनी विरोध केला आहे. केंद्रीय पुरातत्व खात्याचे मत घेऊनच पुढचा निर्णय घ्या असे मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केलं आहे. तुळजाभवानी मंदिरातील कामाचा आढावा घेतल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी प्रसारमाध्यमांसमोर रोखठोक भूमिका मांडली. तुळजाभवानी मंदिरातील शिळांना गेलेले तडे, शस्त्रोक्त पद्धतीने ही दुरुस्त करता येऊ शकतात असे मत संभाजीराजे यांनी व्यक्त केले.
मंदिरातील मुख्य गाभाऱ्याच्या काही प्राचीन शेळ्यांना तडे
तुळजाभवानी मंदिरातील मुख्य गाभाऱ्याच्या काही प्राचीन शेळ्यांना तडे गेल्याची बाब पुरातत्व विभागाचे अधिकारी व जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केलेल्या संयुक्त पाहणीत उघड झाली होती. मंदिर गाभार्यातील फरशी व मुलांना दिलेला भाग काढून टाकल्यानंतर काही शिळा खचले आहेत तर काहींना तडे गेले आहेत .तुळजाभवानी मंदिरातील गाभाऱ्याच्या जतन व संवर्धन म्हणजेच जीर्णोद्धाराचे काम पुरातत्व विभागाच्या निग्रणीखाली सुरू असताना हा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिराचे जतन व संवर्धनाचे काम मंदिर संस्थांच्या 65 कोटी रुपयांच्या स्वनिधीतून सुरू आहे. असे असताना हा प्रकार घडल्याने मंदिर प्रशासनाकडून गाभाऱ्याचे नव्याने बांधकाम करण्यात यावे अशी मागणी होत आहे .यासाठी पुजारी मंडळाकडून 5240 स्वाक्षऱ्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते.
मंदिर परिसरातील असंयुक्तीक बांधकाम हटवून मंदिराला पूर्वीचे वैभवशाली स्वरूप देण्याच्या दृष्टीने ही पावलं उचलण्यात आली आहेत. भाविकांच्या सोईसाठी दर्शन व्यवस्था सुधारण्याबरोबरच गर्दी नियंत्रणासाठी स्वतंत्र मार्ग तयार करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. हजारो वर्षांच्या अनमोल अध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या तुळजाभवानी देवीच्या मंदिरासह मंदिर परिसरातील उपदेवतांच्या मंदिरांनाही प्राचीन गतवैभवाचे रूप मिळणार आहे. लवकरच राज्यासह देशभरातील देविभक्तांना तुळजाभवानी देवीच्या मंदिराचा मूळ प्राचीन गाभारा याची देही याची डोळे मनभरून पाहता येणार असल्याची माहिती देण्.यात आली होती.
महत्वाच्या बातम्या:
तुळजापूर संस्थानमध्ये 8.43 कोटींचा भ्रष्टाचार, तत्कालीन विश्वस्तांवर गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे आदेश
























