(Source: ECI/ABP News/ABP Majha)
The Kerala Story : 'द केरळ स्टोरी'ची यशस्वी घोडदौड सुरूच; बॉक्स ऑफिसवर जमवला 200 कोटींचा गल्ला
The Kerala Story : 'द केरळ स्टोरी' या सिनेमाने आता 200 कोटींचा टप्पा पार केला आहे.
The Kerala Story Story Box Office Collection : सुदीप्तो सेन (Sudipto Sen) दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) या सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. पहिल्या दिवसापासून या सिनेमाला भारतीय सिनेप्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची यशस्वी घोडदौड सुरू आहे. आतापर्यंत या सिनेमाने 200 कोटींचा गल्ला जमवला आहे.
200 कोटींच्या क्लबमध्ये 'द केरळ स्टोरी' सामील!
'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) हा सिनेमा रिलीजच्या 18 व्या दिवशी 200 कोटींच्या कल्बमध्ये सामील झाला आहे. आतापर्यंत या सिनेमाने 204.47 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या तिसऱ्या सोमवारी अर्थात 18 व्या दिवशी या सिनेमाने 5.50 कोटींची कमाई केली आहे. वीकेंडप्रमाणे इतर दिवशीदेखील हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
'द केरळ स्टोरी'बद्दल जाणून घ्या...
'द केरळ स्टोरी' या सिनेमाचं दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केलं असून विपुल शाह यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. 5 मे 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 40 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. केरळमधील मुलींचं धर्म परिवर्तन करुन त्यांना दहशतवादी संघटना आयएसआयएसमध्ये कसं सामील केलं जातं हे सांगणारा 'द केरळ स्टोरी' हा सिनेमा आहे.
'द केरळ स्टोरी' या सिनेमात अदा शर्मा (Adah Sharma), सोनिया बलानी, योगिता बिहानी आणि सिद्धी इडनानी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. जगभरातील सिनेरसिक या सिनेमाचं कौतुक करत आहेत. कुठे हा सिनेमा करमुक्त व्हावा, अशी मागणी करण्यात येत आहे. तर कुठे या महिलांसाठी या सिनेमाचे खास शो आयोजित करण्यात आले आहे. अंगावर शहारे आणणारा हा सिनेमा 300 कोटींचा गल्ला जमवू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. जगभरात या सिनेमाची चांगलीच क्रेझ आहे.
'द केरळ स्टोरी'चं FTII मध्ये स्क्रिनिंग, स्टार कास्ट येताच आंदोलक विद्यार्थ्यांनी घातला गोंधळ
'द केरळ स्टोरी'चं पुण्यातील FTII मध्ये स्पेशल स्क्रिनिंगचं आयोजन केलं होतं. स्क्रिनिंगसाठी सिनेमाची स्टार कास्ट येताच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला, घोषणाबाजी केली. समाजातील एका घटकाला दुखावणारा हा सिनेमा असल्याचा आरोप या आंदोलक विद्यार्थ्यांनी केला. विद्यार्थ्यांच्या थिएटरमध्ये सिनेमा दाखवण्याची काय गरज आहे असा सवालदेखील विद्यार्थ्यांनी केला.
संबंधित बातम्या