एक्स्प्लोर

Telly Masala : सलमान खानच्या सुरक्षेत वाढ ते 'जिगरा'च्या फेक बॉक्स ऑफिस कलेक्शनवर दिव्या खोसलाचा संताप; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंदर्भात महत्त्वाच्या बातम्या...

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

साऊथ सुपरस्टारकडून आलिया भटच्या लेकीसाठी खास गिफ्ट, राहाला हत्ती दिला भेट

Ram Charan Special Gift for Alia Bhatt's Daughter : साऊथ सुपरस्टार रामचरण आणि अभिनेत्री आलिया भट यांनी ब्लॉकबस्टर आरआरआर चित्रपटात एकत्र काम केलं आहे. या दोघांची चांगली मैत्री आहे. काम आणि व्यस्त शेड्युलमुळे दोघेही एकमेकांना फारसे भेटत नाहीत. पण, त्यामुळे त्यांच्या मैत्रीवर काही फरक पडत नाही. अलिकडे आलियाने सांगितलं की, तिच्या लेकीसाठी रामचरणने खास भेटवस्तू दिली आहे. अभिनेता रामचरणने आलिया भटची लेक राहासाठी हत्ती भेट दिला आहे. याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

मोठी बातमी : सलमान खानसोबतची मैत्री बाबा सिद्दीकींच्या मृत्यूचं कारण, पोलिस तपासात आतापर्यंत काय समोर आलं, A टू Z घटनाक्रम जाणून घ्या

Salman Khan and Baba Siddique Friendship : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची दसऱ्याच्या दिवशी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी आणि सलमान खान यांची घट्ट मैत्री होती. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा संबंध लॉरेन्स बिश्नोई गँगसोबत असल्याचं समोर आलं आहे. शनिवारी रात्री तीन जणांनी बाबा यांच्यावर गोळीबार केला. ज्यामध्ये ते जखमी झाले. यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. पण, रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

मसाबाच्या घरी बाळाचं आगमन ! फोटोही केला शेअर, अनुष्का सोनमसह आयुषमाननेही दिल्या शुभेच्छा

Entertainment : प्रसिद्ध अभिनेत्री व फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता हिच्या घरी बाळाचं आगमन झालं आहे. मसाबाने इंस्टाग्रॅमवर पोस्ट शेअर करून ही आनंदाची बातमी दिली आहे. या पोस्टवर अनुष्का शर्मा, सोनम कपूरसह अनेक बॉलीवूड कलाकारांनी मसाबाला शुभेच्छा दिल्या आहेत. मसाबा व सत्यदीप मिश्रा यांनी 2023 मध्ये लग्नगाठ बांधली होती. 18 एप्रिलला instagram अकाउंटवरून पोस्ट करत ते आई-बाबा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. आता त्यांच्या घरी लेकीचं आगमन झालं आहे. तिने केलेल्या पोस्टवर सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Jigra Collection : जिगराच्या फेक बॉक्स ऑफिस कलेक्शनवर दिव्या खोसलाचा संताप, आलियाने स्व:तचं चित्रपटाचे तिकीट खरेदी केल्याचा आरोप; वादात करण जोहरची उडी

Jigra Movie Box Office Collection : अभिनेत्री आलिया भटचा बहुचर्चित 'जिगरा' चित्रपट थिएटमध्ये दाखल झाला आहे. 11 ऑक्टोबरला रिलीज झालेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अद्याप काही खास कमाई करता आलेली नाही. प्रेक्षकांनी आलिया भट आणि वेदांग रैना स्टारर या चित्रपटाकडे पाठ फिरवल्याचं दिसत आहे. अनेक ठिकाणी या चित्रपटाचे शो रद्द करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. आता अभिनेत्री आणि दिग्दर्शक दिव्या खोसला कुमार हिने आलिया भटच्या जिगरा चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर करत टीका केली आहे. इतकंच नाही, तर आलिया भटने स्वत:चं चित्रपटाचे तिकीट्स विकत हाऊसफुलचे बोर्ड लावल्याचा आरोपही दिव्यानं केला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Big boss 18: बिग बॉसच्या घरात ठणाणा थांबणार! सलमानच्या कुकिंगला भारतीच्या कॉमेडीचा तडका, मल्लिकाचा रोमान्स अन् हे पाहुणेही येणार

Big boss 18: बिग बॉस 18 चा पर्वात या रविवारी घरात बॉलीवूड सेलिब्रिटींची धमाल पाहायला मिळणार आहे. मल्लिका शेरावतसह राजकुमार राव आणि तृप्ती डीमरी स्टेजवर येणार आहेत. याशिवाय लाफ्टर शेफचे विनोदवीरही बिग बॉसच्या घरात कल्ला करताना दिसतायत.  भारती, कृष्णा बिग बॉसच्या घरात येणार असून त्यांनी चक्क सलमान खानलाच कणिक मळायला लावल्याचं दिसतंय. या भागाचा धमाल प्रोमो कलर्स टीव्हीने त्यांच्या अधिकृत पेजवरून शेअर केला आहे. त्यामुळे सलमान खानच्या कुकिंगला भारती कृष्णाच्या कॉमेडीचा तडका आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. दरम्यान, स्पर्धकांचा ठाणाणा काही वेळ तरी थांबणार का याकडे प्रेक्षकांचे लक्ष आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

जेव्हा सुपरस्टारच्या लग्नात पोहोचले 'बिन बुलाये मेहमान'; चाहत्यांच्या गर्दीमुळे जेवणाचा तुटवडा, पाहुणे काटे-चमचे घेऊन घरी परतले

Dilip Kumar Saira Banu Wedding : बॉलिवूड अभिनेता दिलीप कुमार आणि सायरा बानो यांची प्रेम कहाणी इंडस्ट्रीमधील चर्चित लव्ह स्टोरीपैकी एक आहे. दिलीप कुमार आता या जगात नसले, तरी सायरा बानो त्यांच्याबद्दलचे किस्से शेअर करत त्यांच्या आठवणींना उजाळा देत असतात. सायरा बानो यांनी अलिकडेच सांगितलं की, त्यांचं लग्न फार घाईगडबडीत झालं होतं. त्यांचा लेहंगा एका साध्या लोकल टेलरने शिवला होता आणि लग्नपत्रिका देखील छापल्या गेल्या नव्हत्या. दिलीप कुमार यांनी सायरा यांच्या आईला फोन करुन मौलवींना बोलवून निकाह करण्याबद्दल सांगितलं.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Jail Rules : पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
EPFO चं मोठं पाऊल, ऑटो-सेटलमेंटची मर्यादा 1 लाखांवरुन 5 लाखांवर नेणार, यूपीआय अन् एटीएममधून पैसे काढता येणार
ईपीएफओचे दोन क्रांतिकारी निर्णय, ऑटो-सेटलमेंटची रक्कम 5 लाखांवर नेणार तर....
Indian Army : इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, अर्ज करण्यासाठी राहिले शेवटचे काही दिवस
इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, 21 ते 28 हजार रुपये दरमहा मिळणार, जाणून घ्या प्रक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 60 Superfast News : टॉप 60 बातम्यांचा वेगवान आढावा : 31 March 2025 : ABP MajhaDisha Salian Case : दिशा सालियन प्रकरण 2 माजी सहाय्यक पोलीस आयुक्तांनी वकील ओझांना पेनड्राईव्ह दिलाMahadev Gitte :कराडच्या लोकांनी महादेव गित्तेसह इतरांना मारहाण केली, गित्तेच्या पत्नीनं फेटाळला आरोपJob Majha | भारतीय रेल्वे मध्ये भरती | नोकरीची संधी | 31 March 2025 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Jail Rules : पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
EPFO चं मोठं पाऊल, ऑटो-सेटलमेंटची मर्यादा 1 लाखांवरुन 5 लाखांवर नेणार, यूपीआय अन् एटीएममधून पैसे काढता येणार
ईपीएफओचे दोन क्रांतिकारी निर्णय, ऑटो-सेटलमेंटची रक्कम 5 लाखांवर नेणार तर....
Indian Army : इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, अर्ज करण्यासाठी राहिले शेवटचे काही दिवस
इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, 21 ते 28 हजार रुपये दरमहा मिळणार, जाणून घ्या प्रक्रिया
धक्कादायक! भावी नवऱ्यालाच संपवण्याची सुपारी दिली; नवरी फरार, मारहाण करणाऱ्या 5 जणांना अटक
धक्कादायक! भावी नवऱ्यालाच संपवण्याची सुपारी दिली; नवरी फरार, मारहाण करणाऱ्या 5 जणांना अटक
Dattatray Bharne : पुण्यात पवार,पाटील-देशमुखांना न मिळालेली पदं मला नशिबाने मिळाली; मंत्री झाल्यानंतर दत्तामामा भरणेंना अजितदादांचा विसर? 
पुण्यात पवार,पाटील-देशमुखांना न मिळालेली पदं मला नशिबाने मिळाली; मंत्री झाल्यानंतर दत्तामामा भरणेंना अजितदादांचा विसर? 
Kunal Kamra : 10 वर्षांपासून जिथं राहत नाही तिथं, जाऊन येणं म्हणजे...कुणाल कामराची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
10 वर्षांपासून जिथं राहत नाही तिथं, जाऊन येणं म्हणजे...कुणाल कामराची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
संतोष देशमुखांना अडकवण्याचा प्लॅन असलेल्या कळंबच्या महिलेची हत्या? धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
संतोष देशमुखांना अडकवण्याचा प्लॅन असलेल्या कळंबच्या महिलेची हत्या? धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget