Sharad Ponkshe : "हिंदूच हिंदूत्वाच्या विरोधात उभे ठाकतात, स्वा. सावरकरांचं वाक्य पुन्हा खरं ठरलं" : शरद पोंक्षे
Sharad Ponkshe : निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर मराठी मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांची फेसबुक पोस्ट चर्चेत आहे.
Sharad Ponkshe : 'लोकसभा निवडणूक 2024'चा (Lok Sabha Election 2024) निकाल लागला आहे. मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक राजकीय नेते आणि मनोरंजनसृष्टीतील कलाकार मंडळी प्रतिक्रिया देत आहेत. अशातच आता मराठी मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांची फेसबुक पोस्ट चर्चेत आहे. निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर शरद पोंक्षे यांनी मोजक्या शब्दांत आपली पोस्ट केली आहे.
शरद पोंक्षे यांची पोस्ट काय? (Sharad Ponkshe Post)
शरद पोंक्षे यांनी आपल्या पोस्टमध्ये निवडणुकांचा उल्लेख केलेला नाही. पण पोस्टवरच्या कमेंट्सवरुनच ती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असल्याचं स्पष्ट होत आहे. शरद पोंक्षे यांनी लिहिलं आहे,"स्वा सावरकरांचं वाक्य पुन्हा खरं ठरलं,"मला मुस्लिमांची, ख्रिश्चनांची भिती वाटत नाही. मला हिंदूंची भिती वाटते. कारण हिंदूच हिंदूत्वाच्या विरोधात उभे ठाकतात".
शरद पोंक्षे यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा कमेंट्सचा वर्षाव
शरद पोंक्षे यांच्या पोस्टवर लिहिलं आहे,"मध्य प्रदेश, गुजरात, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमधील सगळ्या हिंदूंना खरचं नमन..कट्टर हिंदू यांना म्हणायचं, सावरकरांचे हिंदुत्व म्हणजे एकाच नेत्याची किंवा त्याच्या पक्षाची भलामन करणे नव्हे, डावी विचारसरणी पुन्हा डोकं वर काढू लागली, भक्ती देवाची करावी, माणसांची नाही, मुस्लिम मतांचा एकगठ्ठा मतदान हेच भाजप 400 पार पासून पराभूत होण्यासाठी कारणीभूत..यांना हिंदू राष्ट्रासाठी मोदीजी नक्कीच नको होते. काँग्रेसला ही संधी आयती मिळाली, अगदी खरं...सावरकरांचा द्रष्टेपणा कमाल, हिंदू अजूनही झोपलेलाच आहे, सत्याचा विजय झाला आणि हरामखोरी गळ्यात आली, हिंदुत्ववादी नेत्यांचे ठेकेदार मुस्लिम...मग कसे हिंदुत्व शिकवणार सामान्य लोकांना..पब्लिक है सर सब जानती है, जात आणि धर्म जिंकला, विकास हारला..उठा हिंदुनो आता तरी जागे व्हा , अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
महाराष्ट्रातला धक्कादायक निकाल
महाराष्ट्रातला निकाल धक्कादायक लागला आहे. अनेक दिग्गज नेत्यांना या निवडणुकीत धक्का बसला. महाराष्ट्रात मविआने महायुतीला धोबीपछाड घातलाय. महाराष्ट्रात मविआने 30 जागांवर मुसंडी मारली. तर महायुतीला अवघ्या 17 जागा मिळाल्या. तर सांगलीत अपक्ष विशाल पाटलांचा विजय झालाय. महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाच्या जनतेने मतदानातून सडेतोड उत्तर दिल्याचं बघायला मिळत आहे. 13 जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यंदा राज्यात काँग्रेसची दमदार कामगिरी केली आहे.
संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल अखेर काल जाहीर झाले. देशात भाजपप्रणित एनडीएची घोडदौड मतदारांनी 294 वरच रोखली. भाजपला 240 जागांवरच समाधान मानावं लागलं आहे. तर इंडिया आघाडीने 232 जागांपर्यंत मजल मारली आहे. एनडीएने बहुमताच आकडा पार केला असला तरी एनडीएची घटलेली आकडेवारी बोलकी आहे. लोकसभा निकालातून गेल्या 10 वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या भाजपप्रणित एनडी सरकारला हादरे बसलेत.
संबंधित बातम्या