Salman Khan : सलमान खानबद्दल प्रसिद्ध दिग्दर्शकाने केलं 'असं' वक्तव्य, अखेर सोडावी लागली फिल्म इंडस्ट्री; नेमकं घडलं काय?
Why Director JK Bihari Left Film Industry : दिग्दर्शक जेके बिहारी यांनी सलमान खानबद्दल असं वक्तव्य केलं होतं, ज्यामुळे त्यांना नंतर बॉलिवूडला राम-राम करावा लागला.
Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आज इंडस्ट्रीमधील एक मोठं नाव आहे. सलमान खानचे मोठा चाहतावर्ग आहे. सलमान खानची क्रेझ फक्त भारतातच नाही, तर जगभरात आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते फारच आतुर असतात. आज सलमान खानने फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेकांना काम मिळवून दिलं आहे. आज सलमान खान अनेकांचा गॉडफादर आहे. असं असलं तरी, सलमानचा इथंपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. वडील लेखक असतानाही त्याला पहिल्या चित्रपटासाठी खूप मेहनत करावी लागली होती. करियरच्या सुरुवातीला सलमान खान तब्येतीने खूप बारीक होता. त्यामुळे त्याला कोणताही चित्रपट मिळत नव्हता.
सलमान खानचा डेब्यू चित्रपट कोणता?
सलमान खानला 'मैने प्यार किया' चित्रपटातून खरी प्रसिद्धी मिळाली. पण, त्याचा पहिल्या चित्रपट 'मैने प्यार किया' नाही तर 'बीवी हो तो ऐसी' हा होता. 1988 मध्ये आलेल्या या चित्रपटात सलमान खानने सहाय्यक अभिनेत्याची भूमिका केली होती. त्यानंतर 1989 मध्ये सलमान खानला 'मैने प्यार किया' चित्रपटात मुख्य भूमिका करण्याची संधी मिळाली. या चित्रपटातून सलमान खानला प्रसिद्धी मिळाली. यामुळे या चित्रपटाला सलमान डेब्यू फिल्म मानतो.
पहिल्यांदा सहकलाकाराच्या भूमिकेत दिसला सलमान खान
सलमानचा डेब्यू चित्रपट 'बीवी हो तो ऐसी' जेके बिहारी यांनी दिग्दर्शित केला होता. जेके बिहारी यांच्याबद्दल खूप कमी लोकांना माहित आहे. कारण, काही चित्रपट केल्यानंतर त्यांनी फिल्म इंडस्ट्री सोडली. यामागचं कारणही सलमान खान असल्याचं बोललं जातं. दिग्दर्शक जेके बिहारी यांनी सलमान खानबद्दल असं वक्तव्य केलं होतं, ज्यामुळे त्यांना नंतर बॉलिवूडला राम-राम करावा लागला.
सलमान खानबद्दल प्रसिद्ध दिग्दर्शकाने केलं 'असं' वक्तव्य
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खानला 'बीवी हो तो ऐसी' हा चित्रपट मोठ्या कष्टाने पहिला ब्रेक मिळाला कारण तो त्यावेळी दिसायला खास नव्हता. सलमान तेव्हा शरीरयष्टीने खूप बारीक होता तुम्ही आजच्या सलमानची 90 च्या दशकात तुलनाच करू शकत नाही. याच कारणामुळे त्याला बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी खूप मेहनत करावी लागली होती. अखेर त्याला 'बीवी हो तो ऐसी' चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली, पण एक सहाय्यक कलाकार म्हणून.
अखेर सोडावी लागली फिल्म इंडस्ट्री
एकदा 'बीवी हो तो ऐसी'चे निर्माते सुरेश भगत यांनी मीडियाशी संवाद साधताना खुलासा केला होता की, जेके बिहारी यांनी त्यांना सांगितलं होतं की, जर सलमान खान स्टार बनला तर ते फिल्म इंडस्ट्री सोडतील आणि त्यांनी तसं केलं. जेव्हा सलमान स्टार झाला तेव्हा जेके बिहारी यांनी फिल्म इंडस्ट्रीला अलविदा केला.
90 च्या दशकात जेव्हा सलमान बॉक्स ऑफिसचा बादशाह बनला तेव्हा जेके बिहारी चित्रपटांपासून दूर झाले. जेके बिहारी यांना 'बीवी हो तो ऐसी', 'इंताहा प्यार का', 'चुनौती' आणि 'इन्साफ कौन करेगा' या चित्रपटांसाठी ओळखले जातात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :