Tiger 3 : सलमानच्या 'टायगर'चा दिवाळी धमाका; मध्यरात्री शो, ब्लॅकमध्ये तिकीटांची विक्री, चाहत्यांचा जल्लोष; 'टायगर 3'ने दोन दिवसांत पार केला 100 कोटींचा टप्पा
Salman Khan : सलमान खानचा बहुचर्चित 'टायगर 3' (Tiger 3) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Salman Khan Tiger 3 Box Office Collection : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan) बहुचर्चित 'टायगर 3' (Tiger 3) हा सिनेमा अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत आहे. एकंदरीतच सलमानने दिवाळीत धमाका केला आहे. मध्यरात्री शो, ब्लॅकमध्ये तिकीटांची विक्री, थिएटरमध्ये फटाके फोडणं ते चाहत्यांचा जल्लोष अशा सर्व गोष्टी पाहायला मिळत आहेत.
सलमान खानचा काही दिवसांपूर्वी आलेला 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडला होता. त्याआधीही सलमानच्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे भाईजानचा 'टायगर 3' या सिनेमा किती कमाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
'टायगर 3'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Tiger 3 Box Office Collection)
'टायगर 3' हा सिनेमा 12 नोव्हेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी ओपनिंग डेला या सिनेमाने 44.5 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी या सिनेमाच्या कमाईत वाढ झाली. रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 'टायगर 3'ने 57.52 कोटींची कमाई केली. एकंदरीतच रिलीजच्या दोन दिवसांत सिनेमाने 100 कोटींचा टप्पा पार करत 102.2 कोटींचा गल्ला जमवला आहे.
'टायगर 3'ने दोन दिवसांत तोडला 'या' सिनेमांचा रेकॉर्ड
सलमानच्या 'टायगर 3'ने रिलीजच्या दोन दिवसांत बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. 'बाहुबली 2'ने दोन दिवसांत 40.25 कोटी, गदर ने 38.7 कोटी, टायगर जिंदा है या सिनेमाने 36.54 कोटी, जवानने 30.5 कोटी, बजरंगी भाईजानने 27.05 कोटी, 'केजीएफ चॅप्टर 2'ने 25.57 कोटी, पठाणने 25.5 कोटींची कमाई केली होती. 'टायगर 3'ने या सर्व सिनेमांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
सलमानची ट्वीट करत नाराजी व्यक्त...
सलमानचा सिनेमा पाहायला गेलेले प्रेक्षक थिएटरमध्ये जल्लोष करत फटाकेदेखील फोडत आहेत. याबद्दल भाईजानने ट्वीट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्याने लिहिलं आहे,"टायगर 3' दरम्यान थिएटरमध्ये फटाके वाजवले जात आहेत. ही धोकादायक बाब आहे. स्वत:चा आणि इतरांचा जीव धोक्यात न घालता सिनेमाचा आनंद घ्या. सुरक्षित राहा".
I'm hearing about fireworks inside theaters during Tiger3. This is dangerous. Let's enjoy the film without putting ourselves and others at risk. Stay safe.
— Salman Khan (@BeingSalmanKhan) November 13, 2023
संबंधित बातम्या