Salman Khan : सलमानच्या चित्रपटाशिवाय यंदाची ईद, चाहते नाराज पण सोशल मीडियावर भाईजान होतोय ट्रेंड
Salman Khan on Eid : सलमान खानचे चाहत्यांना आज ईदच्या दिवशी त्याची खूप आठवण येत आहे. ईदच्या मुहूर्तावर दरवर्षी भाईजानचा (Bhaijaan) एक चित्रपट रिलीज होत असतो. पण यंदा मात्र त्याचा कोणताही चित्रपट रिलीज होणार नाही. पण तरीही सोशल मीडियीवर सलमान ट्रेडिंगमध्ये आहे.
Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) नेहमीच चर्चेत असतो. सलमानचा मोठा चाहतावर्ग आहे. सलमानचा चित्रपट (Salman Khan Movies) रुपेरी पडद्यावर पाहणं हा चाहत्यांसाठी एक उत्सव असतो. सलमान खान दरवर्षी ईदच्या (Eid) मुहूर्तावर त्याचे चित्रपट रिलीज करत असतो. पण यंदा मात्र ईदच्या मुहूर्तावर भाईजानचा कोणताही चित्रपट रिलीज होणार नाही. त्यामुळे सलमानच्या चाहत्यांसाठी यंदाची ईद वेगळीच असणार आहे. आज सलमानचा कोणताही चित्रपट रिलीज होत नसला तरी तो सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये आहे. सोशल मीडियावर #WeMissSalmanKhanInThearesOnEid हे खूप ट्रेंड होत आहे.
सलमानचे चाहते ईदच्या दिवशी त्याच्या चित्रपटांची प्रतीक्षा करत असतात. पण यंदाच्या ईदला भाईजानने चाहत्यांना नाराज केलं आहे. ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या भाईजानच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली आहे. दबंग, एक था टायगर, किक, बजरंगी भाईजान, सुल्तान हे भाईजानचे चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाले आणि ब्लॉकबस्टर ठरले. (Salman Khan Blocbuster Movie Release On Eid)
सोशल मीडियावर सलमान खान होतोय ट्रेंड (Salman Khan Trending on Social Media)
सलमान खानच्या चाहत्यांना आज ईदच्या दिवशी त्याची आणि त्याच्या चित्रपटांची आठवण येत आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून ते सलमानची आठवण येत असल्याचं सांगत आहेत. ईद म्हणजे सलमान भाईचा चित्रपट रिलीज होणं आलंच. यंदा भाईजानला आम्ही रुपेरी पडद्यावर मिस करणार. पण 'ईद 2025'ला एक धमाकेदार चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी तो सज्ज असेल. साजिद नाडियाडवाला या चित्रपटाची निर्मिती करत आहेत, सलमानचा चित्रपट पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येईल, #WeMissSalmanKhanInTheatresOnEid, पुढच्या ईदला भाईजानचा अॅक्शनपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार, @BeingSalmanKhan चाहते हा थरार नाट्य असणारा प्रवास अनुभवण्यासाठी सज्ज व्हा, सलमानच्या चित्रपटाशिवाय यंदाची ईद".
Eid Festival is synonyms with Salman Bhai movie release. This year, we definitely gonna miss Salman Bhai on Big Screen, but he is coming to Rule again on Eid 2025 with his next flick Produce by #SajidNadiadwala direction by #ARM.#WeMissSalmanKhanInTheatresonEID
— 𝐋𝐚𝐧𝐤𝐞𝐬𝐡 𝟐.𝟎 (@_freak4bhai) April 10, 2024
This Eid, we'll miss #SalmanKhan on the big screen, but worry not! Salman's return next year will surely bring an epic film with Sajid Nadiadwala and A R Murugadoss. Can't wait!#WeMissSalmanKhanInTheatresOnEid
— pulkit. (@jerseyno27) April 10, 2024
सलमानच्या चाहत्यांना 'Eid 2025'ची प्रतीक्षा
सलमान खानचा आगामी चित्रपट 'ईद 2025'ला प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे. साजिद नाडियाडवाल (Sajid Nadiadwala) आणि एआर मुरुगदॉस यांचा हा चित्रपट असणार आहे. आज ईदच्या मुहूर्तावर या चित्रपटाची घोषणा करण्यात येईल असं म्हटलं जात आहे. भारतासह परदेशात या चित्रपटाचं शूटिंग होणार आहे. सलमानच्या या बिग बजेट चित्रपटाची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.
'ईद'ला तुम्ही कोणता चित्रपट पाहणार?
'ईद'च्या मुहूर्तावर यंदा बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अजय देवगन (Ajay Devgn) यांचे चित्रपट रिलीज होणार आहेत. अजय देवगनचा 'मैदान' (Maidan) आणि अक्षय कुमारचा 'बडे मियां छोटे मियां' (Bade Miyan Chote Miyan) हे चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहेत. त्यामुळे यंदाच्या ईदला (Eid 2024) कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या