
Rambha Car Accident : बॉलिवूड अभिनेत्री रंभाचा अपघात; गाडीचा चक्काचूर, मुलगी जखमी
Rambha Car Accident : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रंभा हिच्या गाडीला भीषण अपघात. गाडीचा चक्काचूर झाला असून अपघातात मुलगी जखमी झाली आहे.

Actress Rambha Car Accident : बॉलिवूडची (Bollywood News) प्रसिद्ध अभिनेत्री रंभा (Actress Rambha) हिचा भीषण अपघात असल्याची माहिती मिळत आहे. अभिनेत्री रंभाच्या गाडीला भीषण अपघात (Rambha Car Accident) झाला आहे. या अपघातात अभिनेत्री रंभाच्या कारचा चक्काचूर झाला. कारमध्ये अभिनेत्रीची मुले आणि त्यांच्या आयाही उपस्थित होत्या. अभिनेत्रीच्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कसा झाला अपघात?
अभिनेत्री रंभानं कार अपघाताची धक्कादायक बातमी तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरुन चाहत्यांसोबत शेअर केली आहे. आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये तिनं अपघाताचे फोटोही शेअर केले आहेत. फोटोंवरुन अपघात किती भीषण होता, हे लक्षात येतं. अपघातात रंभाच्या कारचं मोठं नुकसान झाल्याचं फोटोंमध्ये दिसत आहे. कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. अपघातात रंभाच्या मुलीला दुखापत झाली आहे.
View this post on Instagram
अपघाताची दु:खद बातमी चाहत्यांशी शेअर करताना रंभानं तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय की, "मुलांना शाळेतून घेऊन घरी जात असताना आमची कार दुसऱ्या कारला धडकली. माझ्यासोबत माझी लहान मुलं आणि त्यांची नॅनी होती. आम्ही सर्व सुरक्षित आहोत. आम्हाला किरकोळ दुखापत झाली आहे. पण माझी छोटी मुलगी साशाला दुखापत झाली असून अजूनही ती हॉस्पिटलमध्ये आहे. कृपया आमच्यासाठी प्रार्थना करा. तुमच्या प्रार्थनांची आम्हाला गरज आहे."
रंभाच्या मुलीवर उपचार सुरु
कारचे फोटो शेअर करण्यासोबतच तिनं हॉस्पिटलमधील आपल्या मुलीचा फोटोही शेअर केला आहे. रंभाच्या मुलीवर सध्या उपचार सुरु आहेत. रंभाने चाहत्यांना त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली आहे. रंभाच्या पोस्टवर कमेंट करून, सेलिब्रिटी आणि चाहते तिच्या प्रकृतीची विचारपूस करत आहेत. तसेच, तिच्या मुलीला लवकर बरं वाटावं यासाठी प्रार्थना करत आहेत. त्याचबरोबर अनेक लोक रंभाला या कठीण काळात खंबीर राहण्याचा सल्लाही देत आहेत. रंभाची पोस्ट सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. अपघाताच्या बातमीनं चाहते अस्वस्थ झाले आहेत.
दरम्यान, अभिनेत्री रंभा सध्या फिल्मी दुनियेपासून दूर असली तर, पण एकेकाळी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये तिचा समावेश होता. नव्वदच्या दशकात अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत होती. आपल्या बॉलिवूड करिअरमध्ये रंभानं अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं. रंभानं 'जुडवा' चित्रपटातून दबंग खान सलमान खानसोबत स्क्रिन शेअर केली होती. या चित्रपटातून तिला विशेष ओळख मिळाली. जुडवा व्यतिरिक्त रंभा 'घरवाली बाहरवाली', 'क्योंकि मैं झूठ नहीं बोलता' यासह अनेक चित्रपटांमध्ये दिसली होती. रंभानं हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, बंगाली चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
