एक्स्प्लोर

पालकमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपला चॉइस सांगितला; भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात, तशी गडचिरोलीकरांची इच्छा!

Chandrasekhar Bawankule : गडचिरोलीमधून तशी मागणी होत आहे की देवेंद्र फडणवीस यांनीच गडचिरोलीचे पालकत्व स्वीकारावे. असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी पालकमंत्रीपदासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

Nagpur News: गडचिरोलीमधून अशी मागणी आहे की जिल्ह्याचे पालकत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावे. जेव्हा मुख्यमंत्री एखाद्या जिल्ह्याचे पालकमंत्री होतात, तेव्हा तिथल्या विकासाला गती मिळते. गडचिरोलीमधून तशी मागणी होत आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच गडचिरोलीचे पालकत्व स्वीकारावे. असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी पालकमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांनी देलेल्या चॉइस संदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरातील पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले होते की, पालकमंत्र्याच्या संदर्भात आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इतर दोन्ही पक्षांसोबत बसून कुठे कोण पालकमंत्री असेल याचा निर्णय करतील. ते जो निर्णय करतील तो मला मान्य असेल, त्यांनी मला बीडला जायला सांगितलं तर मी बीडला देखील जाईल, किंवा त्यांनी जिथे जायला सांगितलं तिथे जाईल. साधारणपणे मुख्यमंत्री कुठलं पालकत्व ठेवत नसतात. पण माझी स्वतःची इच्छा आहे, गडचिरोली मात्र मी स्वतःकडे ठेवू इच्छितो, अर्थात या तीन नेत्यांनी मान्यता दिली तरच मी ते ठेवेन, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होते. याच मुद्यांवर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.   

मंत्रीपदे आणि खाते यांच्यासाठी ज्याप्रमाणे रस्सीखेच सुरू होती, तशीच रस्सीखेच आता देखील पालकमंत्रिपदासाठी पाहायला मिळत आहे. 36 पैकी 11 जिल्ह्यात ही रस्सीखेच जरा जास्तच तीव्र असल्याचं दिसत आहे. पुणे, रायगड, नाशिक, संभाजीनगर, बीड, सातारा हे जिल्हे पालकमंत्रिपदासाठी प्रतिष्ठेचे बनले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रिपदावर एकापेक्षा जास्त पक्षाच्या मंत्र्यांनी दावा केल्याने याचे वाटप करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कसरत होणार असल्याच्या चर्चा होत्या. आता तिन्ही पक्षातील मंत्र्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळवण्यावरून रस्सीखेच सुरू झाली असल्याचे चित्र आहे. अशातच भाजपच्या गोटातून यावर भाष्य करण्यात आले आहे. 

पालकमंत्री पदासंदर्भात मुख्यमंत्र्यांचे निर्देश 

दरम्यान, रामटेक बंगल्यासंदर्भात सर्वत्र गैरसमज झाला आहे. पंकजा मुंडेंनी रामटेक बंगला मागितला आहे. आमच्या ताईने हा बंगला मागितला आहे. तो त्यांना दिला पाहिजे.  असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात राज्य भाजप, स्थानिक भाजप युनिटवर कुठलाही निर्णय लादणार नाही. महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जिल्हा पातळीवरचे युनिट जो निर्णय करेल तो निर्णय महाराष्ट्र प्रदेश भाजप मान्य करेल, असेही ते म्हणाले. पालकमंत्री पदा संदर्भात मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहे की तिन्ही पक्षांनी एकत्रित बसून निर्णय करावे. एकनाथ शिंदे, अजित दादा आणि मी आम्ही तिघेही बसू चर्चा करू आणि त्या संदर्भात निर्णय करून त्यानंतर मुख्यमंत्री ते जाहीर करतील, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

वाळू माफिया पूर्णपणे संपणार नाही, मात्र...  

वाळू माफिया राज्याला आणि लोकांना लुटत आहेत. लोकांना दर वाढून वाळू मिळत नाही. शासनाच्या कामासाठी ही वाळू मिळत नाहीये. डिमांड अँड सप्लायच्या प्रमाणे लोकांना वाळू मिळेल अशी चेन निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करू. मी असं म्हणत नाही की वाळू माफिया पूर्णपणे संपेल. मात्र आमूलाग्र बदल झालेला तुम्हाला पाहायला मिळेल, असा विश्वासही चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला आहे. जुन्या योजना आहेत आणि कालबाह्य झाले आहेत त्या संदर्भातला आढावा घेऊन पुनर्विचार करू, असेही ते म्हणाले.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकीकडे महायुती सरकारकडून कोट्यवधींच्या बाता, दुसरीकडे खरेदी केंद्रावरील प्रतीक्षेमुळे सोयाबीन शेतकऱ्यांचा प्राण डोळ्यात आला
एकीकडे महायुती सरकारकडून कोट्यवधींच्या बाता, दुसरीकडे खरेदी केंद्रावरील प्रतीक्षेमुळे सोयाबीन शेतकऱ्यांचा प्राण डोळ्यात आला
Pradosh Vrat 2025 : एकवेळ उपाशी राहा, पण प्रदोष व्रतात चुकूनही करू नका 'ही' कामं; कोसळेल संकटांचा डोंगर
एकवेळ उपाशी राहा, पण प्रदोष व्रतात चुकूनही करू नका 'ही' कामं; कोसळेल संकटांचा डोंगर
Vijay Wadettiwar on ST Fair Hike : एसटी दरवाढ मंत्र्यांनी केली नाही मग केली कोणी, हे खाते चालवते कोण? विजय वडेट्टीवारांचा महायुती सरकारवर घणाघाती प्रहार
एसटी दरवाढ मंत्र्यांनी केली नाही मग केली कोणी, हे खाते चालवते कोण? विजय वडेट्टीवारांचा महायुती सरकारवर घणाघाती प्रहार
Masik Shivratri 2025 : आज वर्षातील पहिल्या मासिक शिवरात्रीला करा 'हे' छोटे उपाय; क्षणात उघडेल निद्रीस्त भाग्य, सुख-संपत्तीत होईल अपार वाढ
आज वर्षातील पहिल्या मासिक शिवरात्रीला करा 'हे' छोटे उपाय; क्षणात उघडेल निद्रीस्त भाग्य, सुख-संपत्तीत होईल अपार वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

९ सेकंदात बातमी Top 90 at 9AM Superfast 27 January 2025 सकाळी ९ च्या महत्वाच्या बातम्याABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 27 January 2025Achyut Palav Padma Shri Award : सुविचार लिहिण्यापासून ते पद्मश्रीपर्यंतचा प्रवास; अच्युत पालवABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 27 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकीकडे महायुती सरकारकडून कोट्यवधींच्या बाता, दुसरीकडे खरेदी केंद्रावरील प्रतीक्षेमुळे सोयाबीन शेतकऱ्यांचा प्राण डोळ्यात आला
एकीकडे महायुती सरकारकडून कोट्यवधींच्या बाता, दुसरीकडे खरेदी केंद्रावरील प्रतीक्षेमुळे सोयाबीन शेतकऱ्यांचा प्राण डोळ्यात आला
Pradosh Vrat 2025 : एकवेळ उपाशी राहा, पण प्रदोष व्रतात चुकूनही करू नका 'ही' कामं; कोसळेल संकटांचा डोंगर
एकवेळ उपाशी राहा, पण प्रदोष व्रतात चुकूनही करू नका 'ही' कामं; कोसळेल संकटांचा डोंगर
Vijay Wadettiwar on ST Fair Hike : एसटी दरवाढ मंत्र्यांनी केली नाही मग केली कोणी, हे खाते चालवते कोण? विजय वडेट्टीवारांचा महायुती सरकारवर घणाघाती प्रहार
एसटी दरवाढ मंत्र्यांनी केली नाही मग केली कोणी, हे खाते चालवते कोण? विजय वडेट्टीवारांचा महायुती सरकारवर घणाघाती प्रहार
Masik Shivratri 2025 : आज वर्षातील पहिल्या मासिक शिवरात्रीला करा 'हे' छोटे उपाय; क्षणात उघडेल निद्रीस्त भाग्य, सुख-संपत्तीत होईल अपार वाढ
आज वर्षातील पहिल्या मासिक शिवरात्रीला करा 'हे' छोटे उपाय; क्षणात उघडेल निद्रीस्त भाग्य, सुख-संपत्तीत होईल अपार वाढ
Orange Growers Compensation : सततच्या पावसाने नुकसान झालेल्या विदर्भातील संत्रा उत्पादकांना तब्बल 165 कोटींची नुकसान भरपाई जाहीर; मात्र, नागपूरला दीड दमडी सुद्धा नाही!
सततच्या पावसाने नुकसान झालेल्या विदर्भातील संत्रा उत्पादकांना तब्बल 165 कोटींची नुकसान भरपाई जाहीर; मात्र, नागपूरला दीड दमडी सुद्धा नाही!
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतानंतर आता बांगलादेशवर सर्जिकल स्ट्राईक! एका झटक्यात अंतरिम सरकारच्या नाड्या आवळल्या
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतानंतर आता बांगलादेशवर सर्जिकल स्ट्राईक! एका झटक्यात अंतरिम सरकारच्या नाड्या आवळल्या
Ajit Pawar & Sharad Pawar: शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अजितदादांचा फोन, राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण
शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अजितदादांचा फोन, राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण
Delhi Election : चला, महाठग अरविंद केजरीवालांच्या 'शीशमहल'वर फेरफटका मारुया! भाजपकडून थेट तीन मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल
Video : चला, महाठग अरविंद केजरीवालांच्या 'शीशमहल'वर फेरफटका मारुया! भाजपकडून थेट तीन मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल
Embed widget