City 60 : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 25 December 2024: ABP Majha
कल्याण पूर्वेतील अपहरण आणि हत्येचं प्रकरण, आरोपी विशाल गवळीला बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमधून अटक.
कल्याण पूर्वेतील अपहरण आणि हत्या प्रकरणात आरोपी विशाल गवळीची पत्नी साक्षी गवळीला दोन दिवसांची पोलीस कोठडी, विशाल गवळीला पत्नीने मदत केल्याची धक्कादायक माहिती समोर, पतीने आपल्याला सोडू नये यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पत्नीने मदत केल्याची माहिती.
कल्याणमधील आरोपी विशाल गवळीचं सीसीटीव्ही फुटेज समोर, मृतदेह टाकल्यानंतर एका बारमध्ये दारु घेताना विशाल आढळला, अल्पवयीन मुलीसोबत केलेल्या कृत्याचा पश्चाताप नव्हता.
खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार राजेश मोरेंनी घेतली कल्यणमधील पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट, आरोपीला फाशी देण्यासाठी सरकारचे प्रयत्न, श्रीकांत शिंदेंची माहिती.
बदलापूरप्रमाणे कल्याण प्रकरणातील नराधमालाही गोळ्या घाला, स्थानिक महिला आणि शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांची मागणी, कोळसेवाडी पोलिसांना दिलं निवेदन.
परमीट वाहनानं लहान मुलाच्या अंगावरुन गाडी नेल्याची धक्कादायक घटना समोर, घटनेनंतर कारचालक फरार, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद, वसई पूर्वेतील घटना.
लातूरमधील बाळू डोंगरे हत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर प्रमोद घुगेला सहा दिवसाची पोलीस कोठडी. दोन दिवसापूर्वी प्रमोद घुगेला हरिद्वारमधून अटक करण्यात आली होती. दहा दिवसांपूर्वी बाळू डोंगरे या सिक्युरिटी सुपरवायझरची झाली होती हत्या.
पिंपरी चिंचवडमधील बसमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा पीएमपी प्रशासनाचा निर्णय, प्रत्येक बसमध्ये ३ सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार, दोन महिन्यात पीएमपी त्यांच्या मालकीच्या १००६ बसमध्ये बसवणार सीसीटीव्ही.