एक्स्प्लोर

कल्याण अत्याचारप्रकरणी संताप, उपसभापती निलम गोऱ्हेंचं पोलिसांना पत्र; आरोपीला जामीन मिळू देऊ नका

कल्याणमधील अत्याचाराच्या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त होत असून 23 डिसेंबरच्या संध्याकाळी 13 वर्षांची अल्पवयीन मुलगी खाऊ आणण्यासाठी बाहेर पडली होती.

मुंबई : बाललैंगिक अत्याचाराची बदलापूरपेक्षाही संतापजनक घटना कल्याणमध्ये (Kalyan) घडल्यानंतर सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे. कल्याणमध्ये एका 13 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्याआधी तिचे अपहरण करण्यात आले होते. ही घटना अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आरोपीला कठोर शिक्षा व्हावी असे निर्देश शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam gorhe) यांनी ठाणे पोलीस आयुक्त यांना दिले आहेत. दुसरीकडे आरोपीला बुलढाणा येथून कल्याण पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असता आरोपी बुलढाण्यात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर, शेगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. आता, त्याला कल्याणमध्ये आणलं जात आहे.  

कल्याणमधील अत्याचाराच्या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त होत असून 23 डिसेंबरच्या संध्याकाळी 13 वर्षांची अल्पवयीन मुलगी खाऊ आणण्यासाठी बाहेर पडली होती. त्यानंतर ती बेपत्ता झाली. यामध्ये ठाणे ग्रामीण पडघा पोलीस स्टेशनमध्ये FIR क्र ११९०/२०२४ दिनांक २३/१२/२०२४  नोंदविण्यात आला. 24 डिसेंबरला पोलिसांना कल्याणजवळच्या बापगाव या ठिकाणी अल्पवयीन मुलीचा मृतदेह फेकून दिलेल्या अवस्थेत आढळून आला. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. माहितीनुसार, त्यामध्ये आरोपीला त्याच्या पत्नीची साथ दिल्याचे समजते. या प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी निवेदनाद्वारे विशेष सूचना दिल्या आहेत. आरोपींना जामीन मिळणार नाही व कठोर शिक्षा होईल यासाठी आवश्यक सर्व पुरावे सादर करावेत. सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावे यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. तसेच, सरकारच्यावतीने निष्णात अभियोक्त्यांची नियुक्त करावी, असेही उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सूचवले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही व पुरावे तपासून घ्यावेत. बाधित कुटुंबास तत्काळ मदत करून समुपदेशन करावे. त्याचबरोबर लहान मुलींचे अपहरण, अत्याचार रोखण्यासाठी एसओपी तयार करण्यात यावा, अशा सूचना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ठाणे पोलीस आयुक्त यांना दिल्या आहेत.

श्रीकांत शिंदे यांनीही दिली प्रतिक्रिया

दरम्यान, शिवसेना नेते आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली असून आरोपीला शंभर टक्के त्याला फाशीची शिक्षा होईल, यासाठी सरकारकडून पूर्ण प्रयत्न आहेत असे श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं. 

हेही वाचा

राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vikas Thakre : आमची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण : काँग्रेस आमदार विकास ठाकरेAnjali Damania on Dhananjay Munde :मुंडेंच्या विरोधात पुरावे सादर केलेत;अजितदादा म्हणालेत,निर्णय घेऊJob Majha : जॉब माझा : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी :  ABP MajhaGuardian Minister : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Embed widget