Ram Charan Daughter Name : शाही थाट...हटके नाव... राम चरणच्या लेकीचं थाटात पार पडलं बारसं; मुकेश अंबनींकडून बाळाला एक कोटी रुपयांच्या सोन्याच्या पाळण्याचं महागडं गिफ्ट
Ram Charan Baby Girl Name : राम चरणच्या लेकीचा नामकरण सोहळा नुकताच पार पडला आहे.
Ram Charan Upasana Baby Girl Name : राम चरण (Ram Charan) आणि उपासना (Upasana Kamineni) नुकतेच आई-बाबा झाले आहेत. उपासनाने एका गोड मुलीला जन्म दिला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी कन्यारत्न झाल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. आता त्यांच्या लाडक्या लेकीचा नामकरण सोहळा नुकताच पार पडला आहे. बारश्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
राम चरणच्या लेकीचं नाव काय आहे? (Ram Charan Baby Girl Name)
राम चरणने आपल्या लाडक्या लेकीचं नाव खूपच हटके ठेवलं आहे. त्याने 'कालिन कार कोनिडेला' असं नाव ठेवलं आहे. एक खास पोस्ट शेअर करत उपासनाने मुलीच्या नावाचा अर्थही सांगितला आहे. तिने लिहिलं आहे,"कालिन कार हे नाव ललिता सहस्रनाम स्त्रोतातून घेतलं आहे. आध्यात्मिक जागृती करणारं हे नाव आहे".
थाटात पार पडलं राम चरणच्या लेकीचं बारसं
राम चरणच्या लाडक्या लेकीचं बारसं शाही थाटात पार पडलं आहे. बारशाच्या कार्यक्रमासाठी राम चरणच्या कुटुंबियांनी पारंपारिक लूक केला होता. दाक्षिणात्य गेटअपमध्ये सर्व मंडळी खूपच सुंदर दिसत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. अद्याप राम चरणने आपल्या लाडक्या लेकीची पहिली झलक चाहत्यांना दाखवलेली नाही. पण चाहते कॅलिनची पहिली झलक पाहण्यासाठी आतुर असून कमेंट्स करत ते राम चरण आणि उपासनाचं अभिनंदन करत आहेत.
View this post on Instagram
मुकेश अंबनींकडून बाळाला एक कोटी रुपयांच्या सोन्याच्या पाळण्याचं महागडं गिफ्ट
पिंकव्हिलाने दिलेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी आणि नीता अंबानीदेखील राम चरणच्या आनंदात सहभागी झाले आहेत. राम चरणच्या लेकीला त्यांनी सोन्याचा पाळणा भेट म्हणून दिला आहे. या पाळण्याची किंमत एक कोटी रुपये असल्याचे म्हटले जात आहे. राम चरण आणि उपासनानेदेखील एक खास पाळणा बाळासाठी आणला होता.
राम चरण आणि उपासनाला 20 जून 2023 रोजी कन्यारत्न झालं आहे. त्यावेळी आजी-आजोबांपासून हे अल्लू अर्जुनपर्यंत अनेक सेलिब्रिटी बाळाला पाहण्यासाठी रुग्णालयात गेले होते. आपल्या नातीबद्दल बोलताना मेगास्टार चिरंजीवी म्हणाले होते,"राम चरणची लेक सकारात्मकता घेऊन आली आहे. मंगळवार हा दिवस आमच्यासाठी खूपच खास आहे. या शुभदिनी बाळाचा जन्म झाला याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत".
संबंधित बातम्या