एक्स्प्लोर

अभिनेते रजनीकांत यांना 'आयकॉन ऑफ गोल्डन ज्युबिली ऑफ इफ्फी' पुरस्कार जाहीर

रजनीकांत यांनी विविध भाषांमधल्या 170 चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. त्यात तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम, हिंदी आणि बंगाली चित्रपटांचा समावेश आहे. 'ब्लड स्टोन' या हॉलिवूडपटाही त्यांनी भूमिका केली आहे. भारत सरकारने 2000 साली पद्मभूषण आणि 2016 साली पद्मविभूषण देऊन त्यांचा सन्मान केला आहे.

गोवा : केंद्र सरकारने पहिल्यांदाच इफ्फी म्हणजेच आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात 'आयकॉन ऑफ गोल्डन ज्युबिली ऑफ इफ्फी' या विशेष पुरस्काराची घोषणा केली आहे. इफ्फीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त दिला जाणारा हा पुरस्कार चित्रपट अभिनेते एस रजनीकांत यांना जाहीर करण्यात आला आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्लीत ही घोषणा केली. भारतीय चित्रपट सृष्टीला गेली अनेक दशके दिलेल्या अमूल्य योगदानाची आदरपूर्वक दखल घेत, आयकॉन ऑफ गोल्डन ज्युबिली ऑफ इफ्फी 2019, हा पुरस्कार सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांना जाहीर करताना मला विशेष आनंद होत आहे, असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटल.

सुतार, पोर्टर, बस कंडक्टर अशी आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या रजनीकांत यांचा अत्यंत लोकप्रिय सुपरस्टार अभिनेत्यापर्यंतचा प्रवास एखाद्या अद्भुत, रंजक चित्रपट कथेइतकाच विलक्षण आहे. 12 डिसेंबर 1950 रोजी कर्नाटकात एका मराठी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असं आहे. चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी आपला चरितार्थ चालवण्यासाठी अनेक छोटी-मोठी कामे, नोकऱ्या केल्या. बंगळुरु येथे कर्नाटक एस टी महामंडळात त्यांनी बस कंडक्टरची नोकरीही केली. त्याच काळात नाटकात कामे करत असताना त्यांच्यातल्या सुप्त अभिनेत्याला वाव मिळाला आणि त्यांची अभिनयाची आवड बहरली.

आज भारतात लोकप्रियतेचे सर्वोच्च शिखर गाठणाऱ्या रजनीकांत यांना त्यांची पहिली भूमिका पुटन्ना कानागल यांनी दिग्दर्शित केलेला कानडी चित्रपट कथा संगममध्ये मिळाली. त्यानंतर के बालचंदर यांचा तमिळ चित्रपट 'अपूर्व रागंगल' (1975) मध्ये त्यांनी एका कर्करोगग्रस्त व्यक्तीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात प्रमुख भूमिका अभिनेता कमल हासन यांची होती. जे नंतर त्यांचे जवळचे मित्रही झाले. या चित्रपटातली रजनीकांत यांची भूमिका खुप गाजली आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिलेच नाही.

त्यांच्या दीर्घ आणि नाट्यपूर्ण कारकीर्दीत, रजनीकांत यांनी विविध भाषांमधल्या 170 चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. त्यात तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम, हिंदी आणि बंगाली चित्रपटांचा समावेश आहे. 'ब्लड स्टोन' या हॉलिवूडपटाही त्यांनी भूमिका केली आहे. भारत सरकारने 2000 साली पद्मभूषण आणि 2016 साली पद्मविभूषण देऊन त्यांचा सन्मान केला आहे. 45 व्या इफ्फी चित्रपट महोत्सवात (2014) त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय व्यक्ती म्हणून शतकवर्षपूर्ती पुरस्कार देण्यात आला.

2019 हे वर्ष इफ्फीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. या सुवर्णमहोत्सवी वर्षातल्या महोत्सवात, 76 देशांतील 200 सर्वोत्कृष्ट चित्रपट दाखवले जाणार आहेत. इंडियन पैनोरामा क्षेत्रात 26 फिचर फिल्म्स आणि 15 माहितीपट दाखवले जातील. 10,000 पेक्षा जास्त चित्रपट रसिक या महोत्सवात सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलीब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलीब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Embed widget