Pushpa 2 Box Office Collection Day 6: 'स्त्री 2'लाही पछाडलं, सहव्या दिवशी 600 कोटींच्या क्लबमध्ये 'पुष्पा 2' ची एन्ट्री!
Pushpa 2 Box Office Collection Day 6: पुष्पा 2 सिनेमाने सहाव्या दिवशीच 600 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री मिळवली आहे.
Pushpa 2 The Rule Box Office Collection Day 6: अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा 2 (Pushpa 2) सिनेमाने सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ माजवला आहे. अगदी पहिल्या दिवसापासूनच या सिनेमाने रेकॉर्ड्स मोडायला सुरुवात केली होती. या सिनेमाने फक्त भारतातच नव्हे तर जगभरातील रेकॉर्ड्स मोडीत काढले आहे. तसेच सहाव्याच दिवशी या सिनेमाने 600 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री मिळवली आहे.
सॅनसिल्कच्या अहवालानुसार, पुष्पा 2 सिनेमाने पहिल्या दिवशी 164.25 कोटी रुपयांची कमाई करत दमदार ओपनिंग केली. त्याचप्रमाणे सिनेमाने पेड प्रीव्यूमध्ये 174.95 कोटींची कमाई केली होती. दुसऱ्याच दिवशी अल्लू अर्जुनच्या सिनेमाने 93.8 कोटी रुपये कमावले. तसेच तिसऱ्या दिवशी 119.25 आणि चौथ्या दिवशी 141.05 कोटी रुपये कमावले होते. पाचव्या दिवशी 64.45 कोटी रुपये कमावलेत. रात्री 10.30 वाजेपर्यंत 53.4 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह या सिनेमाने 600 कोटी रुपयांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.
'पुष्पा 2: द रुल' ने मोडला 'स्त्री 2' चा रेकॉर्ड
'पुष्पा 2: द रुल'ने 6 दिवसांत एकूण 646.85 कोटी रुपयांचा व्यवसाय केला असून यासोबतच या चित्रपटाने 'स्त्री 2'चा विक्रम मोडला आहे. या वर्षी पडद्यावर आलेल्या श्रद्धा कपूरच्या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 597 कोटींची कमाई केली होती. 'स्त्री 2'ला मागे टाकल्यानंतर 'पुष्पा 2: द रुल' आता भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत 6 व्या क्रमांकावर आला आहे.
जगभरातील 900 कोटी क्लबमध्ये 'पुष्पा 2: द रुल'ची एन्ट्री
जगभरातही 'पुष्पा 2: द रुल' हिट झाला आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या चित्रपटाने जगभरात 900 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. ट्रेड ॲनालिस्ट रमेश बाला यांनी त्यांच्या एक्सवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे.
पुष्पा 2 जवळपास 500 कोटी रुपयांमध्ये बनवण्यात आला असून या चित्रपटाने हे बजेट ओलांडले आहे. लवकरच हा चित्रपट 1000 कोटींचा आकडा गाठेल अशी अपेक्षा आहे.पुष्पा 2 चे दिग्दर्शन दिग्दर्शक सुकुमार यांनी केले आहे. त्याने या चित्रपटाचा पहिला भाग 2021 साली बनवला जो ब्लॉकबस्टर ठरला. त्या चित्रपटाप्रमाणे या चित्रपटातही अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
View this post on Instagram