Sonu Nigam : मुख्यमंत्री, क्रिडामंत्री लाईव्ह कॉन्सर्टमधून उठून गेले, सोनू निगमने व्यक्त केली खंत; व्हिडीओ पोस्ट करत म्हणाला...
Sonu Nigam : सोनू निगमच्या लाईव्ह कॉन्सर्टमधून राजकीय नेते उठून गेल्यावर त्याने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत खंत व्यक्त केली आहे.
Sonu Nigam : त्याच्या आवाजाने आणि सूरांनी आजवर अनेकांच्या मनावर राज्य केलं आहे. सोनू निगमची (Sonu Nigam) गाणी ही प्रत्येकासाठीच जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याच्या लाईव्ह कॉन्सर्टला जाणं ही अनेकांसाठी पर्वणीच असते. पण त्याच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये एका घटनेमुळे सोनू निगमने त्याच्या सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत खंत व्यक्त केली आहे.
सोनू निगमचा राजस्थानमध्ये कॉन्सर्ट होता. या कॉन्सर्टला राजस्थानचे मुख्यमंत्री, क्रिडामंत्री अशी दिग्गज मंडळी उपस्थित होती. पण ही मंडळी कॉन्सर्ट सुरु असतानाच अगदी अर्ध्यातूनच उठून गेलीत. यावरच सोनू निगमने व्हिडीओच्या माध्यमातून भाष्य केलं आहे. तसेच त्याने या दिग्गज नेत्यांवर नाराजी देखील व्यक्त केली आहे. हा सरस्वतीचा अपमान असल्याचंही यावेळी सोनू निगमने म्हटलं आहे.
सोनू निगमने काय म्हटलं?
सोनू निगमने व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, मी नुकतच एका कॉन्सर्टमधून येतोय. जयपूरमध्ये हा कॉन्सर्ट होता. रायझिंग राजस्थानच्या नावाने हा कॉन्सर्ट होता. हा कॉन्सर्ट खूप छान झाला, खूप दिग्गज मंडळी देखील आली होती. राजस्थानचे मुख्यमंत्री आणि क्रीडामंत्रीही होते. मला अंधारत फारसं काही दिसलं नाही. पण खूप लोकं होती. पण जेव्हा कार्यक्रम अगदी मध्यावर आला होता, त्यावेळी मुख्यमंत्री आणि इतर लोकं उठून निघून गेले.
सोनू निगमने पुढे म्हटलं की, 'मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही लोक कलाकाराचा आदर करत नसाल तर बाहेरचे लोक काय करतील? अमेरिकेत कोणी कार्यक्रम करत असताना तिथले राष्ट्राध्यक्ष उठून निघून जातात, असे कधीच दिसले नाही.जर तुम्हाला उठून जायचे असेल तर शो सुरू होण्यापूर्वी निघून जा किंवा येऊच नका... कार्यक्रम सुरू असताना असं उठून जाणं हा सरस्वतीचा अपमान आहे.. खरंतर या गोष्टीकडे माझं लक्ष नव्हतं. पण काही वेळाने मला अनेकांचे मेसेज आले की, तुम्ही अशा ठिकाणी कार्यक्रम करु नका. म्हणूनच मी तुम्हाला विनंती करतो. मला माहित आहे, तुम्हाला भरपूर कामं असतात आणि तुम्ही खूप तुमच्या कामांमध्ये व्यस्तही असता. म्हणूनच एका कार्यक्रमात बसून तुम्ही वेळ वाया घालावला नाही पाहिजे.
View this post on Instagram