Mahesh Manjrekar : 'IFFI' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात महेश मांजरेकरांच्या 'बटरफ्लाय'चा विशेष शो
IFFI 2023 : 'इफ्फी' या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सावत महेश मांजरेकरांच्या (Mahesh Manjrekar) 'बटरफ्लाय' (Butterfly) या सिनेमाचा विशेष शो आयोजित करण्यात आला आहे.

Mahesh Manjrekar Butterfly Movie IFFI 2023 : 'इफ्फी' (IFFI) या 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सावाला (International Festival Of India) आजपासून सुरुवात होणार आहे. या महोत्सावाची देशभरातील कलाकारांसोबत परदेशातील फिल्ममेकर्सनाही उत्सुकता आहे. आता या महोत्सवात महेश मांजरेकरांच्या (Mahesh Manjrekar) 'बटरफ्लाय' (Butterfly) या सिनेमाचा विशेष शो आयोजित करण्यात आला आहे.
यंदाच्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागासाठी महाराष्ट्र शासनाकडून मीरा वेलणकर दिग्दर्शित 'बटरफ्लाय' या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा आणि इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया यांनी आयोजित केला 'बटरफ्लाय' सिनेमाचा विशेष शो आयोजित केला आहे.
चित्रपटातील मुख्य कलाकार आणि दिग्दर्शकांची विशेष उपस्थिती
गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'बटरफ्लाय' हा सिनेमा येत्या बुधवारी म्हणजेच 22 नोव्हेंबरला दाखविण्यात येणार असून त्याआधी या चित्रपटाचा विशेष शो एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा यांनी मंगळवार 21 नोव्हेंबरला रविंद्र भवन, मार्गो येथे संध्याकाळी 7 वाजता आयोजित केला आहे. अशा पद्धतीने इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया आणि फिल्म बाजार या दोन्ही ठिकाणी दाखवला जाणारा हा एकमेव मराठी चित्रपट आहे. अशा अनोख्या आणि मोठ्या प्रमाणात मराठी चित्रपटाचं स्क्रीनिंग होणं ही गौरवाची गोष्ट आहे.
'बटरफ्लाय'च्या विशेष स्क्रीनिंगदरम्यान या सिनेमाचे निर्माते आणि अभिनेते अभिजीत साटम चित्रपटाची निर्माती आणि प्रमुख भूमिका साकारलेली अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम दिग्दर्शिका मीरा वेलणकर आणि ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर आवर्जून उपस्थित राहणार आहेत.
View this post on Instagram
प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला 'बटरफ्लाय'
महाराष्ट्रामध्ये प्रेक्षकांनी समीक्षकांनी कौतुक केलेला हा चित्रपट प्रत्येकानी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी पहायलाच हवा अशा या 'बटरफ्लाय' चित्रपटाचा आस्वाद आता गोव्यातील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया ला उपस्थित राहणाऱ्या रसिक प्रेक्षकांना घेता येणार आहे.
गोवा आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'फिल्म बाजार ' या गटात मराठी चित्रपट महाराष्ट्र शासनाकडून पाठवले जातात. या चित्रपटांची निवड करण्याकरता पाच सदस्यांची तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती. या समितीने केलेल्या शिफारसीनुसार ग्लोबल आडगाव, गिरकी आणि बटरफ्लाय हे तीन चित्रपट निवडण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या
IFFI : गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात महाराष्ट्र शासनाकडून तीन मराठी चित्रपटांची निवड; सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
