Kangana Ranaut : कंगना रनौतच्या 'Tejas' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज! वायुसेना स्थापना दिनी अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ
Tejas Movie : कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) 'तेजस' या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे.
Kangana Ranaut Tejas Movie Trailer Out : बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या 'तेजस' (Tejas) या सिनेमामुळे चर्चेत आहे. आज वायुसेना स्थापना दिनानिमित्त (Indian Air Force Day 2023) या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर आऊट करण्यात आला आहे. 'तेजस' या सिनेमाचा ट्रेलर कंगनाने शेअर केला आहे.
'तेजस' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये अॅक्शनचा तडका पाहायला मिळत आहे. या बहुप्रतिक्षित ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. 'तेजस' सिनेमाच्या निर्मात्यांनी आज वायुसेना स्थापना दिनानिमित्त ट्रेलर आऊट केला आहे. ट्रेलरमध्ये कंगना रनौत वैमानिक तेजस गिल यांच्या भूमिकेत दिसत आहे. ट्रेलरच्या सुरुवातीलाच "भारत को छेडेंगे तो छोडेंगे नहीं" हा दमदार डायलॉग बोलताना अभिनेत्री दिसत आहे. एकंदरीतच ट्रेलरच्या सुरुवातीपासूनच खळबळ उडवून दिली आहे.
'तेजस' या सिनेमात कंगना रनौतचा अॅक्शन मोड पाहायला मिळत आहे. या सिनेमात जबदस्त साऊंडट्रॅक आणि प्रभावी व्हिज्युअल्स इफेक्ट दाखवण्यात आले आहेत. 'तेजस' या सिनेमातील संवाद देशभक्तीची भावना जागृत करणारे आहेत.
View this post on Instagram
ट्रेलरमध्ये कंगना एअरफोर्सच्या धाडसी पायलटच्या भूमिकेत रुपेरी पडद्यावर राज्य करताना दिसणार आहे. कंगनाच्या चेहऱ्यावर दिसणारे गांभीर्य आणि अभिनेत्रीचा युद्धासाठीचा उत्साह लोकांच्या मनात देशाविषयीची तळमळ जागवणार आहे.
'तेजस' कधी होणार रिलीज? (Tejas Release Date)
कंगना रनौतचा आगामी 'तेजस' हा सिनेमा 27 ऑक्टोबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ट्रेलरमध्ये दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराची दमदार कारवाई दाखवण्यात आली आहे. कंगना रानौतच्या 'तेजस' सिनेमाची निर्मिती आरएसव्हीपीने केली आहे. सर्वेश मेवाडा लिखित आणि दिग्दर्शित आणि रोनी स्क्रूवाला निर्मित, हा सिनेमा 27 ऑक्टोबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
'तेजस' या सिनेमाचा ट्रेलर कंगना रनौतने शेअर केला आहे. कंगनाने 'तेजस'चा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. ट्रेलर शेअर करत तिने लिहिलं आहे,"आता आकाशातून शत्रूवर हल्ला होणार... आता युद्ध घोषित होणार! हा तो भारत आहे.. ज्याची छेड काढली तर सोडणार नाही. 'तेजस'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. 'तेजस' या सिनेमात कंगना आणि वरुण मित्रा यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या