Kangana Ranaut : "भारत को छेडेंगे तो छोडेंगे नही"; कंगना रनौतच्या 'तेजस'चा दमदार टीझर रिलीज
Tejas Teaser : कंगना रनौतच्या आगामी 'तेजस' या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Kangana Ranaut Tejas Teaser Out : बॉलिवूडची 'पंगाक्वीन' कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या तिच्या आगामी 'तेजस' (Tejas) या सिनेमामुळे चर्चेत आहे. आता या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'तेजस'चा टीझर खूपच दमदार आहे. या सिनेमातील संवादही खूपच दमदार आहेत.
कंगनाचा 'चंद्रमुखी 2' (Chandramukhi 2) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमातील कंगनाच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. आता 'तेजस' या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री रुपेरी पडदा गाजवणार आहे. 'तेजस' या सिनेमात कंगना रनौत वैमानिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.
'तेजस'चा टीझर आऊट! (Tejas Teaser Out)
आरएसवीपीच्या बॅनरअंतर्गत निर्मिती करण्यात आलेल्या 'तेजस' या सिनेमाचा टीझर खूपच धमाकेदार आहे. वैमानिकेची भूमिका कंगनाने चोख बजावली असल्याचा अंदाज टीझरवरुन येत आहे. टीझरच्या सुरुवातीलाच कंगना वैमानिकेच्या भूमिकेत दिसत आहे. त्यावेळी बॅकग्राउंडला आवाज येत आहे,"प्रत्येक गोष्ट बोलण्याची गरज नाही. आता आमने-सामने येण्याची वेळ आली आहे. आता आभाळातून पाऊस नव्हे तर आग येण्याची गरज आहे. भारत को छेडोंगे तो छोडेंगे नही".
View this post on Instagram
'तेजस'च्या टीझरमधील कंगनाचा अॅक्शन अवतार अंगावर शहारे आणणारा आहे. 'तेजस' या सिनेमात कंगना आणि वरुण मित्रा यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार आहे. सर्वेश मेवाडा यांनी या सिनेमाची कथा लिहिली असून दिग्दर्शनाची धुराही सांभाळली आहे. 'तेजस' या सिनेमात कंगना मध्यवर्ती भूमिकेत आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
'या' दिवशी प्रदर्शित होणार 'तेजस'
'तेजस' हा सिनेमा आधी 8 ऑक्टोबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण नंतर या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता हा सिनेमा 27 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कंगनाचा 'तेजस' हा सिनेमा अनेकांना प्रेरणा देणारा आहे. कंगनाने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत 'तेजस'चा टीझर शेअर केला आहे.
कंगनाच्या आगामी प्रोजेक्टबद्दल जाणून घ्या... (Kangana Ranaut Upcoming Project)
कंगना रनौतचा 'तेजस' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. तसेच 'इमरजेन्सी' या सिनेमाच्या माध्यमातूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगनानेचं या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. कंगनासह या सिनेमात श्रेयस तळपदे, अनुपम खेर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
संबंधित बातम्या