Jr NTR on Oscars : ज्युनिअर एनटीआर पुन्हा ऑस्कर गाजवणार! अभिनेत्याच्या शिरपेचात रोवला आणखी एक मानाचा तुरा
Jr NTR : ऑस्कर अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अॅन्ड सायन्सेसच्या कलाकार यादीत ज्युनियर एनटीआरचा समावेश झाला आहे.

Jr NTR On Oscars Academy List Of New Member Class Of Actors : अभिनेता ज्युनिअर एनटीआरच्या (Jr NTR) शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. 2023 हे वर्ष अभिनेत्यासाठी खूपच खास ठरलं आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच त्याच्या 'आरआरआर' (RRR) या सिनेमाला ऑस्कर (Oscars) मिळालं आहे. अशातच आता ऑस्कर अॅकॅडमी ऑफ मोशन फिक्चर आर्ट्स अॅन्ड सायन्सेसच्या कलाकार यादीत ज्युनिअर एनटीआरचा समावेश झाला आहे.
ज्युनिअर एनटीआरच्या 'आरआरआर' (RRR) या बहुचर्चित सिनेमातील 'नाटू नाटू' या गाण्याला सर्वोत्कृष्ट ओरिजनल सॉन्ग या कॅटेगरीमध्ये ऑस्कर मिळालं. अशातच आता ऑस्करच्या कलाकारांच्या यादीत ज्युनिअर एनटीआरचा समावेश झाला आहे. त्यामुळे चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
View this post on Instagram
द अॅकेडमीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ऑस्कर अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अॅन्ड सायन्सेसच्या कलाकारांची यांदी त्यांनी शेअर केली आहे. यात ज्युनिअर एनटीआरसह ह्यू क्वान, मार्शा स्टेफनी ब्लॅक, केरी कॉन्डन आणि रोजा सलाजार या कलाकारांचाही समावेश आहे. अकादमीने पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,"आपल्या दर्जेदार कलाकृतींच्या माध्यमातून जागतिक पातळीवर राज्य करण्यासाठी ही कलाकार मंडळी सज्ज आहेत. जगभरातील प्रेक्षकांचं ते चांगलच मनोरंजन करतील".
अकादमीने पुढे लिहिलं आहे,"अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि प्रामाणिकपणाने तुमच्यासमोरील माध्यमाचा योग्य वापर करा. कल्पना आणि वास्तिकतेची सांगड घाला. पात्राचा संघर्ष, आनंद आणि यश यात स्वत:ला पाहा. हुई क्वान, मार्शा स्टेफनी ब्लॅक, केरी कॉन्डन, एन.टी रामा राव, रोजा सलाजार आणि ज्युनिअर एनटीआर यांचे अकादमीमध्ये स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे".
ज्युनिअर एनटीआरचा 'देवरा' प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज!
ज्युनिअर एनटीआरचा 'देवरा' हा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. कोराताला शिवा या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. या सिनेमात जान्हवी कपूर आणि अनिल कपूर हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. 5 एप्रिलला हा सिनेमा तेलुगू, तामिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
ज्युनिअर एनटीआरने 'वॉर 2' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमात तो हृतिक रोशनसोबत झळकला. लवकरच या सिनेमाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत ज्युनिअर एनटीआरचा समावेश आहे.
संबंधित बातम्या
Saif Ali Khan : सैफ अली खानच्या 'Devara'चा फर्स्ट लूक आऊट! वाढदिवशी चाहत्यांना खास भेट
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
